Home आरोग्य Vat Purnima : वडाच्या झाडाचे आरोग्यदायी आणि आध्यात्मिक फायदे
आरोग्य

Vat Purnima : वडाच्या झाडाचे आरोग्यदायी आणि आध्यात्मिक फायदे

31
Vat Purnima

उद्या सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या आणि कुटुंबाच्या आनंदी जीवनासाठी केल्या जाणाऱ्या व्रतांपैकी महत्वाचे व्रत म्हणजे ‘वटपौर्णिमा’. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सावित्रीने तिचा पती असलेल्या सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत घेतले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात. या झाडाला धार्मिक महत्व खूप आहे. वडाच्या झाडामध्ये देवांचा वास असल्याची मान्यता आहे. (Vat Purnima)

धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षात ब्रह्मा, श्री हरीविष्णू आणि शिव यांचा वास असतो. वडाच्या झाडांचे आयुष्य जास्त असल्याने त्याला ‘अक्षयवत’ असेही म्हटले जाते. आपल्या पौराणिक मान्यतेनुसार भगवान शिवाने वटवृक्षाखाली बसून तपश्चर्या केले असल्याचे सांगितले जाते. शिवाय मार्कंडेयांना वटवृक्षाच्या पानांवरच भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले असल्याचे सांगितले जाते. देवी सावित्रीचाही वृक्षात वास असतो. वटवृक्षात देवतांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने सुख-शांती मिळते. (Marathi News)

वटवृक्षाचे धार्मिक फायदे
* वटवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यवसायात लाभ होतो.
* जर कोणी दीर्घकाळ आजारी असेल तर त्याच्या उशाखाली वडाचे मूळ ठेवल्यास फायदा होतो.
* वडाखाली बसून हनुमान चालीसा केल्यास मानसिक तणावातून आराम मिळतो.
* घरातील देव्हाऱ्याजवळ वडाच्या झाडाची फांदी ठेवल्याने कुटुंबात सकारात्मक वातावरण राहते.
* वडाचे झाड औषध म्हणूनही वापरले जाते, जे अनेक रोगांवर फायदेशीर आहे.

Vat Purnima

वडाच्या झाडाचे आरोग्यदायी फायदे
* वडाचे झाड मानवी जीवनासाठी जीवनदाता आहे. ७० ते ८० टक्के पर्यंत ऑक्सिजन देते. या झाडाच्या मोठ्या पानांपासून, मुळांपासून, सालांपासून, फळांपासून आणि दुधापासून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात. मधुमेहापासून वंध्यत्वापर्यंतच्या अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरते. वडाच्या झाडाला राष्ट्रीय झाड म्हणून देखील ओळखले जाते. (Top Stories)

* वडाच्या झाडातून निघणारे दूध आणि मोहरीचे तेल मिक्स करून याचे 2 थेंब कानात टाकल्यास कानाच्या वेदना दूर होतील आणि इन्फेक्शन होणार नाही.

* ६ – ७ ताज्या वडाची पाने मसूरच्या डाळीच्या पिठासोबत बारीक करून ही पेस्ट, चेहरा आणि हातापायांवर लावल्यास प्रत्येक प्रकारच्या स्किन प्रॉब्लमपासुन सुटका होते. शिवाय वडाची पाने आणि फूल बारीक करुन त्यामध्ये केसर मिसळून चेह-यावर लावल्याने चेह-याचा रंग उजळतो. (Marathi Latest News)

* वडाच्या फळांमध्ये असलेल्या काही गुणधर्मांमुळे मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. चिंता आणि तणावाची समस्या देखील या वडाच्या फळांमुळे कमी होते.

* वडाची फळे अतिशय गुणकारी समजली जातात. खनिजे, ग्लायकोकॉलेट, अँटी-ऑक्सिडंट आणि वेदनशामक गुणधर्मांनी समृद्ध असतात. या फळांमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात. (Marathi Top News)

* वडाची फळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप मदत करतात. या फळात हेक्सेन सारखे घटक असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

* वडाच्या झाडाच्या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आढळते, जे सोडियमची पातळी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. हे शरीरातील रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. (Top Marathi Headline)

Vat Purnima

* वडाच्या पानांची किंवा त्याची साल यांची पेस्ट जर त्वचेवर खाज येत असल्यास त्या भागावर लावल्यास नक्कीच आराम मिळू शकतो. वडामध्ये असलेले अँटी-मायक्रोबियल गुणधर्म खाज येण्याची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. (Social Updates News)

==========
==========
* वडाच्या फळांच्या बिया बारीक वाटून घ्या. सकाळी 1 किंवा 2 ग्रॅम गाईच्या दुधासोबत सेवन करा. यामुळे वारंवार लघवी येण्याची समस्या दूर होते.

* जुलाब आणि आमांशाचा त्रास होत असेल तर वडाच्या पानांच्या कळ्या खूप फायदेशीर आहेत. हे आयुर्वेदामध्ये जुनाट अतिसार आणि आमांशावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...