श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाचे उदाहरण असलेली पुरी येथील भगवान जगन्नाथांची रथयात्रा सुरु झाली आहे. लाखो भाविकांच्या जयघोषात भगवान जगन्नाथ, भाऊ बलभद्र आणि बहिण सुभद्रा हे त्यांच्या रथावर स्वार झाले, आणि ही जगप्रसिद्ध रथयात्रा सुरु झाली. आता 5 जुलैपर्यंत हाच उत्साह आणि जल्लोष पुरी शहरात सर्वत्र दिसणार आहे. पुरीच्या मुख्य मंदिरापासून जल्लोषात सुरु झालेली ही रथयात्रा गुंडीचा मंदिरापर्यंत चालणार आहे. ही रथयात्रा सुरु होण्यापूर्वी पुरीच्या राजांनी ‘छेरा पन्हारा’ नावाचा विधी केला. यामध्ये राजांनी सोन्याच्या झाडूने रथाचा मार्ग स्वच्छ केला. हा विधी नम्रता आणि सेवेचे प्रतीक मानला जातो. यानंतर भगवान जगन्नाथ आपल्या मावशीच्या घरी राहतील. येथे लाडात रहाणा-या भगवान जगन्नाथांना ‘हेरा पंचमी’ च्या दिवशी देवी लक्ष्मी आमंत्रण करायला जाईल, आणि मग त्यांचा पुन्हा मुख्य मंदिरात परतीचा प्रवास सुरु होईल. (Lord Jagannath)

भगवान जगन्नाथांच्या भाविकांचा आभाळाएवढा उत्साह आहे. पुरीमधील सर्वच रस्ते भगवान जगन्नाथमय होऊन गेले आहेत. देश विदेशातील लाखो भाविक पुरीनगरीमध्ये दाखल झाले असून जगन्नाथांच्या नामाचा घोष होत आहे. भगवान जगन्नाथा आपल्या 16 चाकी नंदीघोष रथावर स्वार झाले आहेत. या रथाला जोडण्यात येणारा दोरही खूप भाग्यवान असतो. या दोरीला शंखचूड नाडी असे म्हणतात. या दोरीला स्पर्श कऱण्यासाठी आणि हा रथ ओढण्यासाठी जगन्नाथ भक्त आतूर असतात. याशिवाय या रथयात्रेत भाऊ बलभद्रजींचा 14 चाकांचा “तलध्वज” रथही असून त्याच्या दोरीला बासुकी म्हणतात. तिसरा रथ बहिण सुभद्रेचा असून त्याला 12 चाके आहेत. त्याचे नाव “दर्पदलन” असून त्याला स्वर्णचुडा नाडी नावाची दोरी आहे. या तिनही रथांची दोर ओढण्यास मिळणे हे मोठे भाग्याचे समजले जाते, यासाठी पुरीमध्ये जगन्नाथांच्या भक्तांचा मेळा जमला आहे. (Social News)
पुरीच्या रथयात्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. रथाची दोरी ओढणारा व्यक्ती जीवन आणि मृत्युच्या चक्रातून मुक्त होतो आणि मोक्षाकडे वाटचाल करतो अशी त्यामागे श्रद्धा आहे. या रथयात्रेची सुरुवात बहिण सुभद्रा हिच्या आग्रहानुसार झाल्याचे सांगितले जाते. जगन्नाथ आणि बलभद्र यांनी लाडक्या बहिणीला रथावर बसवून शहरात फिरवले. यावेळी भगवान जगन्नाथ मावशी गुंडीचाच्या घरीही गेले. तिथे सात दिवस राहून ही भावंडं पुन्हा मंदिरात आली. तेव्हापासून ही रथयात्रा काढली जाते, असे सांगितले जाते. त्यामुळे या रथयात्रेत कायम बहिण सुभद्रेचा रथ हा दोन भावांच्या रथामध्ये असतो. यावेळही अशीच भव्य रथयात्रा पुरी नगरीमध्ये काढण्यात आली आहे. यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून विविध धार्मिक विधी करण्यात आले. यात मंगल आरती, सूर्यपूजा, द्वारपाल पूजा आणि देवाला नैवेद्य दाखवण्यात आला. (Lord Jagannath)

राजांनी सोन्याच्या झाडूंनी रथाचा रस्ता साफ केल्यावर मुख्य रथसोहळा विधीला सुरुवात करण्यात आली. रथयात्रेतील रथांचा क्रम हा ठरलेला असतो. त्यानुसार त्यांना ओढण्यात येते. सालबेग यांच्या कबरीसमोर रथयात्रा काही काळ थांबल्यावर भगवान जगन्नाथ आपल्या बहिण भावासह मावशीच्या घरी विश्रांती घेणार आहेत. इथे मावशीच्या घरी भाचे मंडळी आल्यावर जसे त्यांचे लाड केले जातात, तसेच लाड भागवन जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रेचे करण्यात येणार आहेत. मावशीकडे भगवान जगन्नाथांना 56 पदार्थांचा नैवेद्या दाखवण्यात येईल. मग सात दिवस भगवान तिथे आराम करणार आहेत. इथे या दरम्यान मुख्य मंदिर रिकामे राहिल. त्यामुळे देवी लक्ष्मी स्वतः भगवान जगन्नाथ यांना बोलवण्यासाठी त्यांच्या मावशीच्या घरी जाईल. (Social News)
===========
हे ही वाचा : Jagannath Temple : हनुमान हे जगन्नाथ मंदिराचे रक्षक म्हणून ओळखले जातात.
Jagannath Temple : भगवान जगन्नाथाचा रथ या कबरीसमोर का थांबतो !
============
त्यानंतर भगवान जगन्नाथांची रथयात्रा पुन्हा सुरु होईल, आणि ते मुख्य मंदिरात विराजमान होतील. यासर्वात भगवान जगन्नाथ माता गुंडीचा मंदिरात असतांना तेथील प्रसाद घेण्यासाठी पुरीमधील लाखो भाविक गुंडीचा मंदिर परिसरात गर्दी करीत आहेत. पिठाडो आणि रसगुल्ला हे दोन पदार्थ भगवान जगन्नाथांचे आवडते पदार्थ आहेत. याच पदार्थांचा त्यांना नैवेद्य चढवला जातो. आणि हा नैवेद्य घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. माता गुंडीचा ही राजा इंद्रद्युम्नची पत्नी आहे. याच राजा इंद्रद्युम्नने भगवान जगन्नाथांचे मंदिर बांधले आहे. हे मंदिर जगन्नाथ मंदिरापासून 3 किमी अंतरावर आहे. माता गुंडीचा ही भगवान जगन्नाथांची परम भक्त होती. तिनं मोठी तपश्चर्या करुन भगवान जगन्नाथ यांच्याकडून एक वचन घेतले. तेव्हापासून भगवान जगन्नाथ दरवर्षी माता गुंडीचा मंदिराला भेट देतात आणि तिथे 7 दिवस राहून आपले लाड करुन घेतात. (Lord Jagannath)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- America
- Balabhadra
- BJP
- congress
- donald trump
- Entertainment
- india
- information
- International news
- intresting facts about jagganath idol
- jagganath information
- jagganath mandir
- jagganath mandir history
- jagganath mandir rathayatra
- jagganath puri
- jagganath yatra 2025
- jagganathapuri temple
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Lord jagannath
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- mata gundi temple
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Pithado
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Rasgulla
- sister Subhadra
- Social News
- Social Updates
- Temple
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- राजकारण