पहलगाव मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अतिशय तणावाचे झाले आहेत. भारत कधीही पाकिस्तानवर आक्रमण करेल अशी परिस्थिती आहे. भारताच्या सीमावर्ती भागामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या कारवाईनं पाकिस्तानची झोप उडाली आहे. अशातच भारतात युद्ध सराव सुरु झाला आहे. अशाचवेळी भारतामधील एक मंदिर चर्चेत आलं आहे. राजस्थानमधील या मंदिरावर पाकिस्तानं हजारो बॉम्ब टाकले होते. मात्र यापैकी एकही बॉम्ब फुटला नाही. या देवीमातेनं तिच्या मंदिरात शरण आलेल्या सर्व भक्तांचे रक्षण केले. देवीचा हा महिमा थेट पाकिस्तानच्या सैन्यापर्यंतही पोहचला. हा चमत्कार बघण्यासाठी खुद्द पाकिस्तानच्या सैन्यातील ब्रिगेडरही भारतात आला आणि देवीपुढे शरण होत, त्यानं देवीला एक छत्र अर्पण केले. 1965 च्या युद्धातील हा किस्सा सध्या राजस्थानमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. (Tanot Mata Mandir)
राजस्थानच्या जैसरमेरमधील हे मंदिर म्हणजे, तनोट मातेचे मंदिर म्हणून प्रख्यात होते. मात्र युद्धानंतर या मातेला सर्वच भाविक बमवाली माता म्हणून ओळखू लागले. या बमवाली मातेच्या मंदिरात देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात. सैन्याकडून या मंदिराची व्यवस्था बघण्यात येते. आता भारत आणि पाकिस्तान या देशांमधील तणावाच्या पाश्वभूमीवर अनेक भाविक बमवाली माता मंदिरात जात असून पाकिस्तानला चांगला धडा शिकवावा म्हणून देवीला प्रार्थना करीत आहेत. (Tanot Mata Mandir)

राजस्थानच्या जैसलमेरमधील तनोट मातेच्या मंदिरात आता भाविकांची गर्दी वाढली आहे. या तनोत मातेला भाविक बमवाली माता म्हणून ओळखतात. हे मंदिर जैसलमेरपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर असून येथून भारत-पाकिस्तान सीमा जवळ आहे. भारत-पाकिस्तान 1965 च्या युद्धामध्ये हे मंदिर प्रसिद्धीच्या झोकात आले. या युद्धादरम्यान पाकिस्तान सैन्यानं या भागात 3000 हून अधिक बॉम्ब टाकले. त्यापैकी तनोट माता मंदिराच्या आवारात 450 बॉम्प पडले. या मंदिरात तेव्हा अनेक भाविक हल्ल्यापासून बचावासाठी आले आहेत. पाकिस्तानमधून टाकण्यात येणा-या या बॉम्बपैकी एकही बॉम्ब त्यावेळी फुटला नाही, त्यामुळे देवीच्या भक्तांनी देवीला बमवाली माता, हे नवे नाव ठेवले. (Tanot Mata Mandir)
आता या मंदिराची ओळख अशीच झाली आहे. युद्ध संपल्यावर या बमवाली मातेच्या मंदिराबद्दल पाकिस्तानच्या सैन्यात चर्चा सुरु झाली. ही चर्चा पाकिस्तानी सैन्यातील ब्रिगेडर शाहनवाज खान यांच्या कानावर पडली. त्यांना सुद्धा हा चमत्कार बघण्याची इच्छा झाली. जवळजवळ अडीच वर्षांच्या पाठपुराव्यानंतर ब्रिगेडिअर खान यांना भारत सरकारकडून परवानगी देण्यात आली. ब्रिगेडिअर खांनी यांनी मंदिरात आल्यावर आपल्या डोळ्यांनी मंदिरावर बॉम्ब पडल्याच्या खुणा बघितल्या. तेसच त्यांना तेव्हा बॉम्बही दाखवण्यात आले होते. हा चमत्कार बघितल्यावर शाहनवाज खान यांनी देवीमातेला, चांदिचे छत्र अर्पण केले आहे. ब्रिगेडियर खान यांनी दिलेली छत्री आजही या घटनेची साक्षीदार आहे. 1971 च्या युद्धातही याच बमवाली मातेनं तिच्या भक्तांचे रक्षण केले आहे. (Tanot Mata Mandir)
===============
हे देखील वाचा : Operation Sindoor : अटलजी यांच्या उत्तराने पाकिस्तानची चांगलीच तंतरली होती
===============
आता या मंदिराची देखभाल बीएसएफचे जवान करत आहेत. या मंदिरात 1965 च्या युद्धात टाकण्यात आलेले बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. वास्तविक तनोट माता ही हिंगलाज मातेचा अवतार मानली जाते. जौसरमेर येथील हे मंदिर भाटी राजपूत राजा तनुराव यांनी संवत 828 मध्ये बांधल्याची माहिती आहे. भारत पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या या मंदिराची भव्यता पाहून भक्त खूष होतात. तप्त अशा वातावरणात हे पांढ-या शुभ्र रंगातील भव्य मंदिर भाविकांना शितलता देते. मंदिराचा परिसर भव्य असून मंदिराला चारही बाजुंनी भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आले आहे. अतिशय पुरातन अशा या मंदिरात अनेक प्रथा, परंपरा पाळल्या जातात. मंदिरात प्रवेश करतांना भाविक डोक्यावर रुमाल बांधूनच प्रवेश करतात. नवरात्रीमध्ये या मंदिरातील उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा होतो. यावेळी सीमेवर तैनात असलेले सैनिकही मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात येतात. भारतीय सैनिकांचे रक्षण करणा-या या तिनोट देवीला सैनिकांची देवी आणि थारची वैष्णो देवी म्हणून ओळखले जाते. हे मंदिर सिद्धपीठ मानले जाते. आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण असतांना या मंदिरात भाविकांची गर्दी वाढली आहे. पाकिस्तानला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळू दे म्हणून देवीला प्रार्थना करीत आहेत.
सई बने
- How To Reach Tanot Mata Temple
- Patrika
- Rajasthan News
- Rajasthan News in Hindi
- Tanot Mata
- Tanot Mata Ki Aarti
- Tanot Mata Mandir
- Tanot Mata Mandir Contact Number
- Tanot Mata Mandir distance from jaisalmer
- Tanot Mata Mandir timings
- Tanot Mata Mandir TO Border Distance
- Tanot Mata Mandir to longewala
- Tanot Mata Mandir Video
- तनोट माता
- तनोट माता मंदिर