Home गाजावाजा स्पेशल Uttar Pradesh : बाजीराव पेशवे, १८५७ चा उठाव आणि युपीमधलं मराठी गाव….
गाजावाजा स्पेशल

Uttar Pradesh : बाजीराव पेशवे, १८५७ चा उठाव आणि युपीमधलं मराठी गाव….

13
Uttar Pradesh

सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक संघर्ष पेटलेला असताना अनेक हिंदी भाषिक लोकही मराठीच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. अशातच मी जर तुम्हाला सांगितलं की, हिंदी भाषिक पट्ट्याची राजधानी असलेल्या उत्तर प्रदेशमधलं एक गाव पूर्णपणे मराठी आहे तर? आश्चर्य वाटलं ना ? पण हो महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर या गावात मराठी फक्त बोलली नाही जात तर इथे मराठी रूढी परंपरा आजही जपल्या जातात. शिवाय या गावाला मराठ्यांचा मोठा इतिहास आहे. कोणतं आहे ते गाव आणि काय आहे या गावातल्या मराठी भाषिकांची गोष्ट ? जाणून घेऊ. (Uttar Pradesh)

तर महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर आणि कानपुरपासून अगदी २०-२५ किलोमीटरवर असलेल हे गाव म्हणजे बिठूर ! यालाच ब्रम्हावर्त म्हणूनही ओळखलं जातं. बिठूरचा शाब्दिक अर्थ बीरों का थौर असा आहे म्हणजेच शूरांची भूमी! आणि हे अगदी खरं आहे कारण बिठूरला तसा ऐतिहासिक वारसा लाभलाय. इतिहासातील काही धाडसी शूरवीर या बिठूरशी संबंधित आहेत. या व्यक्तींबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जाऊन इतिहासात डोकवावं लागेल. (Uttar Pradesh)

त्याच झालं असं की, १८१८ साली इंग्रजांनी पुण्यावर झडप घातली आणि मराठ्यांचं साम्राज्य कोलमडल. त्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना रणांगणातून पळून जाण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता. दौलतराव शिंदे, नागपूरकर भोसले यांच्याकडून त्यानं मदतीची अपेक्षा होती. पण इंग्रजांनी त्यांच्यासठी सगळे रस्ते बंद केले. शेवटी त्यांनी नर्मदा पार करायचं ठरवलं. पण त्यांचा हा प्रयत्नही फसला. शेवटी त्यांनी १ जून १८१८ रोजी इंग्रज अधिकारी माल्कमशी तह केला. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब तर होतंच शिवाय तब्बल अडीच हजार लोकांचा लवाजमाही होताच. पुण्यातल्या लोकांमध्ये पुन्हा उठाव नको म्हणून इंग्रजांनी बाजीरावांना महाराष्ट्राबाहेर नेण्याचं ठरवलं. (Top Stories)

Uttar Pradesh

मग बुंदेलखंडात ठिकठिकाणी युद्ध सुरु असल्यामुळे बाजीरावांना राजस्थान मार्गे उत्तरेत नेण्यात आलं. पुण्यातून प्रवास करत करत बाजीराव पेशवे पोहचले उत्तर भारतात. काशी सारख्या तीर्थ क्षेत्रात राहायची त्यांची खूप इच्छा होती, पण इंग्रजांनी या गोष्टीला नकार दिला. शेवटी गंगेकाठी असलेल्या बिठूर या गावात त्यांना थांबवण्यात आलं. लवकुश यांची जन्मभूमी म्हणून ओळखलं जाणारं ब्रह्मावर्त अर्थात बिठूर हे आधीपासूनच तीर्थक्षेत्र होतं. इंग्रजांनी दुसरे बाजीराव पेशव्यांसाठी इथं जवळपास साडेतीनशे एकरात हे गाव वसवलं. त्यांच्यावर नजर ठेवायला एक इंग्रज अधिकारीही नेमला. (Uttar Pradesh)

शिवाय त्यांना वार्षिक ८ लाख रुपये ही मोठी रक्कम पेन्शन म्हणून मंजूर केली. पण एवढी मोठी रक्कम पेन्शन म्हणून देण्यामागे इंग्रजांचा एक विचार होता तो म्हणजे पेशवे घराण्यातले यापूर्वीचे सगळे पुरुष फार जगले नव्हते. त्यामुळे इंग्रजांना वाटल दुसरा बाजीराव देखील फार काळ जगणार नाही, पण इंग्रजांना खोट ठरवत दुसरे बाजीराव पेशवे ७६ वर्षे जगले. आयुष्याचा सगळा उत्तरार्ध त्यांनी बिठूरमध्येच व्यतीत केला. दरम्यानच्या काळात त्यांनी इथेच एक वाद बांधला पुण्याच्या आठवणींनी भारावलेला, आरसे, गालिचे, चिनी वस्तू, झुंबऱ्या आणि पूर्वजांच्या चित्रांनी सजवलेला असा हा वाडा! आणि याला नावही दिलं शनिवार वाडा! पुण्याच्या वाड्याच्या आठवणीत ! त्यांनी बिठूरमध्ये अनेक मंदिर बांधली, गंगाकाठी सुंदर घाट उभे केले.(Top Stories)

मराठ्यांचं वैभव इथेही जपलं. पण त्यांना वारसदार नव्हता. मग त्यांनी मुलगा व्हावा म्हणून अकरा लग्न केली. पण मुलगा झाला नाही. अखेर त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला आणि त्याच नाव ठेवलं नानासाहेब. दुसरे बाजीराव पेशवे बिठूरमध्येच वारले. त्यांच्या समाधीचा घाट आजही इथं उभा आहे. दुसऱ्या बाजीरावांनी इतकी वर्ष इथे काढली इंग्रजांचा अन्याय सहन केला पण त्यांनी कधी इंग्रजांविरुद्ध बंद पुकारला नाही. पण पुढे जाऊन बिठूरच भारतातल्या सर्वात मोठ्या बंडाचं ठिकाण बनलं आणि इथेच पुकारण्यात आला १८५७ चा स्वातंत्र्य उठाव !

===============

हे देखील वाचा : The Maya Mystery : २०१२ ची भविष्यवाणी करणारी रहस्यमयी माया जमात

===============

पेशव्यांसाठी मंजूर केलेली पेन्शन इंग्रजांनी दुसरे बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र, नानासाहेब पेशवे यांना देण्यासाठी नकार दिला. आणि इथेच त्यांच्या मनात बंडाची ठिणगी पेटली. त्यावेळी भारतात असंही कंपनी सरकारविरुद्ध असंतोष होताच. मग हे सगळ्या संस्थानांचे राजे एकत्र आले आणि त्यांनी इथेच बिठूरमध्ये स्वातंत्र्य उठाव सुरु केला. यावेळी झाशीची राणी लक्ष्मीबाई खूप लढल्या. पण १८५७ चा उठाव त्यांना जिंकता आला नाही. त्यानंतर इंग्रजांनी या रागात नानासाहेब पेशव्यांचे वाडे, मंदिर सगळं उद्ध्वस्त केल. (Uttar Pradesh)

पण इतकं होऊनही बिठूरचं मराठीपण संपलं नाही. आजही इथं दोन हजारहून अधिक मराठी कुटुंबं राहतात. कानपूर शहरात जवळपास वीस हजार मराठी लोक आहेत आणि तिथे जाऊनही त्यांनी आपली मराठी संस्कृती जपलीये असं एकंदरीत पाहायला मिळत. गणेशोत्सव, मराठी सण, संस्कृती इथं आजही तितक्याच जोमात साजरे होतात. आजही बिठूर-कानपूर परिसरातली लोक नानासाहेब पेशवे, लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांच्या गाथा अभिमानाने सांगतात. असं म्हणतात मराठ्यांची तलवार जिथपर्यंत गेली नाही, तिथं त्यांच्या पावलांचा ठसा गेला.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....