मुलीचं लग्न ही प्रत्येक वडिलांसाठी आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. लाडक्या लेकीला भेट स्वरुपात काय देऊ आणि काय नको, असे वडिलांना होऊन जाते. काही ठिकाणी मुलीला हुंडाही दिला जातो. या हुंड्यामध्ये सोनं, चांदी, टिव्ही, फ्रीज अशा वस्तूंचा समावेश असतो. पण एका वडिलांनी आपल्या मुलीला हुंड्यामध्ये चक्क मांजरी दिल्या आहेत, हे ऐकल्यावर सर्वानाच आश्चर्य वाटेल. व्हिएतनाममधील ही घटना आहे. येथे एका वडिलांनी आपल्या मुलीला हुंडा म्हणून सिव्हेट जातीच्या मांजरी दिल्या आहेत. या मांजरींची किंमत काही कोटींमध्ये असते. 100 मांजरी तब्बल 6 कोटी रुपयांच्या असून या मांजरींच्या विष्ठेपासून जगातील सर्वात महागडी आणि सर्वात चवदार कॉफी तयार केली जाते. आपल्या मुलीनं लग्नानंतर स्वावलंबी व्हावं, यासाठी या सिव्हेट मांजरी आपल्या लाडक्या लेकीला दिल्याचे या पित्यानं सांगितलं आहे. (Civet Cats)

जगभरातील कॉफीप्रेमींना सर्वात चांगली कॉफी कुठली, असा प्रश्न विचारल्यास एकच उत्तर मिळतं, ते म्हणजे, लुवाक कॉफी. या लुवाक कॉफीचे सर्वाधिक उत्पादन व्हिएतनाममध्ये केले जाते. यासाठी सिव्हेट जातीच्या मांजरींचा वापर केला जातो. याच सिव्हेट मांजरी आता चर्चेत आल्या आहेत. कारण व्हिएतनाममधील हाँग ची टॅम या उद्योगपतींनी आपल्या लेकीच्या लग्नात याच सिव्हेट मांजरी हुंडा रुपात दिल्या आहेत. मुलीच्या लग्नात हुंड्यारुपी दिलेल्या या 100 मांजरीमुळे लग्नात आलेल्या सर्वच पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हाँग ची टॅम यांनी यासोबतच आपल्या मुलीला सोन्याची नाणी, 20 हजार डॉलर्स रोख आणि अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स भेट म्हणून दिले. परंतु या सर्वात विशेष ठरल्या त्या सिव्हेट मांजरी. एका सिव्हेट मांजरीची किंमत सुमारे 1.8 अब्ज व्हिएतनामी वॉन म्हणजेच 70 हजार डॉलर्स आहे. त्यामुळे या 100 मांजरींची किंमत सुमारे 6 कोटी आहे. (International News)
व्हिएतनाममध्ये या सिव्हेट मांजरींना खूप मागणी असते. कारण याच मांजरींच्या विष्ठेपासून जगातील सर्वात महागडी कॉफी तयार होते. या मांजरी आपल्या लेकीला हुंडा स्वरुपात देऊन हाँग ची टॅम यांनी आपल्या मुलीला स्वतःचा उद्योग तयार कर, असा सल्लाही दिला आहे. टॅम हे उद्योगपती असून त्यांची मुले ही त्यांच्या व्यवसायात मदत करीत आहेत. मुलीचे लग्न झाल्यावर ती त्यांच्या कुटुंबापासून वेगळी झाली. पण तिनंही स्वतःचा उद्योग सुरु करावा, अशी त्यांची इच्छा आहे. (Civet Cats)
जगातील सर्वात महागडी कॉफी म्हणून लुवाक कॉफी ओळखली जाते. व्हिएतनाममध्ये तयार होणा-या या कॉफीमध्ये सिव्हेट मांजरींचा वापर केला जातो. या मांजरींना प्राकृतिक वावरणात वाढवले जाते. तिथे बहुधा कॉफी चेरीची झाडे लावण्यात येतात. सोबतच सिव्हेट मांजरींना कायम पिकलेली कॉफी चेरी खायला देण्यात येते. या कॉफी चेरीच्या बिया सिव्हेट मांजरीच्या विष्ठेमधून बाहेर आल्यावर त्या काळजीपूर्वक गोळा केल्या जातात. (International News)

या बिया स्वच्छ करुन त्यावर प्रक्रिया करून त्यापासून लुवाक कॉफी बनवली जाते. या कॉफीच्या बियांची किंमत प्रति पौंड $100 ते $600 पर्यंतही असते. व्हिएतनामसोबत चीनमध्येही या सिव्हेट मांजरींना मोठी मागणी आहे. या मांजरींच्या विष्ठेचा वापर चिनमध्ये पारंपारिक औषधामध्येही करण्यात येतो. मात्र या सर्वात या मांजरीना क्रूर वागणूक देण्यात येते, असा आरोप अनेकवेळा प्राणीमित्रांनी केला आहे. असे असले तरी व्हिएतनाम आणि चीनमध्ये या सिव्हेट मांजरींची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. आता याच मांजरींच्या विष्ठेपासून तयार होणारी लुवाक कॉफी हे श्रीमंतांचे आवडते पेय मानले जाते. लुवाक कॉफीला सिव्हेट कॉफीही म्हटले जाते. सिव्हेट मांजरींच्या विष्ठेपासून तयार होणा-या या कॉफीतही दर्जा असतो. ज्याप्रमाणे सिव्हेट मांजरीला कॉफी चेरी खायला देण्यात येतात, त्याप्रमाणे तिच्या विष्ठेतील बियांचा दर्जा ठरवला जातो. (International News)
===========
हे देखील वाचा : China : चीनच्या आणखी एका जैविक शस्त्राची जगभर दहशत !
Warts : सौंदर्यात बाधा ठरणारी चामखीळ काढण्यासाठी घरगुती उपाय
===========
या बिया गोळा केल्यावर त्या कशापद्धतीनं वाळवल्या जातात, यावरही लुवाक कॉफीचा दर्जा ठरतो. शिवाय या बियांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी विशिष्ट तापमानावर भाजल्या जातात. अशा पद्धतीनं तयार झालेल्या लुवाक कॉफीची किंमत 20 ते 25 हजार प्रती किलो असते. म्हणजेच एक कप लुवाक कॉफीची किंमत 7 ते 10 हजारापर्यंतही जाते. विशिष्ट पद्धतीनं तयार होणा-या या लुवाक कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. आखाती देश, अमेरिका आणि युरोपमध्ये या कॉफीला मोठी मागणी आहे. तमाम भारतीय कॉफी प्रेमींना सुखावणारी गोष्ट म्हणजे, कर्नाटक राज्यातील कूर्ग येथे या लुवाक कॉफीचे उत्पादन घेण्यात येत आहे. (Civet Cats)
सई बने
- America
- BJP
- china
- civet cats
- coffee
- congress
- Coorg
- cricket
- donald trump
- dowary
- eknath shinde
- Entertainment
- europe
- health
- india
- information
- International news
- Karnataka
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Luwak coffee
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Pakistan
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Social News
- Social Updates
- Temple
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- Vietnam
- राजकारण