Home सामाजिक Cylinder Tips : दुर्घटना टाळण्यासाठी सिलेंडरशी संबंधित ‘या’ गोष्टींचे करा पालन
सामाजिक

Cylinder Tips : दुर्घटना टाळण्यासाठी सिलेंडरशी संबंधित ‘या’ गोष्टींचे करा पालन

12
Cylinder Tips

आपण कायमच आपल्या स्वयंपाक घरामध्ये जेवण बनवण्यासाठी गॅसचा वापर करतो. यासाठी सिलेंडर अत्यावश्यक असतो. सिलेंडरशिवाय आपल्या कोणाचेही पान हालत नाही. मात्र हा सिलेंडर जितका फायदेशीर आहे, उपयुक्त आहे तेवढाच जास्त धोकादायक देखील आहे. याच सिलेंडरमुळे अनेक अपघात झालेले आपण ऐकले आहे, वाचले आहे, पाहिले आहे. घरातील किचन हा सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे. मात्र जर गृहिणींनी किंबहुना घरातील सर्वच सदस्यांनी जर सिलेंडरची नीट काळजी घेतली नाही तर नक्कीच दुर्घटना होण्य्ची शक्यता अधिक वाढते. सिलेंडरशी संबंधित आजवर झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेक लोकांनी आपला जीव देखील गमावला आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला या सिलेंडरशी संबंधित काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. (Marathi)

सिलेंडरची काळजी कशी घ्यावी?
– नेहमी असे LPG सिलिंडर वापरा, ज्यावर ISI मार्क असेल. (Kitchen Tips)
– तुम्ही गॅस सिलिंडर अस्सल डीलर्सकडून खरेदी केल्याची खात्री करा. ते काळ्या बाजारातून विकत घेऊ नका.
– गॅस सिलिंडर डिलिव्हरीच्या वेळी स्वीकारताना, सिलिंडर योग्यरित्या सील केलेले आहे आणि त्याची सुरक्षा कॅप छेडछाड केलेली नाही, याची खात्री करा.
– गॅस सिलिंडर आणि गॅसची पाइप यांची नियमित तपासणी करा. (Marathi News)
– कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून तपासणी करून घ्या.
– चांगल्या दर्जाची पाइप वापरा.
– स्वयंपाक झाल्यानंतर रेग्युलेटरचा स्वीच बंद करा.
– गॅसगळती झाल्यास दारे-खिडक्या उघडा.
– ट्यूब, लाइट सुरू करू नका. (Todays Marathi Headline)
– गॅसचा वास येत असल्यास काडेपेटी, लायटर, सिगारेट लायटर वापरू नका.
– मेणबत्ती सुरू असेल तर तत्काळ विझवा.
– रेग्युलेटरचा स्वीच बंद करा.
– गॅस कंपनीच्या माणसाला तत्काळ फोन करा.

Cylinder Tips

– काम संपल्यानंतर कॉक आणि रेग्युलेटर बंद करून ठेवा. (Top Stories)
– टी जॉइंट करून रेग्युलेटरवर एकापेक्षा जास्त उपकरणांचा वापर प्रतिबंधक आहे.
– शेगडी सिलिंडरच्या जास्त जवळ ठेवू नये. तसेच शेगडी जमिनीपासून साधारण उंचीवर ठेवून स्वयंपाक करावा.
– जेथे एलपीजी ठेवायचा आहे ती जागा हवेशीर असावी. तिला समोरासमोर वायुविजन होईल अशी रचना असावी. दारे-खिडक्या बंद असणाऱ्या खोलीत कधीही एलपीजी वापरू नये. (Latest Marathi Headline)
– सिलिंडर, रेग्युलेटरचे बटन आणि रबरी पाइप हात पोहोचेल अशा पद्धतीने ठेवावी.
– सिलिंडरचा वापर नेहमी जमिनीवरच करा. तळघरात, जमिनीखाली एलपीजी वापरू नये.
– एका खोलीत दोनपेक्षा जास्त सिलिंडर ठेवू नयेत. सिलिंडर नेहमी उभ्या स्थितीत ठेवावा. ते आडव्या किंवा इतर दुसऱ्या स्थितीत ठेवल्यास त्याच्यातील द्रवरूप एलपीजी उघड्या व्हॉल्व्हमधून बाहेर येण्याची शक्यता असते. (Marathi Headline)
– गॅस उपकरणांच्या अवतीभवती एक मीटरच्या अंतरामध्ये इलेक्ट्रिक ओव्हन, केरोसीन स्टोव्ह असे कोणतेही उष्णता निर्माण करणारी साधने ठेवू नयेत.
– सिलिंडरला थेट ऊन, पाऊस मिळेल किंवा धूळ बसेल अशा ठिकाणी ठेवू नये. सिलिंडरवर कोणतेही भांडे, कापड, आदी ठेवू नयेत.
– रिकामे किंवा भरलेले सिलिंडर सुरक्षाकॅप लावल्याशिवाय ठेवू नका.
– स्वयंपाकघरात काम करताना अंगावर नेहमी सुती वस्त्र किंवा अग्निप्रतिरोधक अॅप्रन वापरावे. टेरिकॉट, नॉयलॉनसारखे वस्त्र लगेच पेट घेते.
– गॅस सिलेंडरमधून गॅस गळतीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरात आणि तुम्ही ज्या खोलीत गॅस सिलिंडर ठेवता त्या खोलीत गॅस डिटेक्टर लावा. (Top Marathi Headline)

गॅस गळती झाल्यास
– गॅस लिकेजचा वास आल्यास सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये. काडेपेटी किंवा मेणबत्ती चुकूनही पेटवू नका. गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये.
– सिलिंडरवरील रेग्युलेटर काढून नॉबवर त्याची प्लास्टिकची कॅप लावून वितरकाला संपर्क करा. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास गॅस वितरकाशी संपर्क साधा. (Latest Marathi News)

======

Coffee History : हे ३ देश चक्क कॉफीमुळे अस्तित्वात आले ?

======
– सिलिंडर व गॅस शेगडीच्या सान्निध्यात इलेक्ट्रिक शेगडी, रॉकेल स्टोव्ह, कोळसा शेगडी अशा इतर उपकरणांचा वापर करू नये.
– पाच वर्षे गॅरंटीसह ट्रिपल कोटिंग असलेली, दीर्घकाळ टिकणारी आयएसआय मार्कची सुरक्षा पाइपच वापरा. या पाइप उंदरांचा उपद्रव, उष्णता, पाणी व प्रतिकूल वातावरणाचा परिणाम होत नाही. (Top Trending News)
– तुमच्या गॅस सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती होत असल्यास एका भांड्यात पाणी घेऊन गॅस पाईप त्यावर धरून ठेवा. दरम्यान पाण्यात अधिक प्रमाणात बुडबुडे येत असतील तर गॅस गळती होत आहे असे समजा. पण जेव्हा पाण्यात हालचाल होत नसेल तर गॅस सिलिंडरची गळती होत नाही हे समजून घ्या. (Social Tips)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Uttarakhand
सामाजिक

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची...

Varanasi
सामाजिक

Varanasi : देव दिवाळीचे महत्त्व !

दरवर्षी दिवाळीनंतर १५ दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. भगवान...

Mathura
सामाजिक

Mathura : तब्बल ५४ वर्षांनी मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील खजिना उघड

भारतातील मंदिरं कायम त्यांच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांसाठी, त्यांच्या अभूतपूर्व बांधकामासाठी, इतर अनेक कारणांसाठी...