Home आंतरराष्ट्रीय Trump And Musk : एकमेकांना शिव्या, शाप देऊ लागले !
आंतरराष्ट्रीय

Trump And Musk : एकमेकांना शिव्या, शाप देऊ लागले !

12
Trump And Musk

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड् ट्रम्प आणि उद्योगपती एलोन मस्क यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आला आहे. मस्क यांनी नुकताच ट्रम्प यांनी दिलेल्या सर्व जबाबदारीतून स्वतःला मोकळे करुन घेतले आहे. व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या, या काही काळच्या मित्रावर खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. ‘बिग ब्युटीफुल बिल’चे हे विधेयक ट्रम्प आणि मस्क या दोघांमधील भांडणाचे मुळ ठरले आहे. ट्रम्प यांनी आणलेले हे निधी विधेयक हास्यास्पद आणि फालतू असून, संसद देशाला दिवाळखोर बनवत आहे. हे विधेयक ज्यांनी आणले आहे, त्यांना मतदान करणा-यांनाच घृणास्पद आणि लज्जास्पद वाटत असल्याची कठोर टिका मस्क यांनी केल्यामुळे आता अमेरिकेत खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी अगदी घनिष्ट मैत्री असल्याचे दावे करणा-या या दोघांमध्ये एवढा कमालीचा दुरावा कसा आणि का आला याची चर्चा आता सुरु झाली आहे. (Trump And Musk)

उद्योगपती एलोन मस्क यांनी आपल्या एक्स या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली. मला आता ते सहन होत नाही. हे विधेयक खूप मोठे हास्यास्पद आणि अनावश्यक खर्चाने भरलेले आहे. ज्यांनी याच्या बाजूने मतदान केले त्यांना लाज वाटली पाहिजे, अशा कडक शब्दात टिपण्णी केली आहे. मस्क यांची ही पोस्ट व्हायरल झाली आणि त्यांच्यात आणि ट्रम्प यांच्यात नेमका कशामुळे दुरावा निर्माण झाला, हे उघड झाले आहे. मस्क यांनी सुरुवातीपासून ट्रम्प यांच्या निधी विधेयकाला विरोध केला आहे. ट्रम्प या विधेयकाचा बोल्ड आणि ब्युटिफूल असा उल्लेख करतात. पण या विधेयकामुळे अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट 2.5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढून अमेरिका दिवाळखोरीच्या दिशेने जाईल, असा धोका मस्क यांना वाटत आहे. (International News)

शिवाय यातून अमेरिकन जनतेवर कराचा अधिक बोजा वाढणार असून त्यातून असंतोष वाढणार असल्याची भीतीही मस्क यांना वाटत आहे. यामुळेच मस्क यांनी सुरुवातीपासून या विधेयकामध्ये अनेक सुधारणा सुचवल्या होत्या. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्याकडे कानाडोळा करत मुळ विधेयकच कायम ठेवल्यानं मस्क यांनी व्हाईट हाऊसपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. 2024 च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत एलोन मस्क यांनी ट्रम्प यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. शिवाय रिपब्लिकन पक्षाला 2500 कोटी रुपयांची निवडणूक देणगीही त्यांनी दिली होती. त्यानंतर विजयी झालेल्या ट्रम्प यांचा डावा हात म्हणून मस्क यांच्याकडे बघितले जात होते. पण एका विधेयकामुळे या ट्रम्प आणि मस्क यांचे संबंध ताणले गेले. ज्या विधेयकामुळे या दोन मित्रांमध्ये वाद वाढला, त्या विधेयकाचे नाव वन बिग ब्युटीफुल बिल अॅक्ट आहे. हे विधेयक ट्रम्प यांच्या 2017 च्या कर कपातीवर आधारित आहे. यानुसार सैन्य आणि सीमा सुरक्षेवरील खर्च वाढणार आहे. तर गरिबांसाठी सामाजिक तत्वावर आधारीत आरोग्य सेवा, अन्न मदत आणि इतर योजनांमध्ये कपात केली जाणार आहे. (Trump And Musk)

एका सरकारी अहवालानुसार, या विधेयकामुळे पुढील 10 वर्षांत अमेरिकेच्या कर्जात सुमारे 3.8 ट्रिलियन डॉलर्सची भर पडणार आहे. सध्या अमेरिकेवर एकूण $36.2 ट्रिलियन कर्ज आहे. या सर्वावर एलोन मस्क यांनी आक्षेप घेतला आहे. यातून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर कराचा बोजा वाढणार असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे. मस्क यांनी या विधेयकाचा लज्जस्पद असा उल्लेख केला आहे. अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत कुठलंही वक्तव्य केलं नसलं तरी, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लीविट यांनी हे विधेयक योग्यच असून राष्ट्रपती आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितले आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी एलोन मस्क यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी मधील सल्लागार या पदाचा कार्यकाळ संपण्याच्या एक दिवस आधी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (International News)

==============

हे देखील वाचा :  America : भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या विद्यापीठापर्यंतचा प्रवास अडचणीचा !

पद्मनाभस्वामी मंदिरात 270 वर्षांनंतर महाकुंभभिषेकम का होणार?

==============

राजीनामा दिल्यावर त्यांनी या विधेयकावर जाहीरपणे मोर्चा उघडला आहे. त्यांनी अमेरिकेतील सर्वच समाजमाध्यमांवर यासंदर्भात मुलाखती द्यायला सुरुवात केली आहे. यात या विधेयकाला पाठिंबा देणा-यांचा लुच्चा, लबाड असाही त्यांनी उल्लेख केला आहे. या विधेयकाला ट्रम्प यांचाही पाठिंबा आहे, म्हणजेच मस्क यंनी ट्रम्प यांनाच अप्रत्यक्षपणे लुच्चा, लबाड म्हणून संबोधल्याचे उघड झाले आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या या विधेयकाविरोधात अशी आघाडी उघडली आणि एककीकडे व्हाईट हाऊसमधून मस्क यांच्या विरोधातील बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यातील एक बातमी DOGE कार्यालयाची आहे. एलोन मस्क यांनी त्यांचे कार्यालय सोडल्यावर तिथे गांजा, उंदीर, झुरळे आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण काय हे काही काळासाठी पक्के मित्र म्हणून मिरवणारे दोन उद्योगपती आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. (Trump And Musk)

सई बने

Recent Posts

Related Articles

Thailand
आंतरराष्ट्रीय

Thailand : मिस युनिव्हर्सपूर्वीच मिस मेक्सिकोचा स्वतंत्र बाणा !

मिस युनिव्हर्स स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. २०२५ च्या मिस...

America
आंतरराष्ट्रीय

America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरा देणा-या घटना एकाच दिवशी घडल्या...

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Iran
आंतरराष्ट्रीय

Iran : या देशात काही दिवसांचाच पाणीसाठा !

इराण हा देश त्याची समृद्ध संस्कृती, हस्तकला, ​​ऐतिहासिक वास्तुकला, हाताने विणलेले पर्शियन...