Home राज्य Ashadhi Wari : ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा निरा स्नान सोहळा संपन्न
राज्य

Ashadhi Wari : ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा निरा स्नान सोहळा संपन्न

14
Ashadhi Wari

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी एकादशीचे वेध लागले आहे. वातावरण पूर्ण भक्तिमय आणि वारीमय झाले असून सर्वत्र ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोष ऐकू येत आहे. पुण्यामध्ये मुक्कामाला असलेल्या वारीने आता पुढे प्रस्थान केले आहे. जेव्हा वारी सातारा जिल्ह्यात येते तेव्हा तिथे एक अतिशय नेत्रदीपक आणि सुंदर सोहळा पार पडतो, ‘नीरा स्नान’. नुकतेच ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना आज टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तीभावे नीरा स्नान घालण्यात आले. ‘माऊली माऊली’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा आज वाल्हेवरून निघाला. (Marathi News)

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना निरा स्थान घालण्यात आले. पालखी सोहळ्यात निरास्नानाला अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात हा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी नीरा नदीकाठी मोठी गर्दी केली होती. पुणे जिल्ह्यातून कोळी समाजाच्या होडीने तुकाराम महाराजांची पालखी नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते, तेव्हा इथे पादुकांना स्नान घालण्याचा प्रघात आहे. (Todays Marathi Headline)

Ashadhi Wari

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. वाल्हे या गावी मुक्कामी असलेली माऊलींची पालखी लोणंदच्या दिशेने जेव्हा प्रस्थान करते तेव्हा निरा नदीमधील दत्त घाटावर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले जाते. संपूर्ण परिसर ‘माऊली माऊली’च्या जयघोषाने दुमदुमून जातो. या घाटावर माऊलींच्या पादुका पालखीतून बाहेर काढल्या जातात. पादुकांंचं निरा नदीच्या पाण्याने स्थान घातले जाते. गेले अनेकवर्ष या स्नानाची परंपरा सुरु आहे. या स्नानाला पालखी सोहळ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. (Top Marathi HEadline)

पुणे, जेजूरी, वाल्हे करत पालखी लोणंद गावी पोहचते. त्याआधी माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घातले जाते. पूर्वी या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी आल्यावर नदी ओलांडण्यास पूल नव्हता, तेव्हा कोळीबांधव पालखी होडीतून नीरा नदीतून पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ओलांडून द्यायचे आणि नदीच्या पलीकडे घेऊन जायचे. मात्र पुढे काही काळानंतर या नदीवर पूल बांधण्यात आला. त्यानंतर याच पुलावरुन पालखी पुढे जाऊ लागली. पण ही नीरा स्नानाची परंपरा मात्र कायम राखली गेली. आजही कोळीबांधवांचा सन्मान म्हणून तुकाराम महाराजांच्या पादुकांना दरवर्षी निरास्नान घातले जाते. (Marathi Latest NEws)

=============

हे ही वाचा : Odisha : भगवान जगन्नाथांच्या ध्वजाचे रहस्य !

============

आषाढी वारीच्या मार्गांमध्ये एकूण तीन वेळा ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते. सगळ्यात आधी आळंदीतून प्रस्थान होण्याआधी माऊलींच्या पादुकांना इंद्रायणी नदीमध्ये स्नान घातले जाते. त्यानंतर निरा नदीमध्ये स्नान घातले जाते आणि शेवटी पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये स्नान घातले जाते. दरम्यान येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे. यादिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय इतमामात विठ्ठल आणि रुक्मिणी यांची पूजा होईल. (Social News)

Recent Posts

Related Articles

Monsoon
राज्य

Monsoon : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट

यंदा मे महिन्यात जवळपास संपूर्ण राज्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. संपूर्ण...

Indrayani River
राज्य

Indrayani River : इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुल कोसळून चार जणांचा दुर्दैवी अंत

सध्या सतत विविध अपघातांच्या बातम्या कानावर येत आहे. दुर्घटनांची मालिका थांबण्याचे नावच...

Vaishnavi Hagawane
राज्य

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सुशील हगवणेला जामीन मंजूर

जवळपास एक महिन्याभरापासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र्रात कमालीचे गाजत आहे....

Mumbai Local
राज्य

Mumbai Local : लोकल प्रवासात २० वर्षात तब्बल ५० हजारांहून अधिक लोकांनी गमावला जीव

९ जून रोजी मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर दिवा स्थानकाजवळ कसारा ते सीएसएमटी...