मंदिरांचा देश म्हणून भारताची संपूर्ण जगामध्ये ओळख आहे. भारतात देवी देवतांची मंदिरं तर आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात. मधल्या काही काळापासून तर कलाकारांची देखील मंदिरं तयार होत असल्याचे आपण ऐकले असेल. मात्र भारतात एक असे मंदिर आहे, ज्या मंदिराची ओळखच भारत आहे. आपल्या सर्वच भारतीयांसाठी आपली ‘आई’ असलेल्या देवतेचे हे अतिशय अद्भुत आणि खास मंदिर आहे. आता हे अतिशय ऐतिहासिक आणि दुर्मिळ मंदिर जगातील सर्वात प्राचीन शहर म्हणून ओळख असलेल्या वाराणसीमध्ये स्थित आहे. (India)
मंदिरांचे शहर असलेल्या वाराणसीमध्ये भारत मातेचे अतिशय जुने मात्र खूपच सुंदर मंदिर आहे. भारतातील हे एकमेव असे भारत मातेचे मंदिर आहे. आपल्या सर्वच भारतीयांसाठी भारत हा केवळ देश नसून ती आपली आई आहे. हे आपण कायमच म्हणतो मात्र वाराणसीतील या मंदिरामध्ये तर चक्क याच आपल्या भारत आईला मंदिरात स्थान दिलेले आपल्याला पाहायला मिळते. भारत मातेचे हे मंदिर प्राचीन असून या मंदिराची भव्यता आणि प्राचीनता पाहण्यासाठी परदेशातूनही पर्यटक येतात. तसेच येथे भारताच्या नकाशाची पूर्ण भक्तीभावाने पूजा केली जाते. हे मंदिर खूप पवित्र मानले जाते. सर्वात महत्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे या मंदिरात कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. (Bharat Mata Temple)

दरम्यान भारत मातेच्या या मंदिराच्या बांधकामाची सुरुवात भारतरत्न डॉ. भगवान दास यांनी २ एप्रिल १९२६ रोजी केली होती. काशीचे दुर्गा प्रसाद हे मंदिर बांधण्यास सहमत झाले. भारत मातेचे हे मंदिर महात्मा गांधी काशी विद्यापीठ परिसरात आहे. हे मंदिर पूर्ण होण्यासाठी पाच ते सहा वर्षे लागली. तसेच २५ ऑक्टोबर १९३६ रोजी वाराणसी येथे महात्मा गांधींनी त्याचे उद्घाटन केले. येथे भारतमातेच्या अविभाजित नकाशाची पूजा केली जाते. हे भारतीयांसाठी अभिमानाचे प्रतीक आहे. येथे भारतमातेचा नकाशा संगमरवरात कोरला गेला आहे. त्यातही डोंगर, नद्या, समुद्र दाखविले गेले आहे. ३१.२ फुट बाय ३०.२ फुट आकाराचा हा भव्य नकाशा ११ इंची ७६२ तुकड्यातून तयार केला गेला आहे. (Top Trending News)
या अखंड भारताच्या नकाशामध्ये यामध्ये अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, बर्मा आणि श्रीलंका या देशांचे शिल्प मकराना दगडावर कोरले आहे. तसेच भारत मातेच्या या नकाशात, सध्याच्या शहरांची, तीर्थस्थळांची आणि प्रांतांची नावे तसेच पर्वत, टेकड्या, तलाव, कालवे आणि बेटे स्पष्टपणे दर्शविली आहे. येथे, उत्तरेला पामीर, तिबेट, तुर्किस्तान, पूर्वेला ब्रह्मदेश, मलय द्वीपकल्प, चीनची भिंत, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचे सुंदर चित्रण केले आहे. या मंदिराच्या दारावर राष्ट्रगीत मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे. मंदिराभोवती विशाल उद्यान असून मंदिरात अनेक शिलालेख आहेत. दरवाज्यावर वंदे मातरम गीत कोरले गेले आहे. (Top Stories)
========
Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते ?
========
अखंड भारतमातेचे हे मंदिर वर्षातून दोनदा सुंदरपणे सजवले जाते. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनी ते एका खास पद्धतीने सजवले जाते. या नकाशात समुद्राचा परिसर पाण्याने भरलेला दाखवला आहे. तसेच सपाट भाग गवत आणि फुलांनी सजवलेला आहे. हे मंदिर कायमच देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करत असते. दरम्यान वाराणसीमध्ये असलेले हे भारत मातेचे मंदिर महात्मा गांधी काशी विद्यापीठ परिसरात असून येथे पोहचणे सोपे आहे. तसेच वाराणसी हे शहर अनेक महामार्ग आणि रेल्वे मार्गांना जोडलेले आहे. त्यामुळे खासगी वाहन किंवा कॅप, बसच्या मदतीने इथपर्यंत सहज पोहचता येते. (Social News)
(टीप – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics