इस्राएल आणि इराण यांच्यामध्ये होणाऱ्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. मागील अनेक दिवसांपासून या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले मात्र हे युद्ध काही शमण्याचे नाव घेत नाही. अशातच आता या युद्धामध्ये अमेरिकेने उडी घेतली आहे. या युद्धामध्ये अमेरिका इस्रायलला पाठिंबा देत असून, इराणच्या विरोधात उभी आहे. शनिवारी अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ला केला आहे. अमेरिकेने इराणच्या या तीन अणुऊर्जा केंद्रांना उद्ध्वस्त करण्यासाठी १४ टन वजनाचे बंकर बस्टर बॉम्ब वापरले आहेत. (America)
शनिवारी मध्यरात्री अमेरिकेने इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला असून, यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुस्थळांचा समावेश आहे. हे हल्ले अमेरिकन हवाई दलाच्या सर्वात प्रगत समजल्या जाणाऱ्या फायटर जेट बी२ बॉम्बर्सने केले गेले आहेत. सांगितले जात आहे की, या बॉम्बर्सनी या तीन ठिकाणी हजारो किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब टाकले. हे बॉम्ब बंकर बस्टर बॉम्ब म्हणून प्रसिद्ध आहेत. या बॉम्बला एमओपी अर्थात मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर असेही म्हणतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील कोणत्याही सैन्याकडे ही क्षमता नव्हती, असा दावा देखील केला आहे. जाणून घेऊया या बंकर बॉम्बची खास वैशिष्टये. (Marathi News)
बंकर बस्टर बॉम्बचे दुसरे नाव MOP (GBU-57A/B मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर) आहे. एमओपी एक ३०००० पाउंड वजनाचा मोठा बॉम्ब आहे. हा बॉम्ब शत्रूच्या अंडरग्राउंड असणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी वापरला जातो. शेकडो फूट जमिनीच्या आत घुसण्याची या बॉम्बची क्षमता आहे. हा बॉम्ब जिथे टाकला जातो तिथे, तो जमिनीत जाऊन स्फोट करतो. त्यामुळे बंकरमध्ये असलेली जागा पूर्णपणे उद्ध्वस्त होते. ६० फूट जाडीचा काँक्रीटचा थरदेखील हा बॉम्ब फोडू शकतो. (Todays Marathi Headline)

बंकर बस्टर हा बॉम्ब अतिशय दणकट अशा स्टीलच्या मिश्र धातूपासून बनलेला असतो. अमेरिकन हवाई दलाच्या माहितीनुसार, एमओपी बॉम्ब जीपीएस गाइडेड आहे आणि ते फक्त बी-२ स्पिरिट स्टील्थ बॉम्बरनेच टाकता येते. बी ३ बॉम्बर रडारलाही चुकवत लांबचा टप्पा गाठू शकतो. हवेत इंधन भरुन लक्ष्यापर्यंत जातो. शत्रूच्या बंकरमध्ये बांधलेले लष्करी तळ, जे लोखंडापेक्षाही मजबूत आहेत, ते या बॉम्बमुळे काही मिनिटांत नष्ट करता येते. हा बॉम्ब खूप जाड आणि मजबूत रचनेचा बनलेला आहे. आतापर्यंत अमेरिकेने एमओपी बॉम्ब वापरल्याची अधिकृत माहिती जगाला सांगितलेली नाही. लष्करी तज्ज्ञांनुसार, हा बॉम्ब आधीच्या तुलनेत अधिक प्रगत झाला आहे. (Top Marathi Headline)
बंकर बस्टर हा बॉम्ब जवळपास २०० फूट जमिनीत जाऊन स्फोट घडवून आणतो. मागील २० वर्षांत या बॉम्बमध्ये अनेक बदल करुन त्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. इराणने जमिनीखाली १५० ते ३०० फूट खोलवर असलेल्या नतान्झ आणि फोर्डो अणुऊर्जा केंद्रांवर अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसे युरेनियम तयार करण्यासाठी एक कारखाना उभारला होता. हा बॉम्ब इथेच जमिनीवर टाकण्यात आला आणि तिथे पडल्यानंतर स्फोट झाला. या बॉम्बमुळे भूमिगत टार्गेटला भेदणे सोपे जाते. (Marathi Latest News)
=========
हे देखील वाचा : Reza Pahlavi : इस्रायल-इराण युद्धात राजकुमाराची एन्ट्री !
=========
इतका जड बॉम्ब बनवण्याचे कारण म्हणजे तो टारगेटवर आदळल्यानंतर केवळ त्याचा पृष्ठभाग तुटत नाही. जेव्हा स्फोटक खाली जाऊन स्फोट करतात तेव्हा टारगेट पूर्णपणे नष्ट करता येते. B2 बॉम्बर विमान 30 हजार पौंड वजनाचे असे त्यात असे दोन बॉम्ब वाहून नेले जाऊ शकते. १९८७-८८ मध्ये नॉर्थ्रॉप ग्रुमन कंपनीने बी-२ बॉम्बर्स बनवले होते. हे बॉम्बर्स अमेरिकेतील मिसूरी येथील व्हाईटमन एअर फोर्स बेसवर तैनात आहेत. अमेरिकेकडे असे १५ ते २० बॉम्बर्स असल्याचे मानले जाते. सध्या अमेरिकन हवाई दलाकडे १९ अॅक्टीव्ह बी२ बॉम्बर्स आहेत. ते सबसोनिक वेगाने उड्डाण करतात. मात्र याची रेंज बरीच मोठी आहे. (Top Stories)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- America
- america Banker blaster bomb
- Ashvini Mahangade join politics
- B2 बॉम्बर विमान
- donald trump
- donald trump and war
- International news
- iran
- israel
- israel and iran war
- know about Banker blaster bomb
- Latest International News
- mob bomb
- MOP बॉम्ब
- Narendra Modi
- todays international news
- todays latest international news
- us Banker blaster bomb
- us droped MOP bomb on iran
- US mop bomb
- US strikes on three Iranian nuclear sites
- war
- what is Banker blaster bomb?
- अमेरिका
- अमेरिका आणि इराण
- आंतरराष्ट्रीय
- इराण
- इस्राएल
- इस्राएल आणि इराण युद्ध
- डोनाल्ड ट्रम्प
- नरेंद्र मोदी
- बंकर बस्टर बॉम्ब
- बंकर बॉम्ब
- बंकर बॉम्ब म्हणजे काय?
- बॉम्ब
- युद्ध
- युद्ध आणि बॉम्ब
- राजकारण