Home मनोरंजन Shefali Parag: परागच्या प्रेमळ स्वभावर भाळली होती शेफाली; फिल्मी आहे दोघांची प्रेमकहाणी
मनोरंजन

Shefali Parag: परागच्या प्रेमळ स्वभावर भाळली होती शेफाली; फिल्मी आहे दोघांची प्रेमकहाणी

14
Shefali Parag

कांटा गला’ गाणे आणि ‘बिग बॉस’ मुळे प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतला आहे. २७ जून रोजी रात्री शेफालीच्या छातीत दुखू लागल्याने तिचा नवरा परागने तिला दवाखान्यात नेले, मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान शेफालीच्या मृत्यूअनंतर संपूर्ण इंडस्ट्रीमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेफालीचा अचानक झालेला मृत्यू हा सगळ्यांनाच चटका लावणारा आहे. (Marathi News)

शेफालीने २०१४ साली अभिनेता पराग त्यागीसोबत लग्न केले होते. शेफालीने परागसोबत दुसरे लग्न केले होते. तिचे पहिले लग्न मीत ब्रदर्स या प्रसिद्ध गायक जोडीपैकी ‘हरमीत सिंग’शी २००४ मध्ये झाले होते. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दुर्दैवाने २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिने २०१४ मध्ये अभिनेता परागशी लग्न केले. शेफालीने फारच कमी वयात फेम मिळवले होते आणि तिचे पहिले लग्नही कमी वयातच झाले होते. मात्र नंतर तिने परागशी व्यवस्थित विचार करून लग्न केल्याचे सांगितले होते. (Todays Marathi HEadline)

Shefali Parag

या दोघांची प्रेमकहाणी अगदी चित्रपटाला साजेशीच आहे. शेफाली आणि पराग यांची भेट एका पार्टीदरम्यान झाली. तो काळ शेफालीसाठी खूपच कठीण काळ होता, ती घटस्फोटाच्या दुःखातून जात होती. शेफालीला पुन्हा लग्न करायचे नव्हते. पण घटस्फोटानंतर पराग आणि तिची भेट झाली आणि पराग शेफालीच्या आयुष्यात आला. या दोघांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. शेफालीला परागचा साधेपणा सर्वात जास्त आवडला. शिवाय परागचा काळजी घेणारा स्वभाव देखील शेफालीला भावला. आधी ते मित्र बनले आणि नंतर डेटिंग करू लागले. ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. त्यानंतर परागला तिने चार वर्षे डेट केले. पुढे या दोघांनी २०१४ मध्ये लग्न केले. (Latest Marathi NEws)

शेफाली जरीवालाचा नवरा असलेला अभिनेता पराग त्यागी हा एक टीव्ही अभिनेता असून त्याने ए वेडनसडे”, “जोधा अकबर”, “फिर” आणि “सरकारू वारी पाटा” या चित्रपटातही काम केले आहे. परागचा जन्म उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथे झाला. मालिकांसोबतच अनेक चित्रपटांमध्ये परागने काम केले असून, या दोन्ही क्षेत्रात त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Top Stories)

=========

हे देखील वाचा : Shefali Jariwala: ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे धक्कादायक निधन

Shefali Jariwala : हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला कोण आहे?

=========

पराग आणि शेफाली या दोघांनी अनेक रियालिटी शोजमध्ये भाग घेतला आहे. या दोघांनी नच बलिएच्या 5 व्या आणि 7 व्या सीझनमध्ये आपल्या डान्सने सर्वांना प्रभावित केले होते. शेफालीने तिच्या निधनाच्या केवळ ३ दिवस आधीच तिने कमालीचे सुंदर फोटोशूट केले होते. तिचा फिटनेस पण चांगला होता. मात्र तरीही तिला आलेल्या या हृदयविकाराच्या धक्कामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. शेफालीने आपल्या स्वतःच्या हिमतीवर तिचे स्थान या मनोरंजनविश्वामधे निर्माण केले होते. शेफालीची अचानक झालेली ही एक्सिट खूपच चटका लावून जाणारी आहे. (Social Updtaes)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...