Home लाईफ स्टाईल ब्यूटी ब्लेंडर वापरण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात, खुलेल सौंदर्य
लाईफ स्टाईल

ब्यूटी ब्लेंडर वापरण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात, खुलेल सौंदर्य

9
Beauty Blender
Beauty Blender

Beauty Blender Uses Tips : मेकअप करणे महिलांना फारच आवडते. पण परफेक्ट आणि नॅच्युरल लुक तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही योग्य मेकअप टूल्सचा वापर करता. आजकाल बाजारात ब्यूटी ब्लेंडर आणि मेकअप स्पंज सगळ्यात जास्त पॉपुलर आहे. प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असो किंवा महिला ब्यूटी ब्लेंडरचा वापर करुन मेकअप करतात. याशिवाय आपण घाईघाई मध्ये मेकअप करण्याच्या नादात स्पंज नीट ओलसर करण्यास विसरतो. ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने फाउंडेशन व्यवस्थितीत ब्लेंड न केल्यास लूकही बिघडू शकतो. अशातच प्रोफेशलन आणि परफेक्ट मेकअपसाठी ब्युटी ब्लेंडरचा वापर करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

 ब्लेंडर नेहमी ओलरस करुन घ्या
ब्यूटी ब्लेंडर ओलसर केल्याशिवाय वापर करू नये. यासाठी ब्युटी ब्लेंडर नेहमी स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून नीट पिळून घ्या. यानंतरच त्यावर फाउंडेशन घेऊन चेहऱ्यावर व्यवस्थितीत ब्लेंड करा. जेणेकरुन चेहऱ्यावर मेकअपचा पॅच येणार नाही.

Beauty Blender
Beauty Blender

प्रोडक्ट्स हलक्या हाताने लावा
ब्यूटी ब्लेंडरवर फाउंडेशन घेतल्यानंतर चेहऱ्याच्या त्वचेवक घासण्याएवजी हलका हाताने डॅबिंगच्या पद्धतीने पसरवण्याचा प्रयत्न करा.जेणेकरुन फाउंडेशन व्यवस्थितीत सेट होईल.

वेगळ्या प्रकारच्या ब्युटी ब्लेंडरचा वापर करा
ब्युटी ब्लेंडरचा आकार सामान्यतः ड्रॉप शेप किंवा ओव्हल असतो.याटचा टोकेरी भाग डोळ्यांचा आणि नाकाच्या कोपऱ्यांवर आणि गोल आणि रुंद बाजू कपाळ, गाल आणि हनुवटीच्या येथे लावल्यास ब्युटी प्रोडक्ट्स व्यवस्थितीत चेहऱ्यावर सेट होतात.

=====================================================================================================

हेही वाचा :

Waxing : फेशियल वॅक्स करताना कोणती काळजी घ्यावी

Sunglasses : उन्हाळासाठी सनग्लासेस खरेदी करायचे…? त्याआधी हा लेख नक्की वाचा

=======================================================================================================

प्रत्येक वापरानंतर स्वच्छ करा
अस्वच्छ ब्युटी ब्लेंडरने ने मेकअप केलात तर त्यात बॅक्टेरिया उत्पन होऊ शकतात. अशातच त्वचेसंबंधित समस्या वाढू शकतात. ब्युटी ब्लेंडर वापरुन झाल्यानंतर बेबी शॅम्पू किंवा केमिकल फ्री फेसवॉशने धुवा. (Beauty Blender Uses Tips)

प्रत्येक प्रोडक्टसाठी वेगळे ब्लेंडर असणे चांगले.
जर तुम्ही फाउंडेशन, कॅन्सिलर आणि क्रीम ब्लश एकाच स्पंजने लावत असाल तर त्वचेवर पॅच येऊ शकतात. अशातच मेकअप लूक बिघडू शकतो. यामुळे प्रयत्न करा की प्रत्येक ब्युटी प्रोडक्टसाठी वेगळा ब्युटी ब्लेंडर वापरा.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....