Home आरोग्य वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, तुळस करेल मदत
आरोग्य

वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय, तुळस करेल मदत

11
Tulsi Benefits for Weight Loss
Tulsi Benefits for Weight Loss

Tulsi Benefits for Weight Loss : तुळस ही भारतीय संस्कृतीतील एक पवित्र आणि आरोग्यवर्धक औषधी वनस्पती आहे. फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर तिच्या औषधी गुणधर्मांमुळे ती विविध रोगांवर उपयोगी ठरते. अलीकडच्या काळात तुळस वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे अनेक संशोधनांतून समोर आले आहे. तर सध्याच्या काळात लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या झाली आहे. या समस्येपासून प्रत्येक तिसरा व्यक्ती पीडित आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळ्या डाएटच्या पद्धती आणि वर्कआउट केले जातात. तरीही काहींमधील लठ्ठपणा कमी होत नाही. अशातच लठ्ठपणावर रामबाय आणि नैसर्गिक उपाय म्हणून तुळशीचा वापर करू शकता.

1. पचनक्रिया सुधारते

वजन वाढण्यामागे एक प्रमुख कारण म्हणजे चुकीची पचनक्रिया. तुळस शरीरातील पचनसंस्थेचे कार्य सुधारते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल घटक असल्यामुळे पोटातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. नियमित तुळस पानांचे सेवन केल्यास पचन चांगले होते, जे वजन कमी होण्याच्या प्रक्रियेस गती देते.

2. मेटाबॉलिझम वाढवते

तुळस मेटाबॉलिझम (चयापचय) वाढवते. मेटाबॉलिझम जितका वेगवान असेल, तितकी शरीरातील चरबी जास्त प्रमाणात ऊर्जा म्हणून वापरली जाते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. विशेषतः सकाळी उपाशीपोटी तुळस पानांचा रस घेतल्यास शरीरातील मेटाबॉलिक क्रिया अधिक प्रभावी होते.

Tulsi Benefits for Weight Loss
Tulsi Benefits for Weight Loss

3. स्ट्रेस कमी करते

तणावामुळे वजन वाढते हे अनेक वेळा दिसून आले आहे. तुळसमध्ये अ‍ॅडॅप्टोजेनिक गुणधर्म आहेत, जे मानसिक तणाव कमी करण्यात उपयोगी ठरतात. स्ट्रेस कमी झाल्यावर हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्याचा परिणाम थेट शरीराच्या वजनावर होतो.(Latest Marathi News)

4. डिटॉक्सिफिकेशन करते

तुळस एक उत्कृष्ट नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. ती शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, त्यामुळे यकृताचे (लिव्हर) कार्य सुधारते. लिव्हर जर योग्य प्रकारे कार्य करत असेल, तर चरबीचे रूपांतर उर्जेमध्ये अधिक प्रभावीरीत्या होते, ज्यामुळे वजन घटते.(Tulsi Benefits for Weight Loss)

==========

हे ही वाचा : 

Poha : जागतिक पोहे दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या पोहे खाण्याचे फायदे

Salt : सावधान! अति मीठ खाताय होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार  

==========

5. कॅलरी बर्न करण्यास मदत

तुळसचा चहा हा वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तो शरीरातील कॅलरी जळवण्याच्या प्रक्रियेला गती देतो. शिवाय, त्यामध्ये साखर न घातल्यास तो एक कमी कॅलरीयुक्त पेय ठरतो.(Weight Loss Home Remedies)

असा करा तुळशीचा वापर

  • ताज्या तुळस पानांचा रस सकाळी उपाशीपोटी प्यावा.

  • तुळस चहा: उकळत्या पाण्यात तुळसची 8-10 पाने टाकून 5 मिनिटे उकळून प्या.

  • तुळस पानं थेट चघळणं हेही उपयुक्त ठरते.

  • तुळस पावडर रोज कोमट पाण्यात घेता येते.

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...