Home लाईफ स्टाईल काचेसारखी चमकेल त्वचा, नारळाच्या तेलात मिक्स करा या 5 गोष्टी
लाईफ स्टाईल

काचेसारखी चमकेल त्वचा, नारळाच्या तेलात मिक्स करा या 5 गोष्टी

11
Skin Care Tips
Skin Care Tips

Skin Care Tips : त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात बरेच महागडे ब्युटी प्रोडक्ट्स आहेत.पण नॅच्युरल गोष्टींसोबत त्यांची तुलना होऊ शकत नाही. जसे नारळाच्या तेलाचा अनेक वर्षांपासून वापर केला जात आहे. यामध्ये अँटीऑक्सीडेंट, अँटीबॅक्टेरियल आणि मॉइश्चराइजिंग गुण असतात. यामुळे त्वचेला पोषण मिळण्यासह चमक येण्यास मदत होते. जाणून घेऊया नारळ्याच्या तेलात अशा कोणत्या गोष्टी मिक्स केल्याने त्वचा उजळ होण्यासह सौंदर्य खुलले जाईल.

हळद आणि नारळाचे तेल
हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. हळद आणि नारळाचे तेल एकत्रित करुन चेहऱ्यावरील त्वचेला लावल्यास त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेवरील डागांची समस्याही कमी होऊ शकते. यासाठी चिमूटभर हळद आणि एक चमचा तेल एकत्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून झाल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

मध आणि नारळाचे तेल
मध हे एक नॅच्युरल मॉइश्चराइजर आहे. यामुळे त्वचा मऊसर होण्यास मदत होते. नारळाचे तेल आणि मध समप्रमाणात घेऊन चेहऱ्याला लावून ठेवा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन दूर होण्यास मदत होईल. हे मिश्रण कमीत कमी 15 मिनिटे त्वचेवर राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

लिंबाचा रस आणि नारळाचे तेल
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि ब्लिचिंगसारखे गुण असतात. यामुळे त्वचेला ग्लो येण्यास मदत होते.त्वचा तेलकट, टॅन किंवा पिग्मेंटेशनची समस्या असल्यास नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिक्स करू शकता. यासाठी लिंबाचा रस आणि नारळाचे तेल मिक्स करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला 10 मिनिटे लावून ठेवा. यावेळी लक्षात ठेवा की, लिंबामध्ये अॅसिड गुणधरम असल्याने आठवड्यातून याचा एक-दोनदाच वापर करा.

=====================================================================================================

हेही वाचा : 

Sweating Hands : सतत तळव्यांना घाम का येतो?

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा असा करा वापर

=======================================================================================================

चंदन पावडर आणि नारळाचे तेल
चेहऱ्यावर चंदन पावडर लावल्यास त्वचेला थंडावा आणि डागांची समस्या दूर होण्यास मदत होते. चेहऱ्याच्या त्वचेला ग्लो येण्यासाठी नारळाच्या तेलात एक चमचा चंदनाची पावडर मिक्स करुन घ्या. हे मिश्रण चेहऱ्याला 10-15 मिनिटे लावून ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय दररोज केल्याने त्वचेला चमक येण्यास मदत होईल.(Skin Care Tips)

एलोवेरा जेल आणि नारळाचे तेल
नारळाच्या तेलात एलोवेरा जेल समप्रमाणात मिक्स करुन घ्या. यामुळे त्वचेला सखोल पोषण मिळण्यासह मऊसरपणा येण्यास मदत होईल. याशिवाय चेहऱ्याची त्वचा ग्लो आणि फ्रेश दिसेल. कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी एलोवेरा जेल आणि नारळाचे तेल फायदेशीर मानले जाते.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....