Home मनोरंजन काय सांगता! बिग बींची लाडकी नातं ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला करतेय डेट
मनोरंजन

काय सांगता! बिग बींची लाडकी नातं ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला करतेय डेट

10
Navya Naveli Nanda date Siddhant Chaturvedi
Navya Naveli Nanda date Siddhant Chaturvedi

सोशल मीडियामुळे कलाकारच काय तर, कलाकारांच्या घरातील सर्वच दूर, लांबच्या सदस्यांना ओळख मिळते. चित्रपटांमध्ये काम न करता देखील केवळ सोशल मीडियामुळे हे सदस्य देखील सेलिब्रिटी बनतात आणि ओळख मिळवतात. सोशल मीडियाने ग्लॅमर जगात काम न करता देखील अशा सर्वच लोकांना मोठी आणि महत्त्वाची ओळख मिळवून दिली आहे. आता अशा लोकांमध्ये जर महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरातील सदस्य असतील तर विचारायलाच नको. अमिताभ बच्चन बॉलिवूडचे बिग बी म्हणून ओळखले जातात. मागील अनेक दशकांपासून अमिताभ बच्चन बॉलिवूडवर राज्य करत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि नावाजलेल्या अमिताभ बच्चन यांचे कुटुंब नेहमीच चर्चेत असते.

तसे पहिले तर बच्चन घरातील सर्वच व्यक्ती सुपरस्टार आहे. मात्र अमिताभ बच्चन यांच्या लेकीने श्वेता बच्चनने बॉलिवूडमध्ये न येण्याचे ठरवले. असे असूनही श्वेता नेहमीच मीडियामध्ये चर्चेत असते. आता तर श्वेता बच्चनच्या लेकीने नव्या नवेली नंदाने देखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. बॉलिवूडमध्ये किंवा ग्लॅमरच्या जगात सक्रिय नसूनही केवळ सोशल मीडियामुळे नव्या आज मोठी सेलिब्रिटी बनली आहे. कोणत्याही मोठ्या अभिनेत्रीला असतील एवढे फॉलोवर्स तिला सोशल मीडियावर आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नव्याबद्दल नेहमीच वेगवेगळ्या कारणानिमित्ताने बातम्या येत असतात. (Navya Naveli Nanda date Siddhant Chaturvedi)

आता नव्या नवेली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्या बॉलिवूडमधल्या कलाकारसोबत असलेल्या अफेयरच्या बातम्या. हो, मिळत असलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांची लाडकी नात नव्या नवेली सध्या ‘गेहराईया’ फेम सिद्धांत चतुर्वेदींला डेट करत असल्याचे समजत आहे. नव्या आणि सिद्धांत सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो तर करतातच सोबतच एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्स करताना देखील दिसतात.  (Navya Naveli Nanda date Siddhant Chaturvedi)

नुकताच नव्या नवेली नंदाने तिचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नव्या घरच्या छपरावर बसलेली असून, तिच्या फोटोमध्ये रात्रीचा शांत चंद्र देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “हा फोटो चंद्राने काढला आहे.” यासोबतच तिने चंद्राचा एक ईमोजी देखील पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोवर सिद्धांताने एक ईमोजी कमेंट केला आहे. त्यानंतर सिद्धांताने लगेच एक रील व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्याने लिहिले, “आपले मन आणि मुन दोन्ही क्लिअर आहे. यासोबतच त्याने एक ईमोजी देखील पोस्ट केला आहे. (Navya Naveli Nanda date Siddhant Chaturvedi)

यावरून या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी असल्याचे बोलले जात आहे. कारण या दोन्ही फोटोंमध्ये अजून एक साम्य आहे आणि ते म्हणजे ऋषिकेशचा प्रसिद्ध ब्रिज. हे दोघेही सध्या ऋषिकेशमध्ये एकत्र सुटी एन्जॉय करत असल्याचेच यावरून दिसत आहे. शिवाय दोघांनी थोड्याच अंतरावर केलेल्या पोस्ट यावरून नेटकऱ्यांमध्ये आणि त्यांच्या फॅन्समध्ये त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत. (Navya Naveli Nanda date Siddhant Chaturvedi)

======

हे देखील वाचा – ‘भूल भुलैया 2’मधील कियाराचा भयावह लूक आला समोर

======

त्तपूर्वी सिद्धांत गली बॉय आणि गेहराईया सिनेमात दिसला होता. गेहराईया सिनेमातील दीपिकासोबतच बोल्ड सीन्समुळे तो चांगलाच गाजला. सिद्धांत लवकरच ‘खो गये हम कहा’ आणि ‘फोन भूत’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर नव्या एक सामाजिक कार्यकर्ती असून, एक उद्योजिका देखील आहे. तिच्या बॉलिवूडमध्ये येण्याचा अजूनतरी कोणताच विचार नसल्याचे समजत आहे. (Navya Naveli Nanda date Siddhant Chaturvedi)

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...