Home आरोग्य उष्माघाताची ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने करा ही 5 कामे
आरोग्य

उष्माघाताची ही लक्षणे दिसून आल्यास तातडीने करा ही 5 कामे

12
Heatstroke

Heat Stroke Symptoms : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरलेली आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पार गेला आहे. सकाळच्या सुमारास कडाक्याच्या उन्हाचा त्रास अनेकांना होत आहे. अशातच उष्माघाताच्या समस्येपासन बचाव करणे महत्वाचे आहे. यावेळी बॅलेंस डाइट घेणं, भरपूर प्रमाणात पाणी पिणे, लिंबू सरबत, नारळ पाणी, ज्यूस आणि हेल्दी ड्रिंक्स प्या. जेणेकरुन हाइड्रेट राहण्यास मदत होईल. उन्हाळ्याच्या दिवसात काही समस्यांपासून दूर राहण्यासाठी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा. खासकरुन दुपारी 12-3 वाजल्यादरम्यान जाणे टाळा. तरीही उष्माघाताचा त्रास होत असल्यास काही गोष्टींची काळजी घ्यावी. उष्माघाच्या काही लक्षणांकडे वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागू शकतो. याबद्दलच पुढे जाणून घेऊ…

हिट स्ट्रोकची लक्षणे

-शरीरातलं तापमान उन्हामुळे अत्याधिक वाढणे
– नाडी आणि श्वच्छोश्वास घेण्याची क्रिया वेगाने होणे
-तीव्र डोकेदुखी होऊन चक्कर येणे
-मळमळ आणि उलटी होणे, अस्वस्थ वाटणे
-गोंधळ्यासारखे वाटणे आणि अस्पष्टपणे बोलणे
-चेहेरा लालसर होणे
-बेशुद्धी येणे

Heat Stroke
Heat Stroke

ही 5 कामे त्वरित करा

-हिट स्ट्रोकची लक्षण दिसतातच रुग्णाचे कपडे सैल करा किंवा कपडे बदला.
– रुग्णाला हवेशीर वातावरणात आणावे आणि त्याचा आजूबाजूला गर्दी करणे टाळावे
-टॉवेल किंवा कॉटनचा कपडा ओलसर करुन शरीरा पुसणे. यामुळे शरीराला थंडावा मिळेल
-शरीराचे तापमान नियंत्रणात आणण्यासाठी काखेत ओलसर कापड ठेवावा
-रुग्णाला थोडा आराम असल्यास त्याला ज्यूस किंवा नारळाचे पाणी असे हेल्दी ड्रिंक्स द्यावे (Heat Stroke Symptoms)

=======================================================================================================

हेही वाचा : 

मधुमेहाच्या रुग्णांनी सूर्यनमस्कार करावे का? जाणून घ्या सविस्तर

जिमशिवाय वाढत्या वजनावर या 5 पद्धतीने मिळवा नियंत्रण

=======================================================================================================

ही खबरदारी घेणे गरजेची

– हिट स्ट्रोक झाल्यास घरगुती उपचार करण्यासह लगेच डॉक्टरांना संपर्क करा
– रुग्णास लगेच अतिथंड ठिकाणी घेऊन जाणे टाळा
-रुग्णाला तापमान सामान्य असेल अशा ठिकाणी घेऊन जा
-हिट स्ट्रोकची लक्षणे दिसत असल्यास लगेच थंड पाणी रुग्णाला पिण्यास देऊ नये. यामुळे आरोग्य अधिक बिघडले जाऊ शकते.

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...