Home मनोरंजन Sunjay Kapoor : संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोण?
मनोरंजन

Sunjay Kapoor : संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोण?

10
Sunjay Kapoor

प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा पती असलेल्या संजय कपूर यांचे अकाली हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीचे मनोरंजनविश्वासोबतच उद्योग जगतात देखील सगळ्यांना मोठा धक्का बसला. संजय कपूर एक लोकप्रिय आणि मोठे व्यक्तिमत्व होते. ते ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या जगातील टॉपच्या कंपनीचे प्रमुख होते. संजय कपूर ऑटो कंपोनंटची निर्मिती करणाऱ्या सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. २०१५ मध्ये वडिलांच्या निधनानंतर त्यांनी या कंपनीची सूत्रे हाती घेतली होती. (Sunjay Kapur)

संजय कपूर यांच्या निधनाच्या बातमीनंतर त्यांची मोठी मालमत्ता आणि कंपनीच्या ३१,००० कोटी रुपयांच्या व्यवसाय साम्राज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. २०१५ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी पदभार स्वीकारला आणि कंपनीला एका मोठ्या उंचीवर नेले. ही कंपनी जगातील अव्वल ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनींपैकी एक मानली जाते. मात्र आता संजय यांच्या निधनानंतर एवढे वैभव आणि इतकी मोठी कंपनी याचे वारसदार कोण असेल? असा प्रश्न विचारला जात आहे. (Marathi NEws)

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, संजय यांच्या या कंपनीची मार्केट व्हॅल्यू सुमारे ३१,००० कोटी रुपये अर्थात सुमारे ४ अब्ज डॉलर्स इतकी असल्याचे सांगितले आहे. यादरम्यान संजय कपूर यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर, शुक्रवारी शेअर मार्केट उघडताच कंपनीचे शेअर्स ७ टक्यांनी घसरले आहेत. आता संजय कपूर यांच्या निधनानंतर या व्यवसायाचे काय होणार? ही कंपनी कोणाच्या हाती जाणार याबद्दल सर्वांनाच बरेच प्रश्न पडत आहे. संजय यांच्या निधनानंतर कंपनीचे गुंतवणूकदार आणि भागीदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यांना शांत करण्यासाठी सोना कॉमस्टारकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. (Todays Marathi Headline)

सोना कॉमस्टारकडून सोशल मीडियावर जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे, ”आम्ही आमच्या ग्राहकांना, कर्मचाऱ्यांना आणि भागधारकांना खात्री देतो की त्यांच्या वारशाचा सन्मान करत सध्याचे कामकाज तसेच चालू राहील. सोना कॉमस्टारमध्ये त्यांनी नियोजित केलेल्या आमच्या ध्येयाला आणि मूल्यांना पुढे नेऊन त्यांचा वारसा जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” (Marathi Top HEadline)

Sunjay Kapoor

दरम्यान संजय कपूर यांचे तीन लग्न झाले होते. संजय कपूर यांचा पहिला विवाह फॅशन डिझायनर नंदिता माहतानी यांच्यासोबत झाला होता. त्यांनी १९९६ मध्ये लग्न केले, पण चारच वर्षांनी २००० साली त्यांचे नाते संपुष्टात आले आणि ते विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी २००३ साली बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर हिच्याशी लग्न केले. या दोघांना समायरा आणि कियान नावाची दोन मुलेही आहेत. मात्र हे नाते देखील टिकले नाही. संजय आणि करिश्मा यांनी २०१६ साली त्यांचा घटस्फोट घेतला. या घटस्फोटाची मोठी चर्चा झाली होती. (Latest Marathi News)

संजय यांनी तिसरे लग्न मॉडेल प्रिया सचदेवसोबत केले. या दोघांना अझारियस नावाचा मुलगा आहे. मुख्य म्हणजे प्रिया यांचा ही घटस्फोट झाला होता. शिवाय त्यांना सफीरा चटवाल नावाची एक मुलगी देखील आहे. संजय यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना अजारियस हा मुलगा झाला. अशा प्रकारे, संजय यांना समायरा, कियान, सफीरा आणि अजारियस ही चार मुलं आहेत. प्रिया सचदेवा आणि ही चारही मुले हेच त्यांचे कुटुंब होते. यांच्यापैकी कोणीही कंपनीचा भाग नसल्यामुळे, त्यांच्याकडे सध्या कंपनीची जबाबदारी जाईल याची शक्यता कमी आहे. (Social News)

=========

हे देखील वाचा :  Amarnath Yatra : बाबा बर्फानींची पहिले दर्शन !

=========

संजय यांना मंदिरा कपूर आणि सुपर्णा मोटवानी या दोन बहिणी आहेत. संजय कपूर यांच्या निधनानंतर आता त्यांचा व्यवसाय त्यांच्या दोन्ही बहिणीच सांभाळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संजय कपूर यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव, एक यशस्वी व्यावसायिक आणि मॉडेल असून, संजय यांनी निधनाआधी केलेल्या मृत्युपत्रात संपत्ती तिच्या नावावर केल्याची माहिती समोर आली आहे. या संपत्तीत हायएंड लक्झरी गाड्या, महागड्या मालमत्ता, शेअर्स, तसेच कौटुंबिक व्यवसायातील हिस्सा यांचा समावेश आहे. त्यामुळे, मृत्युपत्रानुसार त्यांची संपूर्ण संपत्ती प्रिया सचदेव यांनाच मिळण्याची शक्यता दाट आहे. एका माहितीनुसार, त्यांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन आता त्यांची पत्नी प्रिया सचदेव यांच्याकडे सोपवले जाईल. (Bollywood News)

मीडिया मधील काही रिपोर्ट्सनुसार संजय यांनी त्यांच्या सर्व मुलांसाठी आधीच योजना आखून ठेवली होती. करिश्मा आणि संजय यांची मुलं समायरा आणि कियान यांना संजय यांनी आधीच १४ कोटी रुपयांचे बाँड दिले आहेत. याशिवाय, दोघांनाही प्रत्येकी दरमहा १० लाख रुपये दिले जात आहे. या आर्थिक सहाय्याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Celebrity News)

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...