Home मनोरंजन लग्नाच्या बातम्यांमुळे मीडियामध्ये गाजणाऱ्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचा झाला ब्रेकअप?
मनोरंजन

लग्नाच्या बातम्यांमुळे मीडियामध्ये गाजणाऱ्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचा झाला ब्रेकअप?

10
Kiara And Sidharth Breakup
Kiara And Sidharth Breakup

बॉलिवूडमध्ये नाते जोडले जाणे आणि तुटणे ही फार मोठी बाब नाही. रोजच इथे नवे नाते जुळते आणि जुने नाते तुटते. अशा बातम्यांबद्दल आता लोकांना देखील सवय झाली आहे. त्यामुळे ते देखील यावर खूप रिऍक्ट होत नाहीत. मात्र जेव्हा एखाद्या मोठ्या कलाकाराचे अतिशय गाजलेले नाते तुटते तेव्हा मात्र मोठा बज निर्माण होतो. ‘शेरशाह’ सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसलेली जोडी म्हणजे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara And Sidharth Breakup). या दोघांचा हा सिनेमा तर तुफान गाजला सोबतच या दोघांची जोडी देखील लोकप्रिय झाली. या जोडीने मोठ्या प्रमाणावर लाईमलाइट मिळवले. मागील अनेक महिन्यांपासून टॉपवर असलेली ही जोडी आलिया आणि रणबीर यांच्यानंतर लवकरच लग्न करणार असे बोलले जात होते, मात्र आता या दोघांचे ब्रेकअप झाल्याची माहिती समोर येत आहे. (Kiara And Sidharth Breakup)

‘शेरशहा’ प्रदर्शित झाल्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ यांच्या जोडीला खूपच प्रसिद्धी मिळाली. त्यांची जोडी एवढी गाजली की प्रेक्षकांना त्यांना अजून वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये एकत्र पाहण्याची इच्छा होती. चित्रपटानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा तुफान रंगल्या. मात्र त्यांनी दोघांनी कधीही अधिकृतपणे त्यांचे नाते जगासमोर स्वीकारले नाही. पण मीडियाने त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले. त्यांचे विविध व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल देखील झाले होते. पण आता या दोघांनी ब्रेकअप केल्याची माहिती मिळत आहे. (Kiara And Sidharth Breakup)

प्राप्त माहितीनुसार, या दोघांनी वेगळे होण्याचे ठरवले आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांच्यामध्ये काहीच नीट सुरू नाही, एवढेच काय तर त्यांनी एकमेकांची भेट घेणे देखील बंद केले आहे. यावरूनच आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचा अंदाज लावला जात आहे. आता त्यांचा ब्रेकअप का झाला? झाला असेल तर त्यांच्या ब्रेकअपचे खरे कारण काय? आदी प्रश्न फॅन्सकडून विचारले जात आहे. एवढे मात्र नक्की की या दोघांच्या ब्रेकमुळे त्यांच्या फॅन्समध्ये बरीच नाराजी पसरली आहे. (Kiara And Sidharth Breakup)

======

हे देखील वाचा – आई होण्यासाठी अमृता रावने बघितली अनेक वर्ष वाट, सरोगसी झाली फेल

======

कियारा अडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 2’, ‘गोविंदा मेरा नाम’, ‘जुग जुग जियो’ आणि ‘आरसी 15’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रा ‘मिशन मजनू’, ‘योद्धा’ आणि ‘थँक गॉड’ आदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याआधी सिद्धार्थ मल्होत्राचे नाव आलिया भट्टसोबत जोडले गेले होते. मात्र त्यांचा देखील काही कारणामुळे ब्रेकअप झाला आणि आलियाने आता रणबीरसोबत लग्न केले. (Kiara And Sidharth Breakup)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...