Home मनोरंजन सावधान! वेबसीरिजच्या दुनियेत ‘माई’ दाखल होतेय… 
मनोरंजन

सावधान! वेबसीरिजच्या दुनियेत ‘माई’ दाखल होतेय… 

13

साक्षी तंवर (Sakshi Tanwar) ही एक सक्षम, स्वतंत्र अभिनेत्री आहे. साक्षीच्या अभिनयाची चुणूक दाखवणारा माई (Mai) या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवर लवकरच येणाऱ्या या वेबसिरीजमध्ये साक्षी एका आईच्या भूमिकेत आहे. 

आपल्या मुलीच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी साधीभोळी महिला सराईत गुन्हेगारांना कशी सामोरी जाते याची झलक माईच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळते. यात साक्षीचा लुक बघून तिच्या हजारो चाहत्यांनी सोशल मिडीयावर तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.  

नेटफ्लिक्सवर येणाऱ्या ‘माई (Mai)’ या सस्पेंस थ्रिलर वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ही सिरीज अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा याच्या प्रोडक्शन कंपनी क्लीन स्लेटज स्डुडीओची निर्मिती आहे. अर्थात गेल्याच आठवड्यात अनुष्का शर्मानं या कंपनीत बरोबरची भागीदारी सोडली असून हे प्रॉडक्शन हाऊस आता कर्णेश शर्मा स्वतः सांभाळत आहे.  

====

हे देखील वाचा: बॉलिवूडमध्ये अवतरलाय नवा चॉकलेट बॉय…शांतनु माहेश्वरी (Shantanu Maheshwari)

====

माई (Mai) या वेबसिरीजमध्ये साक्षी तंवर (Sakshi Tanwar) प्रमुख भूमिकेत आहे. तिच्यासोबत राइमा सेन आणि वामिका गब्बी या दोघीही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. ट्रेलरच्या सुरुवातीला साक्षी आपल्या मुलीला म्हणजे वामिका गब्बीला काहीतरी सांगतेय, असा सीन आहे. त्यानंतर काही क्षणातच एक ट्रक येऊन वामिकाला धडक देतो. यात वामिकाचा जागीच मृत्यू होतो.  

आपल्या मुलीला आपल्या समोरच कोणीतरी मारले ही भावना एका आईला किती त्रासदायक ठरते, याची जाणीव साक्षी आपल्या अभिनयातून देते. पुढची सर्व सिरीज अर्थातच आपल्या मुलीला कोणी मारलं आणि का मारलं, या प्रश्नाच्या शोधासाठी खर्ची पडतात. 

साक्षीला या कामात कोणीही मदत करत नाही. ती तिचीच गुप्तहेर होते. निरनिराळ्या भूमिकांमध्ये जाते.  वेशांतर करते आणि तिच्या मुलीच्या मारकऱ्यांपर्यंत पोहचते. हे सर्व करताना तिला अनेक धमक्या मिळतात. तिच्यावरही हल्ले होतात.  

====

हे देखील वाचा: ‘आर्या (Aarya)’ – या वेबसिरिजने केवळ करिअरच नाही तर, सुश्मिताच्या आयुष्यातही बदल घडवला

====

एक साधी आई, आपल्या मुलीच्या मारेकऱ्यांचा शोधासाठी सराईत गुन्हेगारांवर कुरघोडी करते आणि त्यांनाच आपल्या जाळ्यात अकडवते. साक्षी आपल्या मुलीला न्याय देऊ शकेल का….आणि तिला तिच्या मुलीच्या मृत्यूचं खरं कारण समजेल का… या सर्वांची उत्तरं ‘माई (Mai)’ या वेबसिरीजमधून मिळणार आहे.  

साक्षी तंवर (Sakshi Tanwar) यापूर्वी ऑल्ट बालाजी वरील कर ले तू भी मोहब्बत,  झी 5 च्या द फॉईनल कॉल आणि मिशन ओवर मार्स या वेबसिरीजमध्ये दिसली आहे. याशिवाय मोठ्या पडद्यावरही साक्षी दिसणार आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा बहुचर्चिच चित्रपट पृथ्वीराज मध्येही साक्षी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.  

– सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...