Home राजकारण दिग्गजांच्या राष्ट्रवादीचे ध्वजारोहण करतोय अवघा २३ वर्षांचा पोर ….!
राजकारणराज्य

दिग्गजांच्या राष्ट्रवादीचे ध्वजारोहण करतोय अवघा २३ वर्षांचा पोर ….!

11
रोहित आर आर पाटील

एखाद्या शाळेत बोलावून तिथे झेंडा वंदनाचा मान मिळाला तरी आपली छाती अभिमानाने भरून येते आणि जर एखाद्या राजकीय पक्षात, जिथे प्रत्येक पावलागणिक एकसे बढकर एक नेते असताना, त्या पक्षाच्या मुख्य कार्यालयाच्या ध्वजारोहणाचा मान वयाच्या तेविसाव्या वर्षीच मिळाला तर नवलच नाही का…? पण असे घडले आहे. 

आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातील प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मान मिळालाय २३ वर्षांच्या रोहित आर आर पाटील याला! आणि असे घडले आहे तर मग चांद्यापासून बांद्यापर्यंत चर्चा तर होणारच…..! 

जशी कवठेमहांकाळची निवडणूक झाली तशी रातोरात सर्वत्र रोहित पाटील याचीच चर्चा सुरू झाली. टीव्ही, सोशल मीडिया, वर्तमानपत्र सगळीकडे रोहित पाटील या चीच चर्चा सुरू होती. कोणे एके काळी स्व. आर. आर. पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यालयात ध्वजारोहण केले असेल, पण आज त्यांच्या मुलाला पक्षाने हा मान दिला आहे… म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात!  

रोहित आर आर पाटील

यावेळी पक्षाच्या सर्व सेलचे प्रमुख तसेच खा सुप्रिया सुळे, गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहण सोहळा पार पडला. तशी रोहितला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहेच. आजच्या घटनेमुळे कदाचित त्याला दुजोरा मिळायला हरकत नाही. 

हे नक्की वाचा: उत्तरप्रदेशच्या राजकारणातील नवं वादळः अपर्णा यादव

…आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले

पक्षीय पातळीवर जाऊन विचार केला, तर पवार कुटुंबियांना कोणाकडचे कुठले गुण, कोणत्या क्षणी हेरायचे हे पक्के ठाऊक आहे आणि कधी कोणाच्या हाती कसली दोरी द्यायची हेही गणित माहीत आहे. त्यामुळेच एकापेक्षा एक दिग्गज पक्षात असताना २३ वर्षांच्या रोहितला राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातील ध्वजारोहणाचा सन्मान देणं म्हणजे कदाचित गेल्या सात आठ वर्षांपासून राष्ट्रवादीचा हरवलेला चेहरा या निमित्ताने गावसतोय का, हे पाहण्याचा हा एक प्रयत्न असावा असंच वाटतंय. 

बी. संतोष 

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Pune Jain Boarding House
राजकारण

Pune Jain Boarding House : मोहोळ, धंगेकर, शेट्टी कोणाचे काय स्टेक्स?

राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि...

Nobel Peace Prize
आंतरराष्ट्रीयराजकारण

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव...

Rakesh Kishore
राजकारण

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने...

Maithili Thakur
मनोरंजनराजकारण

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही...