Home मनोरंजन WAVES : मनोरंजनसृष्टीची Waves Summit
मनोरंजन

WAVES : मनोरंजनसृष्टीची Waves Summit

14
WAVES

स्वप्ननगरी आणि मनोरंजनाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सध्या वेव्हव समिट चालू आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या सहकार्याने हा सोहळा मुंबईत आयोजित केला आहे. मनोरंजनविश्वातील अतिशय मोठमोठे दिग्गज या समिटला हजेरी लावताना दिसत आहे. अगदी बॉलिवूडपासून ते प्रादेशिक इंडस्ट्रीपर्यंत अनेक सुपरस्टार या समिटमध्ये उपस्थिती दर्शवत विविध विषयांवर आपले विचार मांडत आहे. मात्र ही वेव्हव समिट नक्की आहे तरी काय? चला तर मग जाणून घेऊया या लेखातून सर्व माहिती. (Wave)

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई येथे ही WAVES २०२५ समिट चालू आहे. ही समिट करण्याचे सर्वत मोठे आणि महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भारताला जागतिक कंटेंट हब म्हणून स्थापित करण्यासाठी उचलण्यात आलेले एक मोठे पाऊल आहे. आपल्या पारंपरिक चित्रपटसृष्टीपासून ते ओटीटी, गेमिंग, अ‍ॅनिमेशनपर्यंत, विविध माध्यमांतून भारतातील सर्जनशीलता जागतिक स्तरावर अतिशय चांगल्या यापद्धतीने पोहोचू लागली आहे. (Wave 2025)

WAVES

याच गोष्टीला एक मोठे आणि हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून भारत सरकारने घेतलेला महत्वाचा निर्णय म्हणजे WAVES २०२५. जगात प्रथमच भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. मागील अनेक दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. भारतीय चित्रपटांची ही गरुडझेप नक्कीच कौतुकास पात्र आहे. (Marathi Latest News)

ना केवळ भारतीय चित्रपट तर भारतीय कलाकारांनी देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मोठी ओळख तयार केली आहे. अनेक कलाकारांमुळे देखील भारतीय सिनेसृष्टी जागतिक स्तरावर ओळखली जाते. सध्याच्या काळातील भारतीय सिनेमांची जागतिक पोहच कमालीची मोठी आहे. जगात असा कोणताही देश नाही जिथे भारतीय कला आणि मनोरंजन जगताच्या कामगिरी पोहोचली गेली नाही. यासाठीच WAVES समिट २०२५ ही खूपच महत्त्वाची आहे. या समितीच्या निमित्ताने अनेक निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, कलाकरांना आपले विचार व्यक्त करण्याचे आणि जगासमोर मांडण्याचे एक योग्य व्यासपीठ मिळाले आहे. (Marathi Trending News)

कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या ब्रीदवाक्यासोबत, WAVES 2025 ही भारतातील पहिली जागतिक मीडिया आणि मनोरंजन समिट आहे. ही चार दिवसांची समिट भारताच्या ५४ अब्ज अमेरिकी डॉलरच्या मीडिया आणि मनोरंजन बाजारपेठेला नव्या उंचीवर नेण्यासाठी होत आहे. या परिषदेत भारताच्या AI, अॅनिमेशन, VFX, गेमिंग, AR/VR/XR, कॉमिक्स, चित्रपट, माहितीपट, सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म आणि प्रसारण यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांशी जोडले जाणार आहे.  (Marathi Top News)

WAVES

मधल्या काही वर्षात भारतीय मनोरंजन इंडस्ट्रीचा ग्लोबल इम्पॅक्ट आणखी वेगाने वाढला आहे. हॉलीवूड, चीन, कोरियन सिनेमाप्रमाणेच भारतीय सिनेमा देखील आता ग्लोबली जगात पुढे जाताना दिसत आहे. आपण पहिले तर अनेक भारतीय हिंदी आणि इतर प्रादेशिक खासकरून दाक्षिणात्य सिनेमांनी जागतिक स्तरावर मोठा नावलौकिक कमावलेला दिसत आहे. दरवर्षी भारतात असंख्य सिनेमे तयार होतात, मात्र मोजकेच बोटावर मोजण्याइतकेच सिनेमे यशस्वी होतात. यामुळे भारतीय सिनेविश्वाला मोठा आर्थिक फटका बसताना दिसत आहे. (Social News)

भारताची अर्थव्यवस्था सतत वाढत आहे. प्रसारण, चित्रपट, डिजिटल मीडिया, इन्फोटेनमेंट इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये भारत जागतिक स्तरावर एक विकसित देश म्हणून उदयास येत आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळात भारतीय चित्रपटांचा जगाशी संपर्क खूप जास्त वाढला आहे. भारतीय कलाकृतीने आपल्या दर्जाने आणि आपल्या कथांनी जागतिक प्रेक्षक निर्माण केले आहेत. (Marathi Top Trending News)

=================

हे देखील वाचा : WAVES : वेव्हज समिट : ‘पुष्पा 2’ सिनेमाने बदललं अल्लू अर्जुनचं आयुष्य

मुंबईत भरलेलं Waves Summit नक्की काय आहे ?

=================

WAVES 2025 चे वैशिष्ट्य
> ‘Create in India’ भारतातच दर्जेदार कंटेंटची निर्मिती करून तो जागतिक बाजारात पोहोचवण्याचा प्रयत्न.

> अ‍ॅनिमेशन, वेबटून्स, मंगा, गेमिंग, संगीत, साहित्य, स्क्रिप्ट राइटिंग यांसारख्या क्षेत्रांत भारतातील तरुणांना संधी.

> Create in India Challenge – Season 1 अंतर्गत २५ प्रकारांच्या स्पर्धा – जे स्पर्धकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देतील.

> फिंगरप्रिंटिंग, वॉटरमार्किंग आणि AI आधारित ट्रॅकिंगसारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कंटेंट चोरण्यावर नियंत्रण.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...