ओडिशातील पुरी येथे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भगवान जग्गनाथ रथयात्रा काढली जाते. यावर्षी ही भव्य रथयात्रा २७ जून २०२५ रोजी होणार आहे. ही रथयात्रा अतिशय पवित्र आणि मानाची असते. त्यामुळेच या रथयात्रेमधे सहभागी होण्यासाठी, तिला पाहण्यासाठी भगवंताचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून असंख्य भाविक पुरीमध्ये येतात. चार धामपैकी एक मुख्य धाम असलेल्या पुरीमध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांचे मोठे बंधू बलराम आणि लाडकी बहीण सुभद्रा यांची मोठी रथयात्रा काढली जाते. संपूर्ण वर्षभर या रथयात्रेची वाट पाहिली जाते. या रथयात्रेच्या काळात अशा अनेक परंपरा असतील, ज्या पाहून आणि जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (Marathi NEws)
भगवान जग्गनाथ यांचे पुरी येथील मंदिर आणि या मंदिरातील देवाची मूर्ती याबद्दल अनेक वैशिष्ट्य जगभरात प्रसिद्ध आहेत. पुरी येथे स्थित हे मंदिर म्हणजे देवाचा एक प्रकारचा चमत्कारच समजला जातो. जशी या मंदिराची काही वैशिष्ट्ये, आश्चर्यकारक माहिती प्रसिद्ध आहेत, तसेच या रथयात्रेशी संबंधित काही परंपरा आणि रूढी देखील प्रसिद्ध आहे. अतिशय वेगळ्या आणि अनोख्या गोष्टी या रथयात्रेच्या काळात भाविकांना अनुभवायला मिळतात. त्यामुळे ही रथयात्रा कायमच खास असते. आज आपण या लेखातून या रथयात्रेसंदर्भातीलच काही अनोख्या गोष्टी जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
असे सांगितले जाते की, भगवान श्रीकृष्ण आपले बंधू बलराम आणि बहिणी सुभद्रासह त्यांच्या मावशीला भेटण्यासाठी पुरीला आले असताना येथे १५ दिवस या तिघांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर राजवैद्यांच्या औषधांनी हे तिघा भाऊ-बहीण बरे झाले. यानंतर ते सर्व जण शहरात फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांचा हाच फेरफटका म्हणजे भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा. हीच परंपरा आजही पाळली जात आहे. याच कारणाने हे तिघं १५ दिवस एकांतात जातात. या पंधरा त्यानंतर ते रथयात्रेवरून शहराच्या दौऱ्यावर निघतात. या रथयात्रेची एक खास गोष्ट म्हणजे यामध्ये वापरले जाणारे रथ दरवर्षी नवीन केले जातात. मुख्य म्हणजे या रथाचे लाकूड साध्या कुऱ्हाडीने नव्हे, तर सोन्याच्या कुऱ्हाडीने कापले जाते. (Marathi Trending News)

रथ तयार करण्यासाठी वापरले जाणारे लाकूड सोन्याच्या कुऱ्हाडीने कापले जाते. साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या शुभ दिवसापासूनच रथ तयार करण्याची सुरुवात होते. रथ पूर्ण होण्यासाठी दोन महिन्यांचा काळ लागतो. रथ बनवण्यापूर्वी लाकडाची निवड केली जाते. त्यासाठी मंदिर समितीचे लोक वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देतात, की त्यांना रथयात्रेच्या रथासाठी लाकडं तोडायची आहेत. (Top Marathi HEadline)
यानंतर पुजारी जंगलात जाऊन रथ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झाडांची पूजा करतात. सुतार समाजातले लोक सर्वांत आधी झाडांना सोन्याची कुऱ्हाड लावतात. या सोन्याच्या कुऱ्हाडीने आधी भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीला स्पर्श केला जातो, त्यानंतर त्या सोन्याच्या कुऱ्हाडीने पहिला घाव घातला जातो. मग नंतर आपल्या सामान्य कुऱ्हाडीनेच लाकूड तोडले जाते. ही परंपरा देखील खूपच जुनी आणि खास आहे. (Marathi Latest News)
==========
हे देखील वाचा : Odisha : भगवान जगन्नाथ मावशीच्या घरी का जातात !
Jagannath Rathyatra : कधी आहे जग्गनाथ रथयात्रा? जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती
==========
एवढेच नाही तर रथयात्रेचा जो मार्ग असतो तो सोन्याचे हॅन्डल असलेल्या झाडूने झाडाला जातो. या झाडूने कोणीही मार्ग झाडू शकत नाही, केवळ राजाचे वंशज असलेल्या लोकांनाच हा मार्ग स्वच्छ करण्याची परवानगी असते. सोन्याला सर्वात उच्च आणि मोठा धातू समजले येते. देवी देवतांमध्ये देखील सोन्याला महत्व आहे. त्यामुळेच या मार्गाची स्वछता सोन्याच्या झाडूने केली जात असल्याचे सांगितले जाते. (Social News)
- 27 june rathyatra
- bhgvan shrikrushn
- Chardham
- gold
- Hindu
- india
- jaggnath puri
- jaggnath puri info in marathi
- jaggnath puri information
- jaggnath puri rath
- jaggnath puri rath and gold
- jaggnath puri yatra
- june 2025
- Odisha
- puri
- rath yatar rath infor
- rathyatra
- rathyatra 2025
- Religious
- Temple
- चारधाम
- जग्गनाथ पुरी
- जग्गनाथ पुरी माहिती
- जग्गनाथ पुरी रथ
- जग्गनाथ पुरी रथ माहिती
- जग्गनाथ पुरी रथयात्रा
- जग्गनाथ पुरी रथयात्रा रथ
- भगवान श्रीकृष्ण
- रथ तयार करणे
- रथयात्रा आणि लाकूड तोडणे
- रथयात्रेची तयारी