Diabetes Health Care : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची खास काळजी घ्यावी. या दिवसात शुगरचा स्तर वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण अत्याधिक तहान लागते, यामुळे काहीजण सरबत, उसाचा रस किंवा कोल्ड ड्रिंकचे सेवन करतता. या गोष्टींमुळे मधुमेहाच्या रुग्णांना आरोग्यासंबंधित समस्या होऊ शकतात. अशातच मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात काय खाऊ नये याबद्दल जाणून घेऊया.
उन्हाळ्यात गोड पदार्थ जसे की, कोल्ड ड्रिंक, उसाचा रस यामुळे शरीरात ब्लड शुगरचा स्तर वेगाने वाढला जाऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात अत्याधिक साखर असणाऱ्या पदार्थांएवजी लिंबू पाणी, नारळाचे पाणी किंवा साखरेशिवाय चहा अथवा ग्रीन टी चे सेवन करू शकता. एवढेच नव्हे पाकिटबंद फूड्सही खाऊ नये.
अल्कोहोलचे सेवन करणे टाळा
काहींना बिअर पिण्यास आवडते.यामुळे ब्लड शुगर वाढू शकतो. अल्कोहोल ब्लड शुगरचा स्तर प्रभावित होऊ शकतो आणि रुग्णाच्या आरोग्यला धोका निर्माण होऊ शकतो.
कॅफेनचे सेवन करू नका
उन्हाळ्यात काहीजण चहा किंवा कॉफीचे अत्याधिक प्रमाणात सेवन करतात. पण मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन करणे टाळावे. कॅफेनचे अत्याधिक सेवन केल्याने ब्लड शुगर प्रभावित होऊ शकते. त्याएवजी कॅफेनचे सेवन कमी करा आणि हर्बल चहा किंवा डिफॅफीनेटेड कॉफी पिऊ शकता. खरंतर, उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी आरोग्याची काळजी घ्यावी. याशिवाय अशा कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये ज्यामुळे ब्लड शुगरचा स्तर वाढला जाऊ शकतो.

=======================================================================================================
हेही वाचा :
DryFruits व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढतील ‘हे’ ड्रायफ्रुटसचे प्रकार
Wheat Grass Juice निरोगी शरीरासाठी अमृततुल्य आहे गव्हांकुराचा रस
=======================================================================================================
बेकरी प्रोडक्ट्स
मधुमेहाच्या रुग्णांनी बिस्किट आणि खारट पदार्थांचे सेवन कमी करावे. या दोन्हीमध्ये मैदा असतो. रेडी-टू-इट असणारे फूड्स देखील मधुमेहाच्या रुग्णांनी खाऊ नये.
तळलेले पदार्थ
उन्हाळा असो किंवा अन्य कोणताही ऋतू यावेळी मधुमेहाच्या रुग्णांनी तेलकट पदार्थ खाऊ नयेत. यामुळे वजन वाढले जाऊ शकते. (Diabetes Health Care)
स्टार्च असणाऱ्या भाज्या
बटाटा, रताळ्यासारख्या भाज्यांमध्ये अन्य भाज्यांच्या तुलनेत अधिक कार्बोबाइड्रेट असते. मधुमेहाच्या रुग्णांनी स्टार्च युक्त फूड्सचे सेवन करणे टाळावे. यावेळी डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा.