Home गाजावाजा क्रेडिट कार्डचा वापर करताना बिलिंग साइकल अशी करते काम, घ्या सविस्तर जाणून
गाजावाजा

क्रेडिट कार्डचा वापर करताना बिलिंग साइकल अशी करते काम, घ्या सविस्तर जाणून

8
Credit Card Hidden Charges
Credit Card Hidden Charges

Credit Card Billing Cycle : सध्या ज्या पद्धतीने महागाई आणि प्रत्येकवेळी नव्या गोष्टी खरेदी करण्याची सवय यामुळे बहुतांशजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. काहीवेळेस गरजेवेळी क्रेडिट कार्ड कामी येते. काहीजण आपल्या बहुतांश गरजा क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनच पूर्ण करतात. पण क्रेडिट कार्डचा वापर करणे सोपे नाही. यामुळे क्रेडिट कार्ड कसे वापरावे. एखादे पेमेंट क्रेडिट कार्डच्या मदतीने केल्यास त्याची बिलिंग साइकल कशा पद्धतीने काम करते हे जाणून घेऊया.

क्रेडिट कार्ड बिलिंग साइकल
क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर याची बिलिंग साइकल जाणून घ्यावी. खरंतर, क्रेडिट कार्ड बिलिंग साइकल तुमच्या कार्डच्या दोन स्टेटमेंट तारखेदरम्यानचा एक विशिष्ट कालावधी आहे. हा कालावधी 27 दिवस ते 31 दिवसांपर्यंत असू शकतो. बँक या साइकलदरम्यान होणारी सर्व खरेदी, रक्कम आणि ट्रांजेक्शनसंदर्भात सर्व शुल्कांचे ट्रॅकिंग करते. या साइकलच्या अखेरीस तुम्हाला क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट बँकेकडून जारी केले जाते. या बिलाचे पेमेंट करण्यासाठी ड्यू डेटपर्यंतचा वेळ मिळतो.

योग्य बिलिंग साइकलची निवड करा
क्रेडिट कार्डच्या बिलिंगची साइकल अशी ठेवा ज्यामुळे तुम्हाला त्याचे पेमेंट करण्यासाठी पैसे असतील. सॅलरी ज्यावेळी येते त्यादरम्यान बिलिंग साइकल ठेवू शकता. योग्य बिलिंग साइकल निवडल्यास तुम्ही सहज बिल भरू शकता. योग्य बिलिंग साइकल असल्यास पुढील फायदे होऊ शकतात.

Credit card use
Credit card use

====================================================================================================

हेही वाचा : 

YouTube कडून रणवीर अलाहाबादियाचा व्हिडीओ डिलीट, कधी काढला जातो प्लॅटफॉर्मवरुन कंटेट?

Google Map : बायको सोबत भांडण झालं आणि त्याने गूगल मॅप तयार केलं!

====================================================================================================

-बिलिंग साइकल तुमच्या पगाराच्या तारखेदरम्यान असल्यास बजेट ठरवता येते. याशिवाय खर्चाचे प्लॅनिंग करू शकता.
-योग्य बिलिंग साइकल निवडल्यास पेनेल्टी भरावी लागू शकत नाही.
-बिलिंग साइकल योग्य असल्यास क्रेडिट स्कोर वाढला जातो. वेळेच्या वेळी पेमेंट करू शकला नाहीत तर क्रेडिट स्कोर बिघडला जाऊ शकतो. यामुळे कर्ज घेताना समस्या येऊ शकते. (Credit Card Billing Cycle)

अशी बदला क्रेडिट कार्डच्या बिलिंगची साइकल
क्रेडिट कार्डच्या बिलिंगची साइकल बदलायची असल्यास कार्ड इश्यू करणाऱ्या बँकेला संपर्क करू शकता. बँकेला विनंती केल्यानंतर बँकेकडून महत्वाची माहिती घेऊन बिलिंग साइकल बदलू शकता.

Recent Posts

Related Articles

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Pak Vs Afghan
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Pak Vs Afghan : ग्रेटर अफगाणिस्तानच्या नकाशामुळे पाकिस्तानमध्ये पळापळ !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता या तणावात आणखी भर...

Prince Andrew
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Prince Andrew : एक राजकुमार अखेर जमिनीवर आला !

ब्रिटीश राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांना अखेर जमिनीवर...

America
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

America : या माणसाने ४३ वर्ष अमेरिकेच्या तुरुंगात घालवली !

सुब्रमण्यम वेदम, या भारतीय वंशी व्यक्तिची शोकांतिका सध्या सोशल मिडियावर सर्वाधिक चर्चेत...