Home गाजावाजा AC : आता एसी लावताना विजेच्या बिलाचे टेन्शन येते? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
गाजावाजा

AC : आता एसी लावताना विजेच्या बिलाचे टेन्शन येते? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

15
AC

एप्रिल महिना सुरु झाला तसा उन्हाचा तडाखा देखील वाढत चालला आहे. उन्हामुळे होणारी अंगाची लाही लाही बघता आता प्रत्येकाच्या घरी एसी सुरु झाले आहे. मात्र एसी लावताना प्रत्येकाच्याच मनात लाइटबिल किती जास्त येईल याची धाकधूक देखील असते. त्यामुळे अनेकदा घरातली मंडळी गरम होत असूनही एसी ऐवजी फॅनलाच प्राधान्य देतात. आणि फक्त रात्री झोपतानाच एसी लावतात.(AC)

एसी जास्त वेळ लावला तर विजेचे बिल दणकून येणार आणि मध्यमवर्गीय माणसाचे बजेट हलणार हे सर्वानाच माहित असते. त्यामुळे घरात एसी जरी असला तरी तो जास्त कोणी लावत नाही. मात्र आज आम्ही तुमच्या याच समस्येवर एक तोडगा घेऊन आलो आहोत. एसी लावूनही वीजबिल जास्त न येण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया या टिप्स कोणत्या आहेत ते. (AC and Electricity Bill)

AC

=========

हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये

==========

वेळेवर सर्व्हिसिंग

विजेच्या बचतीसाठी वेळोवेळी एसीची सर्व्हिसिंग करणे फार महत्त्वाचं आहे. सर्व्हिसिंग न केल्यास एसीचे कुलिंग कमी होते. एसीचे फिल्टर नियमित स्वच्छ करावेत. दर १५ ते २० दिवसांनी एसीची साफसफाई करावी. एसीमधील गॅस कमी झाल्यास एसीला विज जास्त लागते. त्यामुळे एसी सर्व्हिसिंग खूप महत्वाची आहे. (Summer News)

योग्य तापमान सेट करा

सर्वात आधी एसीचे योग्य तापमान सेट करा. एसीचं तापमान २४ डिग्री सेल्सियस सेट करा. यामुळे २० ते ३० टक्के विजेची बचत होवू शकते. एसीचे तापमान जेवढं कमी ठेवालं तेवढं बिल जास्त येते. त्यामुळे एसीचे तापमान एकच ठेवा.(Top News)

एसीसोबत फॅनही सुरु करा

अनेक लोकं एसी लावला की फॅनची गरज नसते असे समजून तो बंद करतात. एसीसोबत फॅन सुरु ठेवल्यास लवकर थंडावा पसरतो तसंच एसीवर भार देखील कमी येतो. परिणामी वीज बिल कमी येतो.(Latest Marathi News)

AC

टाइमर लावा

रात्री झोपण्याआधी एसीचा टायमर सेट करा. जेणेकरून एसी संपूर्ण रात्र सुरु राहणार नाही. तसंच तुम्ही इको मोडचा वापर केल्यास वीज बचत होवू शकते. (Social News)

=========

हे देखील वाचा : Shivaji Satam : सीआयडीची ओळख असणाऱ्या ‘एसीपी प्रद्युमन’चा प्रेरणादायी अभिनय प्रवास

==========

दरबाजे बंद ठेवा

एसी सुरु असताना नेहमी दरवाजे, खिडक्या बंद ठेवा. असं केल्यास बाहेरची गरम हवा आत येणार नाही. परिणामी वीज बिल कमी येईल.

टीव्ही आणि संगणकाचा वापर टाळा

एसी सुरु असताना टीव्ही आणि संगणकाचा वापर टाळा. कारण ही उपकरणं जास्त उष्णता निर्माण करतात. यामुळे खोली थंड करण्यासाठी एसीला जास्त काम करावं लागते. परिणामी वीजबिल जास्त येतो. म्हणून हे टाळा.

Recent Posts

Related Articles

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Pak Vs Afghan
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Pak Vs Afghan : ग्रेटर अफगाणिस्तानच्या नकाशामुळे पाकिस्तानमध्ये पळापळ !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता या तणावात आणखी भर...

Prince Andrew
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Prince Andrew : एक राजकुमार अखेर जमिनीवर आला !

ब्रिटीश राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांना अखेर जमिनीवर...

America
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

America : या माणसाने ४३ वर्ष अमेरिकेच्या तुरुंगात घालवली !

सुब्रमण्यम वेदम, या भारतीय वंशी व्यक्तिची शोकांतिका सध्या सोशल मिडियावर सर्वाधिक चर्चेत...