Home लाईफ स्टाईल Hair Cut Tips : चेहऱ्याच्या आकारानुसार असा करा हेअरकट, खुलेल लूक
लाईफ स्टाईल

Hair Cut Tips : चेहऱ्याच्या आकारानुसार असा करा हेअरकट, खुलेल लूक

11
Hair Cut Tips
Hair Cut Tips

Hair Cut Tips : हेअरकट निवडताना फॅशन ट्रेंडपेक्षा आपल्या चेहऱ्याच्या आकाराला साजेसा कट निवडणे अधिक महत्त्वाचे असते. कारण योग्य हेअरकट चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलवतो, तर अयोग्य कट तुमच्या आकर्षणात अडथळा निर्माण करू शकतो. चेहऱ्याचे आकार वेगवेगळे असतात – जसे की अंडाकृती (oval), गोल (round), चौरस (square), हृदयाकृती (heart), लांबट (oblong) वगैरे. प्रत्येक प्रकाराच्या चेहऱ्यासाठी विशिष्ट हेअरकट अधिक योग्य ठरतात. योग्य कट निवडल्यास चेहऱ्याची सममिती, वैशिष्ट्ये आणि सौंदर्य खुलते.

अंडाकृती चेहरा (Oval Face):
अंडाकृती चेहरा आदर्श आकार मानला जातो. अशा चेहऱ्यावर जवळजवळ सर्व प्रकारचे हेअरकट शोभून दिसतात. तुम्ही लांब केस ठेवू शकता, बॉब कट करू शकता, लेयर्समध्ये कट घेऊ शकता किंवा बँग्सही ट्राय करू शकता. मात्र, चेहरा झाकणारे फारसे कपाळावर येणारे बँग्स टाळावेत, कारण त्यामुळे चेहरा छोटा दिसू शकतो. (Hair Cut as per face shape)

गोल चेहरा (Round Face):
गोल चेहऱ्यावर गालफडं अधिक भरलेली दिसतात, त्यामुळे अशा चेहऱ्याला थोडी लांबी मिळेल असा हेअरकट निवडावा. लांब थोडे थोडे थेट खाली येणारे केस किंवा लेयर्ड कट चांगले दिसतात. बॅककॉम्बिंग किंवा टॉपला व्हॉल्युम देणारे स्टाइल्स चेहरा लांबट दाखवतात. अगदीच लहान बॉब हेअरकट करणे टाळा.

Hair Cut Tips
Hair Cut Tips

चौरस चेहरा (Square Face):
चौरस चेहऱ्यामध्ये जबड्याची रचना ठळक असते. अशा फेससाठी लाइट लेयर्स किंवा सॉफ्ट कर्ल्स असलेला कट उपयुक्त ठरतो. साइड बँग्स किंवा ए-सिमेट्रिकल कटसुद्धा चांगले पर्याय असू शकतात. फार लहान आणि सरळ बँग्स टाळाव्यात, कारण त्या जबड्याच्या कडा ठळक करतात.

============

हे ही वाचा : 

High Heels Disadvantages : उंच टाचांच्या चप्पल सतत वापरता? आरोग्यावर होऊ शकतो हा परिणाम

Wooden Utensils Cleaning : लाकडीची भांडी स्वच्छ करण्याच्या खास टिप्स

==============

शार्ट शेप फेस (Heart-Shaped Face):
ह्या चेहऱ्यावर कपाळ रुंद असते आणि हनुवटी बारीक असते. त्यामुळे कपाळ झाकणारे बँग्स किंवा साइड फ्रिंजेस योग्य ठरतात. हनुवटीपर्यंत येणारे लेयर्स किंवा हलके वेव्ह्ससुद्धा चेहरा संतुलित दाखवतात. टॉपला अधिक व्हॉल्युम देणारे कट टाळावेत.(Hair Cut Tips)

लांबट चेहरा (Oblong/Rectangular Face):
लांब चेहऱ्यावर चेहऱ्याची उंची अधिक असते, त्यामुळे लांब केस टाळावेत. त्याऐवजी शोल्डर-लेंथ केस, फ्रिंजेस, वॉल्युमयुक्त साइड कट हे उपयुक्त ठरतात. स्लीक आणि स्ट्रेट स्टाईल्स टाळाव्यात, कारण त्या चेहरा अधिक लांब दाखवतात.(Fashion Tips)

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....