Home गाजावाजा स्पेशल Bihar Mid Day Meal : आणि अचानक शाळेत मुलं जमिनीवर कोसळले…
गाजावाजा स्पेशल

Bihar Mid Day Meal : आणि अचानक शाळेत मुलं जमिनीवर कोसळले…

12
Bihar Mid Day Meal | Latest Marathi News

एका खेडे गावातली आठ दहा वर्षांची एक मुलगी खोडकर हट्टी पण निरागस, एक दिवशी तिची तिच्या शाळेतल्या एका मैत्रिणी सोबत भांडण होतात, ती मैत्रिणीच्या कपड्यांवर शाई टाकते. यामुळे दोघींमध्ये भांडण होतात. शाळेच्या मुख्याध्यापिका तिला तिच्या मैत्रिणीची माफी मागायला सांगतात. पण ती आधी सांगितलं तसं हट्टी ती माफी मागायला नकार देते. यावर प्रिन्सिपल तिला म्हणतात की जोपर्यंत ती माफी मागणार नाही, तोपर्यंत तिला शाळेत मिळणारं जेवण मिळणार नाही. यावर ती शाळेतून आपल्या घरी पळून जाते. आणि काही वेळानंतर घरातून बाहेर निघाल्यानंतर तिला रस्त्यावरून प्रिन्सिपल धावत जाताना दिसतात. ती आठ दहा वर्षांची मुलगी शाळेत पोहचते तेव्हा शाळेच्या मैदानावर अनेक मूल मुली तिला जमिनीवर पडलेले दिसतात. त्यात तिच्या मैत्रिणीचाही मृतदेह असतो. ही स्टोरी एक शॉर्ट फिल्मची आहे. जीचं नाव आहे, बिट्टू पण ही खरी घटना घडली होती. बिहारच्या एका छोट्याशा गावात. जेव्हा शाळेत अचानक २३ निरागस मुलांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं होतं? या भयानक घटनेची कहाणी जाणून घ्या.(Bihar Mid Day Meal)

ही कहाणी आहे बिहारच्या धर्मासती गंडामन या छोट्यशा गावातल्या एका शाळेतली, त्या दिवशी सकाळी शाळेत खूपच आनंदी वातावरण होतं. कारण त्या दिवशी शाळेत एक छोटा कार्यक्रम होता. प्रिन्सिपल मीना देवी आणि तिचा नवरा अर्जुन राय मुलांना पुस्तकं वाटणार होते. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त मुलं शाळेत आले होते. रोजच्या जेवणाची तयारी सुरू होती. शाळेत रोज मुलांना मिड डे मिल दिलं जायचं. स्वयंपाकीण पन्ना देवीने कढईत तेल टाकलं, पण तेलातून काहीतरी विचित्र वास येत होता. तेलाचा रंगही काळा पडला होता. पन्ना देवीने घाबरत प्रिन्सिपल मीना देवीला ही गोष्ट सांगितली. पण मीना देवीने काहीच गांभीर्याने घेतलं नाही. ती म्हणाली, “तेल माझ्या दुकानातूनच आलंय. कदाचित जुनं असेल, राईचं तेल जुनं झालं की असंच काळं पडतं.” तिने पन्ना देवीला जाऊन जेवण बनवायला सांगितलं.(Top Stories)

जेवण बनलं – बटाटा -सोयाबीनची तरीवाली भाजी आणि भात. दुपारची जेवणाची घंटा वाजली, आणि मुलं रांगेत बसली. मुलांना जेवण वाढण्यात आलं. पण मुलांना जेवणाची चवं विचित्र वाटली. काही मुलांनी प्रिन्सिपलकडे तक्रार केली, “मॅडम, जेवणात काहीतरी गडबड आहे.” पण मीना देवीला वाटलं, मुलं फक्त नखरे करतायत. तिने मुलांना दटावलं, “जेवण ठीक आहे, खा आणि गप्प बसा!” मुलांनी जेवण खाल्लं, पण अर्ध्या तासातच सगळी मुलं आजारी पडायला लागली. काहींना उलट्या झाल्या, काहींना पोटात दुखायला लागलं. काही वेळातच मुलं बेशुद्ध पडायला लागली.(Bihar Mid Day Meal)

Bihar Mid Day Meal Tragedy

शाळेत कोणतीही मेडिकल सुविधा नव्हती. प्रिन्सिपल मिना देवी घाबरली, आणि त्यांनी मुलांच्या पालकांना बोलावलं आणि मुलांना हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलं! पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. इयत्ता १ ली ते ५ वी मधली १६ मुलं शाळेतच मृत्युमुखी पडली. त्याचं मैदानात ज्या मैदानात ते काही तासांपूर्वी खेळत होते. हॉस्पिटलला पोहोचलेल्या चार मुलांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आणि पुढच्या काही दिवसांत आणखी तीन मुलांचा मृत्यू झाला. एकूण २३ मुलं या घटनेत मरणं पावली… यात स्वयंपाकीण पन्ना देवीची स्वतःची दोन मुलंही होती. एकाच कुटुंबातले नऊ मुलं गेली. गावात हाहाकार माजला.(Top Stories)

दुसऱ्या दिवशी, १७ जुलैला, गावकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी शाळेविरुद्ध आंदोलन केलं. संतापलेल्या जमावाने मृत मुलांना शाळेच्या आवारातच दफन केलं. पोलिस स्टेशनवर दगडफेक झाली, चार पोलिस गाड्या जाळल्या गेल्या. रेल्वे रुळ अडवले गेले, आणि बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुतळे जाळले गेले. सगळ्या बिहारात मिड-डे मील योजना बंद करा, अशी मागणी जोर धरू लागली. तत्कालीन शिक्षणमंत्री पी. के. शाही यांनी असं विधान केलं की, “राज्यात हजारो शाळा आहेत, प्रत्येकवेळी जेवणाची तपासणी करणं अशक्य आहे. ही घटना दुर्दैवी आहे, पण यात काही षड्यंत्र असण्याचीही शक्यता आहे.” त्यांनी प्रिन्सिपल मीना देवी आणि तिच्या नवऱ्यावर, संशय व्यक्त केला.(Bihar Mid Day Meal)

बिहार सरकारने तात्काळ पावलं उचलली. मृत मुलांच्या कुटुंबियांना दोन लाखांची मदत जाहीर केली.मीना देवीला तात्काळ निलंबित करण्यात आलं. तिच्यावर आणि तिच्या नवऱ्यावर, अर्जुन राय, यांच्यावर गुन्हा दाखल झाला. दोघंही फरार झाले, पण २४ जुलैला पोलिसांनी त्यांना छपरामधून पकडलं.

================

हे देखील वाचा : Blaise Metreweli : ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा कुठल्या महिलेच्या हातात !

================

२३ मुलांच्या मृत्यूमागे खरंच काही कटकारस्थान होतं का? जेव्हा याचा शोध लावला गेला तेव्हा असं समोर आलं की,जेवणात ऑर्गेनोफॉस्फेट नावाचं कीटकनाशक मिसळलं गेलं होतं. ते कोणी मिसळलं नक्की झालं काय होतं? तर शाळेत राशन ठेवायला जागा नव्हती, त्यामुळे सगळं सामान principle मीना देवीच्या घरी ठेवलं जायचं. त्या दिवशी अर्जुन रायने म्हणजेच मिना देवीच्या नवऱ्याने शेतासाठी मोनोक्रोटोफॉस नावाचं कीटकनाशक आणलं होतं. ते त्याने राशनच्या सामानात ठेवलं. पन्ना देवी जेव्हा तेल आणायला गेली, तिने चुकून कीटकनाशकाचा डबा उचलला, जो राईच्या तेलासारखाच दिसत होता. आणि त्या डब्यातलं कीटकनाशक जेवणात मिसळलं गेलं. मुलांनी केलेल्या तक्रारींकडेही दुर्लक्ष झालं, आणि ही चूक २३ मुलांच्या मृत्यूचं कारण ठरली.(Bihar Mid Day Meal)

ही एक भयंकर चूक होती, पण यात कोणतंही षड्यंत्र नव्हतं. तरीही लोकांचा राग शांत झाला नाही. २५ ऑगस्ट २०१६ रोजी छपरा कोर्टाने मीना देवीला दोषी ठरवलं. तिला अनावधानाने केलेल्या हत्येच्या आरोपाखाली १७ वर्षांची शिक्षा आणि साडेतीन लाखांचा दंड ठोठावला गेला. अर्जुन रायला पुराव्याअभावी सोडण्यात आलं. (Top Stories)

या घटनेनंतर मिड-डे मील योजनेत काही कडक नियम लागू झाले. राशनच्या प्रत्येक सप्लायमधून सॅम्पल टेस्टिंगसाठी व्हायचं, आणि शिक्षकांनी मुलांना जेवण देण्याआधी स्वतः खाऊन पाहायचं, असं ठरलं. पण या सगळ्याचा आता काय उपयोग? २३ मुलं परत येणार नव्हती. ही घटना आजही एक भयंकर शोकांतिका म्हणून लोकांच्या लक्षात आहे, एका निष्काळजीमुळे निरागस जिवांचा मृत्यू झाला.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....