Home लाईफ स्टाईल Jagganath Yatra : भगवान जग्गनाथची मूर्ती लाकडापासून का बनवली जाते?
लाईफ स्टाईल

Jagganath Yatra : भगवान जग्गनाथची मूर्ती लाकडापासून का बनवली जाते?

14
Jagganath Yatra | Top Stories

येत्या २७ जूनपासून सुप्रसिद्ध जग्गनाथ पुरी येथील रथयात्रा सुरु होणार आहे. भगवान जगन्नाथ हा श्रीकृष्णाचा आठवा अवतार आहे. त्याच्या मंदिरात लांबून लोक येतात आणि आपल्या सर्व मनोकामना मागतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला जग्गनाथ यात्रा सुरू होते. सध्या या यात्रेची जोरदार तयारी सुरु असून, सगळ्यांनाच या रथयात्रेबद्दल कमालीची उत्सुकता आहे. भगवान जगन्नाथ त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना भव्य रथात बसवून नगरात मिरवले जाते. यालाच रथयात्रा म्हणतात. ही रथयात्रा मुख्य मंदिरापासून सुरु होईल २ किलोमीटर स्थित गुंडीचा मंदिरात समाप्त होते. येथे भगवान जगन्नाथ ७ दिवस विश्राम करतात आणि आषाढ शुक्ल दशमीला रथयात्रा पुन्हा मुख्य मंदिरात परत येते. (Jagganath Yatra)

भगवान जग्गनाथ यांचे धाम हे चारधामांमधील मुख्य धाम म्हणून ओळखले जाते. रथयात्रा सुमारे ३ किलोमीटर अंतर कापते आणि गुंडीचा मंदिरात समाप्त होते, जिथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा ९ दिवस राहतात. जगन्नाथाचा हा रथोत्सव तब्बल १० दिवस सुरू राहतो. आषाढी एकादशीला या उत्सवाची सांगता होते. कोणत्याही कारणास्तव जगन्नाथ रथयात्रा खंडीत झाली, तर पुढील १२ वर्षांपर्यंत या यात्रेचे आयोजन केले जात नाही. आज या लेखातून आपण भगवान जग्गनाथ यांच्या लाकडी मूर्तीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. (Marathi News)

भगवान जगन्नाथाची मूर्ती लाकडाची का असते?
भगवान जगन्नाथाची मूर्ती लाकडाची आहे. हे एका खास लाकडापासून बनवले जाते, ज्याला आपण कडुलिंबाच्या नावाने ओळखतो. त्यांची मूर्ती 11 कडुलिंबाच्या झाडांपासून तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती लाकडाची असण्यामागे देखील खास कथा आणि कारण आहे. धार्मिक मान्यतेनुसार असे सांगितले जाते की, भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पार्थिव शरीराचे तुकडे अस्थी गंगेत विसर्जित करण्यात आल्या. त्याचेच अवशेष गंगेतून वाहून समुद्रात मिसळले. तत्कालीन पुरीचा राजा इंद्रद्वीम याला एक स्वप्न पडले. त्याला स्वप्नात भगवान जग्गनाथ दिसले की, ते समुद्रकिनारी असून, तेथे त्यांना समुद्रात एक विशाल वृक्षाचे खोड तरंगताना दिसत आहे. (Todays Marathi Headline)

Jagganath Yatra

मग पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री राजाला हेच स्वप्न दिसले आणि त्यात एक संदेश देखील होता. स्वप्नात राजाला भगवान जग्गनाथ यांच्याकडून एक संदेश मिळाला की, ‘तू मला यातून निर्माण करून स्थापित कर.’ मग राजाने आपल्या मंत्र्यांशी या विषयावर चर्चा केली आणि कारागीर शोधण्यासाठी सेवकांना पाठवण्यात आले. त्यानंतर भगवान विश्वकर्मा यांनी त्याचे रूप बदलले आणि ते स्वतः मूर्ती तयार करण्यास आले. परंतु त्यांनी काही अटी घातल्या, ते म्हणाले की मी जोपर्यंत मूर्ती घडवत नाही तोपर्यंत कोणीही त्या खोलीचा दरवाजा उघडणार नाही. जरी सहा महिने उलटले तरी खोलीचे दार उघडले जायला नको. जर कोणी दार उघडले तर ते काम जसे असेल तसे सोडून जातील. ही अट मान्य केल्यानंतर विश्वकर्मा यांनी कामाला सुरुवात केली. (Marathi Latest News)

इकडे अनेक दिवस उलटेल तरी काही खबर नाही म्हणून इंद्रद्वीम राजाच्या राणीला शंका निर्माण होऊ लागली. अखेर राणीने त्या खोलीचे दार तोडण्याची आज्ञा दिली. राणीच्या आज्ञेवरून दार तोडण्यात आले. ज्यामध्ये भगवान जगन्नाथाची मूर्ती पूर्ण झाली पण अजून दोन मूर्ती बनवल्या जात होत्या त्या अपूर्ण राहिल्या. विश्वकर्मा यांनी त्यांच्या अटींवर दार तोडल्यामुळे काम अर्धवट टाकले आणि ते निघून गेले. ते गेल्यावर राजा इंद्रद्वीम याला हुरहूर लागली. अर्धवट मूर्तींमुळे त्यांना चैन येईना. (Top Marathi Headline)

तेव्हा एक दिवस रात्री राजा इंद्रद्वीम याला पुन्हा भगवान जगन्नाथ यांनी पुन्हा स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांनी सांगितले की, ‘तू मला जशा मूर्ती आहेत तशाच स्थापित कर’.तेव्हा इंद्रद्वीम राजाने जगन्नाथ पुरीमध्ये त्या अर्धवट मूर्तींची स्थापना केली. ज्या लाकडाने त्या मूर्ती बनल्या होत्या ते कडुलिंबाच्या झाडाचे लाकूड होते. म्हणून भगवान जगन्नाथाची मूर्ती फक्त लाकडाची आहे. आजही ही प्रथा पाळली जाते. आजसुद्धा ही शिल्पे कडुलिंबाच्या लाकडापासून बनवली जातात. जगन्नाथ मंदिराचे मुख्य पुजारी प्रथम नवीन मूर्तींसाठी योग्य झाडांची निवड करतात. झाडे फक्त कडुलिंबाची असावीत, जी किमान १०० वर्षे जुनी असावीत आणि त्यात कोणत्याही प्रकारचा दोष नसावा. ही झाडे तोडून मंदिरात आणली जातात. त्यानंतर लाकडाला तीन देवतांचे आकार दिले जातात. (Top Stories)

===========

हे देखील वाचा : Odisha : भगवान जगन्नाथाचे रहस्यमयी स्वयंपाकघर !

Odisha : भगवान जगन्नाथांच्या ध्वजाचे रहस्य !

===========

देवाच्या डोळ्यांवर पापण्या नाही
भगवान जगन्नाथाची मूर्ती पाहिली तर लक्षात येते की, देवाच्या डोळ्यांच्या पापण्या नाही. त्याचा हातही नेहमी समोरच राहतो. याबाबत जाणकारांनी सांगितले आहे की, प्रत्यक्षात भगवान जगन्नाथ यांनी स्वप्नात सांगितले होते की, माझी नजर सदैव भक्तांवर राहील, त्यामुळे माझ्या डोळ्यांवर पापणी पडणार नाही आणि मी सदैव जागृत राहीन. म्हणून त्याला जगन्नाथ असे नाव पडले आहे. माझी जी मूर्ती घडवली जात आहे, ती मी भक्ताला आशीर्वाद देण्यासाठी नाही तर त्याला मिठी मारण्यासाठी तयार होत आहे. तेव्हापासून त्याचा हात समोरच्याच स्थितीत राहतो, जणूकाही भक्त त्याला मिठी मारत आहे. (Social News)

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....