Home मनोरंजन ५ वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग पूर्ण, आलियाकडून खास पोस्ट शेअर
मनोरंजन

५ वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर ‘ब्रह्मास्त्र’चं शूटिंग पूर्ण, आलियाकडून खास पोस्ट शेअर

11
ब्रह्मास्त्र

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग बरेच दिवस चालले होते. नुकतेच रणबीर आणि आलिया वाराणसीच्या रस्त्यांवर शूटिंग करताना दिसले.

अलीकडेच, चित्रपटाचे निर्माते करण जोहर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने सांगितले की, ब्रह्मास्त्र चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.

करण जोहरने लिहिले – आश्चर्यकारक, रोमांचक, कठोर परिश्रम, समर्पण, प्रेम आणि उत्कटतेने भरलेला प्रवास अखेर संपला आहे. तुमच्यासाठी लवकरच हा चित्रपट घेवुन सिनेमागृहात येणार आहोत. या चित्रपटाच्या काही भागाचे शूटिंग बाकी होते, जे नुकतेच पूर्ण झाले आहे.

ब्रह्मास्त्रचे शूटिंग संपल्याची माहिती देताना आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये आलियाने लिहिले – आम्ही २०१८ मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले…आणि आता…ब्रह्मास्त्र भाग १ चे शूटिंग संपले आहे.

====

हे देखील वाचा: चौथ्या दिवशीही ‘आरआरआर’ची बाॅक्स ऑफिसवर कोट्यावधीची कमाई

====

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा हा पहिलाच चित्रपट असेल. यात रणबीर आणि आलियाशिवाय अमिताभ बच्चन, मौनी राय, नागार्जुन अक्किनेनी असे दिग्गज कलाकार आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तमिळ या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या पोस्टसह अयानने सांगितले की, चित्रपटाचे पहिले शूट ५ वर्षांपूर्वी सुरू झाले होते आणि आता ते संपले आहे. चित्रपटाचे शेवटचे शूटिंग बनारसमध्ये झाले होते.

लवकरच करणार लग्ण

रणबीर आणि आलिया पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत तर दुसरीकडे त्यांच्या लग्नाचीही जोरदार चर्चा आहे. यंदा ते लवकरच लग्ण करणार, असे सांगण्यात येत आहे.

Ranbir Kapoor, Alia Bhatt make stunning pair in 'Brahmastra' new still |  Deccan Herald

====

हे देखील वाचा: सावधान! वेबसीरिजच्या दुनियेत ‘माई’ दाखल होतेय… 

====

कामाच्या आघाडीवर आलिया अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यामध्ये ‘रॉकी आणि राणीची प्रेमकथा’, ‘डार्लिंग्स’ आणि ‘जी ले जरा’ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रणबीरकडे ‘शमशेरा’ हा चित्रपट आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...