Home गाजावाजा Neem Karoli Baba : कैची धाम मेळ्यासाठी भाविकांचा महापूर !
गाजावाजा

Neem Karoli Baba : कैची धाम मेळ्यासाठी भाविकांचा महापूर !

27
Neem Karoli Baba

भगवान हनुमानाचे अवतार म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या नीम करोली बाबांच्या कैची धाम येथे भाविकांचा महापूर आला आहे. उत्तराखंड राज्यातील नैनीताल जिल्ह्यातील हल्दवानी येथे असलेल्या कैची धाम आश्रमात 15 जून रोजी मेळा होणार आहे. या मेळ्यासाठी बाबा नीम करोली यांचे भक्त जगभरातून दाखल झाले आहेत. क्रिकेटपट्टू विराट कोहली, अभिनेत्री अनुष्का शर्मा, अँपलचे स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकरबर्ग सारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे गुरु असलेल्या बाबा नीम करोली यांची लोकप्रियता जगभरात आहे. बाबा नीम करोली यांच्या चमत्काराला आजही कैची धाम आश्रमात अनुभवता येते. त्यामुळेच बाबा नीम करोली यांच्या भक्तांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे सर्वच भक्त 15 जून रोजी होणा-या कैची धाम मेळ्यासाठी दाखल होत असल्यामुळे संपूर्ण हल्दवानी भागाला मोठ्या मेळ्याचे स्वरुप आले आहे. (Neem Karoli Baba)

भगवान हनुमानाचे भक्त असलेल्या बाबा नीम करोली यांच्या कैची धाम आश्रमामध्ये 15 जून रोजी मेळा होत आहे. हल्द्वानी येथील कैंची मंदिराची स्थपना याच दिवशी झाल्यामुळे दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. नीम करोली बाबा हे 20 व्या शतकातील महान संतांपैकी एक मानले जातात. त्यांच्या आश्रमात आजही चमत्कार होतात, असे भाविक सांगतात. नीम करोली बाबा यांना त्यांच्या दैवी शक्तीसाठी ओळखले जाते. (Latest News)

बाबा नीम करोली हे उत्तराखंड राज्यात प्रसिद्ध झाले तरी त्यांचा जन्म हा उत्तरप्रदेशमधील अकबरपूर येथे झाला. 1900 च्या सुमारास बाबा नीम करोली यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यांच्या काही भक्तांच्या मते, बाबांच्या जन्माचे निश्चित वर्ष सांगता येत नाही. त्यांचे मूळ नाव लक्ष्मण नारायण शर्मा होते. एका श्रीमंत ब्राह्मण कुटुंबातील लक्ष्मण शर्मा यांचा लहानपणापासून ओढा अध्यात्माकडे होता. त्यांचे बालपण संपन्न कुटुंबात गेले, पण बाबा लहानपणापासून ध्यान आणि रामनामामध्ये गुंग असायचे. त्याकाळातील प्रथांनुसार लक्ष्मण शर्मा यांचे लग्न वयाच्या 11 व्या वर्षी झाले. पण यानंतर बाबा आपले घर सोडून रानात गेले. तिथे काही वर्ष ध्यान करत असलेल्या लक्ष्मण शर्मा यांना वडिलांनी शोधून पुन्हा घरात आणले. आई-वडिलांच्या आग्रहामुळे ते पुन्हा कौटुंबिक जीवन जगू लागले. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी झाली. काही वर्षानंतर लक्ष्मण शर्मा घराबाहेर पडले. त्यांनी भारतातील अनेक ठिकाणी भेट दिली. या सर्व भागात त्यांच्यातील दैवी शक्तीचा परिचय येऊ लागला. एक दिवस नैनीतालमध्ये ट्रेननं जात असलेल्या लक्ष्मण शर्मा यांना स्टेशन मास्तरनं तिकीट नसल्यामुळे गाडीतून उतरवले. त्या स्टेशनचे नाव नीम करोली होते. (Neem Karoli Baba)

बाबांना गाडीतून खाली उतरवल्यानंतर ही रेल्वे गाडी काहीही केल्या चालू झाली नाही. तेव्हा त्यांना ओळखणा-या एका अधिका-यांनी स्टेशन मास्तरला त्याची चूक सांगितली. त्या दोघांनीही माफी मागून बाबांना गाडीत बसण्याची विनंती केली. बाबा गाडीत बसले आणि गाडी चालू झाली. त्या वेळेपासून त्यांना नीम करोली बाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. बाबा नीम करोली भगवान हनुमानाचे परम भक्त होते. ते कायम हनुमानाचे ध्यान करायचे आणि भक्तांमध्ये असतांना राम नामाचा जप करायचे. नीम करोली बाबा 1961 मध्ये नैनीतालमधील कैंची धाम येथे आले. त्यांनी त्यांच्या मित्रासोबत येथे एक आश्रम बांधला. येथे हनुमानजींचे मंदिर देखील बांधले. येथील हनुमानाची मुर्ती ही कोणी तयार केली नसून साक्षात प्रकट झाल्याचे सांगितले जाते. याच कैंची धाम आश्रमात दरवर्षी 15 जून रोजी कैंची धाम मेळा आयोजित केला जातो. (Latest News)

===========

हे देखील वाचा :  Odisha : भगवान जगन्नाथ मावशीच्या घरी का जातात !

नीम करोली बाबांचे लाखो भक्त या मेळ्याला हजर असतात. गेल्या वर्षी कैंची धाम मेळ्यासाठी 16 तासात सव्वा लाख भाविकांनी बाबा नीम करोली यांचे दर्शन घेतले. यावेळी ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक प्रशासनानं आत्तापासूनच वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. 14 ते 16 जून दरम्यान या भागात मोठी गर्दी असणार आहे. त्यामुळे येथून सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नीम करोली बाबाचे आश्रम कैंची, भूमिधर, काकरीघाट, कुमाऊँ हिल्समधील हनुमानगढ़ी, वृंदावन, ऋषिकेश, लखनौ, सिमला, आणि दिल्ली येथे आहेत. सोबतच अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमधील ताओस येथेही बांबांचा आश्रम आहे. (Neem Karoli Baba)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Pak Vs Afghan
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Pak Vs Afghan : ग्रेटर अफगाणिस्तानच्या नकाशामुळे पाकिस्तानमध्ये पळापळ !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता या तणावात आणखी भर...

Prince Andrew
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Prince Andrew : एक राजकुमार अखेर जमिनीवर आला !

ब्रिटीश राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांना अखेर जमिनीवर...

America
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

America : या माणसाने ४३ वर्ष अमेरिकेच्या तुरुंगात घालवली !

सुब्रमण्यम वेदम, या भारतीय वंशी व्यक्तिची शोकांतिका सध्या सोशल मिडियावर सर्वाधिक चर्चेत...