Home प्रेस रिलीझ १७ जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार “आठवा रंग प्रेमाचा”
प्रेस रिलीझमनोरंजन

१७ जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार “आठवा रंग प्रेमाचा”

13
"आठवा रंग प्रेमाचा"

चिरंतन राहणाऱ्या प्रेम या संकल्पनेवर आधारित “आठवा रंग प्रेमाचा” हा चित्रपट १७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले.

अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी “आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

====

हे देखील वाचा: तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेची फ्रेश जोडी झळकणार ‘मन कस्तुरी रे’ सिनेमातून

====

दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. रिंकू राजगुरू सोबत विशाल आनंद हा नव्या दमाचा अभिनेता या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

समीर कर्णिक यांनी “क्युं हो गया ना..” या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर “यमला पगला दिवाना”, “चार दिन की चांदनी”, “हिरोज”, “नन्हे जैसलमेर” अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर यांनी केलं आहे.

Bollywood Director Samir Karnik Biography, News, Photos, Videos | NETTV4U

====

हे देखील वाचा: प्रेमाचा अनुबंध उलगडणारा ‘फ्लिकर’

====

“आठवा रंग प्रेमाचा” या चित्रपटात आजच्या काळातली आणि फ्रेश कथा प्रेक्षकांना पाहता येईल. प्रेमाचे अनेक रंग असतात. त्यातला आठवा रंग कोणता? याची उत्सुकता या चित्रपटाच्या पोस्टरनं निर्माण केली आहे. अतिशय रंजक असं हे पोस्टर आहे. त्यामुळे आठवा रंग प्रेमाचा प्रेक्षकांवर भूल पाडेल यात शंका नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...