Home आरोग्य उन्हाळ्यात भेसळयुक्त आइस्क्रिम खाण्यापासून रहाल दूर, वापरा या ट्रिक्स
आरोग्य

उन्हाळ्यात भेसळयुक्त आइस्क्रिम खाण्यापासून रहाल दूर, वापरा या ट्रिक्स

8
Pure Ice Cream Test
Pure Ice Cream Test

Pure Ice Cream Test : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की, थंड पदार्थ खाण्याचे मनं करते. अशातच कोल्ड ड्रिंक्स, आइस्क्रिम किंवा ज्यूसचा पर्याय यावेळी शोधला जातो. पण उन्हाळ्यात आइस्क्रिम खात असाल असाल तर आरोग्याची काळजी घ्या. कारण सध्या मार्केटमध्ये भेसळयुक्त आइस्क्रिमची देखील विक्री केली जाते. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. खासकरुन लहान मुलांना आइस्क्रिम देणे टाळा.

फ्रोझन डेझर्ट
सध्या आइस्क्रिमच्या नावाखाली फ्रोझन डेझर्ट विक्री केले जाते. जे हुबेहुब आइस्क्रिमसारखे दिसते. यामध्ये दूध आणि दूधाचे कंम्पाउंड वापरले जातात. याशिवाय फ्रोझन डेझर्टसाठी व्हेजिटेबल ऑइल किंवा पाम ऑइलचा वापर केला जातो. आर्टिफिशियल कलर, मैदा, पीठ, साखर आणि काही हानिकारक केमिकल्सही मिक्स केले जातात, जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतात. यामुळे आइस्क्रिम आणि फ्रोझन डेझर्टमधील फरक कसा ओखळायचा हे पाहू…

पाकिटावरील सामग्री वाचा
ज्यावेळी मार्केटमधून आइसक्रिम खरेदी कराल तेव्हा त्याच्या पाकिटावर सामग्रीची माहिती दिलेली असते. ती व्यवस्थितीत वाचा. येथे आइस्क्रिमबद्दलची माहिती दिलेली असते की, कोणत्या वस्तूंचा आइस्क्रिम तयार करण्यासाठी वापर केला आहे. यामध्ये व्हेजिटेबल ऑइल किंवा पाम ऑइल, आर्टिफिशियल कलरचा वापर केला असेल तर ते फ्रोझन डेझर्ट आहे.

Pure Ice Cream Test
Pure Ice Cream Test

चवीवरुन ओळखा
आइस्क्रिमचे टेक्सचर स्मूद आणि सिल्की असते. यामध्ये नॅच्युरल गोडवा असतो. तर फ्रोझन डेझर्टची चव आर्टिफिशियल असते. ते थोडे कडक असते जे लवकर विरघळत नाही. याशिवाय हातात घेतल्यानंतर चिकटपणा जाणवतो.

वितळवून पहा आइस्क्रिम
आइस्क्रिम लवकर कधीच विरघळत नाही. ते हळूहळू क्रिम टेक्चरमध्ये बदलले जाते. तर फ्रोझन डेझर्ट लगेच वितळले जाते आणि त्याचे पाणी होते. कारण यामध्ये तेल असते.

====================================================================================================

हेही वाचा : 

दह्यासोबत चुकूनही खाऊ नका ह्या 5 गोष्टी, बिघडेल आरोग्य

आंब्यांच्या पानांचे सेवन केल्यास मिळतील हे 5 फायदे

======================================================================================================

वास पहा
आइस्क्रिममध्ये दूध, मलाई, व्हेनिला-स्ट्रॉबेरी अशा फ्रेश फ्रुट्सचा वास येतो. तर भेसळयुक्त आइस्क्रिममध्ये आर्टिफिशियल फ्लेवर किंवा केमिकलचा वास येऊ शकतो.(Pure Ice Cream Test)

टिश्यू पेपरचा वापर करा
एक चमचा आइस्क्रिम टिश्यू पेपरवर ठेवा. यामधून पाणी किंवा तेलाचा डाग निघाल्यास ते भेसळयुक्त आइस्क्रिम असल्याचे समजून जा.

टेक्चर तपासून पहा
आइस्क्रिम स्मूद आणि क्रिमी असते. तर भेसळयुक्त आइस्क्रिममध्ये काहीवेळेस बर्फाचे खडे किंवा दाणेदार टेक्चर दिसते.

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...