Home मनोरंजन रिव्हिलिंग ड्रेसमधून दिसला रिचा चड्ढाचा मादक आणि ग्लॅमरस अंदाज
मनोरंजन

रिव्हिलिंग ड्रेसमधून दिसला रिचा चड्ढाचा मादक आणि ग्लॅमरस अंदाज

6
Richa Chadha
रिव्हिलिंग ड्रेसमधून दिसला ट्रान्सफॉर्मेशनअंतरचा मादक आणि ग्लॅमरस अंदाज

अभिनेत्री त्यांच्या रील लाईफमध्ये कशाही भूमिका करत असल्या तरी त्या त्यांच्या रिअल आयुष्यात अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रींचे हे दुसरे रूप सर्वांसमोर नेहमीच येत असते. 

अभिनेत्री त्यांच्या मादक आणि आकर्षक फोटोशूटचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अभिनेत्रींचे असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे हे कोणासाठीच नवीन नाही, मात्र आता ज्या अभिनेत्रीने तिचे असे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे ती या फोटोंमुळे कमालीची चर्चेत आली असून, तिच्या या बदलेल्या रूपाची सर्वत्र चर्चा होत आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या हटके आणि दमदार अंदाजासाठी अभिनयासाठी प्रसिद्ध असणारी रिचा चड्ढा (Richa Chadha) पठडीबाहेरील हटके चित्रपट करण्यासाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या प्रभावी अभिनयातून अशा चित्रपटांना एका उंचीवर नेऊन ठेवते.

नुकतेच रिचाने अतिशय बोल्ड फोटोशूट केले असून, यातील काही फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोनी सोशल मीडियावर अक्षरशः आग लावली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रिचाचे मादक फोटो आणि तिचे ट्रान्सफॉर्मेशन सध्या खूपच चर्चेत आले आहे. 

रिचाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे कमी झालेले वजन स्पष्ट दिसून येत असून, या फोटोंमध्ये ती अधिकच आकर्षक दिसत आहे. या फोटोंमध्ये रिचाने तिच्या हॉट अंदाजात पोज दिल्या आहेत. 

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा शिमर डीप नेक असलेल्या बोल्ड ड्रेस घातला असून, त्यावर मेसी हेयरबन, हेव्ही इयररिंग्स आणि न्यूड मेकअप केला आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत असून, सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना रिचाने तिचे वजन कमी कसे केले हे देखील सांगितले आहे. 

रिचाने कॅप्शनमध्ये लिहिले, “मला फोटोशूट करायला आवडतात. जिथे फोटोग्राफर आणि माझी मैत्री आहे. (जशी या फोटोशूटमध्ये आहे) सामान्यतः जगाची नजर, संगीत, कला यासाठी खूप प्रेम. या फोटोशूटच्या वेळी मला जाणवले की, मी एक भूमिका निभावत आहे. आम्ही काही खूपच डिस्टर्बिया फोटो देखील घेतले, जे मी नंतर पोस्ट करेन.”

=====

हे देखील वाचा – साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरच्या लग्नात खर्च झाला पाण्यासारखा पैसा, वाचा या आलिशान लग्नाच्या शानदार गोष्टी

=====

रिचा चड्ढा (Richa Chadha) तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा अधिक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त प्रसिद्धीच्या झोतात असते. मागील बऱ्याच काळापासून रिचा (Richa Chadha) आणि अभिनेता अली फजल एकमेकांना डेट करत आहेत. तसंच ते दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील व्हायरल झाल्या होत्या. २०२० साली ते लग्न करणार होते, मात्र कोरोनामुळे त्यांचे लग्न पोस्टपोन झाले. मात्र आता ते लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...