जॉर्डन हा देश त्याच्या समृद्ध इतिहासासाठी आणि अद्वितीय संस्कृतीसाठी ओळखला जातो. यामुळे जॉर्डनमध्ये पर्यटनासाठी जाणा-यांची संख्या अधिक आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले पेट्रा शहर, मृत समुद्र, अकाबा किनारा, प्राचीन रोमन शहर जेराश, राजधानी अम्मान, माउंट नेबो, मदाबा, अझरक वेटलँड या सर्व ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. जॉर्डनचा इतिहास हा कायम उत्सुकतेचा विषय राहिला आहे. लोहयुगापासूनच्या खुणा या देशात पहायाला मिळतात. (Jordan)

ग्रीक-रोमन काळात ट्रान्सजॉर्डनमध्ये अनेक शहरे स्थापन झाली. नंतर, बायझंटाईन राजवटीच्या समाप्तीनंतर, हा प्रदेश रशिदुन, उमय्याद, अब्बासीद आणि तुर्कस्तानच्या इस्लामिक खलिफांचा भाग बनला. या देशावर अनेक राज्यकर्ते आले तरी जॉर्डनमधील इतिहासाच्या खुणा कायम राहिल्या. आज त्यातीलच काही खुणा पुन्हा शोधण्यात येत आहेत. याच जॉर्डनमध्ये तब्बल 1500 वर्षापूर्वी गडप झालेले शहर पुन्हा शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. दीड हजार वर्षापूर्वीची संस्कृती त्यामुळे पुन्हा अभ्यासता येणार आहे. मानव इतिहासासाठी हा शोध मोठा असून यामुळे जॉर्डनच्या पर्यटन व्यवसायालाही सोन्याचे दिवस येणार आहेत. (International News)
जॉर्डनमध्ये एक 1500 वर्षापूर्वीचे शहर शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. थराईस नावाचे हे शहर बायइंटाईन साम्राज्याचा भाग होते. बायझंटाईन राजवटीच्या कालखंडात या सर्व भागात संपन्नता नांदत होती. त्याच काळातील थराईस हे शहर फक्त नकाशांच्या आधारे शोधण्यात आले आहे. बायझंटाईन साम्राज्याचे हरवलेले थराईस शहर म्हणजे, जॉर्डनच्या संस्कृतीचे जनक म्हटले जाते. या शहराचा शोध घेण्यासाठी 1500 वर्षे जुना नकाशा वापरण्यात आला. थराईस शहराचा शोध घेण्यासाठी दीड हजार वर्ष जुन्या मदाबा मोज़ेक नकाशाचा वापर करण्यात आला. (Jordan)

बायझंटाईन साम्राज्यात 527-565 या कालावधीत सम्राट जस्टिनियनच्या कारकिर्दीत हा नकाशा तयार करण्यात आला होता. या नकाशात जॉर्डनमधील 157 धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे दाखवण्यात आली आहेत ऐतिहासिक असा हा नकाशा जॉर्डनचा वारसा म्हणून सांभाळण्यात येत होता. आता त्याचा वापर करुन थराईस शहर शोधण्यात आले आहे. ज्या नकाशाचा यात वापर झाला तो नकाशा अस्तित्वात असलेला सर्वात जुना नकाशा असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. यात जी 157 धार्मिक स्थळे दाखवण्यात आली आहेत, ती विशिष्ट पुरातन खुणांच्या आणि चिन्हांच्या रुपात होती. याचा अभ्यास करुन संशोधकांनी थराईस शहर शोधून काढले. या ऐतिहासिक शोधकार्यात मुसल्लम आर., पुरातत्व विभाग आणि मुताह विद्यापीठाचे अल-रावहनेह यांच्या नेतृत्वाखाली चार वर्ष एक मोठी टिम प्रयत्न करीत होती. (International News)
2021 मध्ये ही थराईस शहराची शोध मोहीम सुरु झाली. यात मदाबा मोज़ेक नकाशे वापरले गेलेच, शिवाय जुन्या नकाशाचा अभ्यास करुन काही प्रगत नकाशे तयार करण्यात आले. यासाठी सुरुवातीला थराईस शहराची सीमा काय असेल याचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी मृत समुद्राच्या आग्नेय किनाऱ्याजवळ असलेल्या अल-इराक या शहराभोवती क्षेत्रीय सर्वेक्षण केले. सुरुवातीला या भागात काही फरशांचे अवशेष, काचेच्या वस्तू आणि विविध अवजारांचे अवशेष सापडले. त्यावरुन या शोधाची व्याप्ती वाढवण्यात आली. या भागात माती काढतांना काळजी घेण्यात आली. कारण यातून शहराच्या अवशेषांना धक्का लागेल अशी भीती होती. थराईस हे शहर अत्यंत संपन्न शहर असल्याची नोंद आहे. येथील इमारती या उंच होत्या. (Jordan)
===========
हे देखील वाचा : Israel : इस्रायलचा पॅटर्न आणि मोसादचे प्लॅनिंग !
Leila Khaled : विमान हायजॅक करणारी पहिली स्त्री
===========
त्यामुळे हजारो वर्षानंतर या शहराला शोधतांना त्याचे अवशेष खराब होऊ नयेत म्हणून संशोधकांनी मातीच्या थराचे परिक्षण केले. याच शोधातून संशोधकांना बायझँटाईन बॅसिलिकासारख्या रचना आढळल्या. या रचना म्हणजे, हवेशीर मध्यवर्ती कक्ष असलेल्या उंच इमारती होत्या. या शोधात स्पेन आणि फ्रान्समधील संशोधकही सामील झाले होते. त्यांनी ग्रीक आणि लॅटिन शिलालेख शोधून काढले आहेत. या शिलालेखात उल्लेख केल्याप्रमाणे थराईस शहरात काही काळ खिश्चन समुदायाचीही वस्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. नकाशातील नोंदीनुसार बॅसिलिका चर्चचा शोध घेण्यात आला. यासोबतच थराईस हे व्यापाराचे मोठे केंद्र असल्याचेही या शोधातून स्पष्ट झाले. ऑलिव्ह ऑइल प्रेस, पाणचक्क्या आणि द्राक्षे गाळण्याची उपकरणे येथे मिळाली. या शोधामुळे जॉर्डनच्या इतिहासाला समृद्धीचे नवे पान जोडले गेले आहे. थराईस शहराला बघण्यासाठी आता जगभरातील पर्यटक जॉर्डनकडे जात आहेत. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- Abbasid
- America
- Ancient Roman City of Jerash
- Aqaba Coast
- Azrak Wetland
- BJP
- Byintine
- Capital Amman
- china
- City of Petra
- congress
- cricket
- dead sea
- donald trump
- eknath shinde
- Entertainment
- france
- Greco
- india
- information
- International news
- Jordan
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Madaba
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mount Nebo
- Mumbai
- Narendra Modi
- Olive oil press
- Rashidun
- Roman
- Social News
- Social Updates
- Spain
- Temple
- todays marathi headlines
- Transjordan
- Turkestan
- Uddhav Thackery
- Umayyad
- water mill
- राजकारण