Home आंतरराष्ट्रीय Five Eyes : फाइव्ह आयज आणि भारत !
आंतरराष्ट्रीय

Five Eyes : फाइव्ह आयज आणि भारत !

10
Five Eyes

जगभरातील गुप्तचर संघटना आणि त्यांचे कारनामे याबाबत सामान्यांना कायम उत्सुकता असते. अशीच एक गुप्त संघटना आहे, फाइव्ह आयज. ही आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघटना आहे. यात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. या देशांमध्ये एक करार झाला असून त्याअंतर्गत हे देश आपापसातील गुप्त माहिती एकमेकांना देतात. मात्र या फाइव्ह आयजमध्ये भारताच्या गुप्तहेर संघटनेचा समावेश नाही. (Five Eyes)

असे असले तरी, आज भारताची भूमिका या फाइव्ह आयजमध्ये महत्त्वाची ठरली आहे. कारण या फाइव्ह आयजचा सदस्य नसतानाही या संघटनेतील गुप्तचर संघटनांचे प्रमुख भारताच्या राजधानीत, दिल्लीत जमले आहेत. यामध्ये सर्वांचे लक्ष अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांच्याकडे लागले आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तुलसी गबार्ड यांची भेट दिल्लीत ज्या आपुलकीच्या नात्यानं झाली, त्यावरुन फाइव्ह आयजमध्ये भारताचा समावेश होऊन, या संघटनेचं नाव बदलले जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. भारताच्या रॉ चा समावेश फाइव्ह आइजमध्ये झाला तर या संघटनेची व्याप्ती अधिक वाढेल, शिवाय वाढत्या दहशतवादाला या सहा देशांना आळा घालता येईल, अशी भूमिका आहे. यासह चीनच्या वाढत्या आक्रमक भूमिकेवरही वचक ठेवण्याचे काम या संघटनेच्या मार्फत होऊ शकणार आहे. त्यामुळे दिल्ली येथ होत असलेल्या फाईव्ह आइजच्या बैठकीकडे फक्त भारत आणि या पाच देशांचेच लक्ष नाही तर अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. (International News)

फाईव्ह आयज या गुप्तचर संघटनेबद्दल कायम चर्चा असते. अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारखे देश समाविष्ट असलेल्या या फाइव्ह आयजचे प्रमुख सध्या भारताच्या राजधानीत जमले आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर नेटवर्क म्हणून फाइव्ह आयजचा उल्लेख होतो. या संघटनेत भारताची गुप्तचर संघटना नसतांनाही या संघटनेचे प्रमुख भारतात काय करीत आहेत, हा प्रश्न सध्या सर्वांच्याच उत्सुकतेचा झाला आहे. या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेच्या सर्वात चर्चित असलेल्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड भारतात दाखल झाल्या आणि फाइव्ह आयज भारतात काय करत आहे, हा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. तुलसी गबार्ड यांच्यासोबत ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जोनाथन पॉवेल आणि न्यूझीलंडचे गुप्तचर प्रमुख अँड्र्यू हॅम्प्टन हे सुद्धा दिल्लीत असून गुप्तचर संघटनांबरोबर बैठका घेत आहेत. (Five Eyes)

या सर्वांबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, रॉ प्रमुख रवी सिन्हा आणि गुप्तचर विभागाचे संचालक तपन डेका हे सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यांनी तुलसी गबार्ड यांच्याबरोबर स्वतंत्र बैठक केली. त्यात भारतविरोधी कारवायांसाठी अमेरिकेच्या भूभागाचा वापर करु देणार नसल्याचे आश्वासन तुलसी गबार्ड यांनी राजनाथ सिंह यांना दिले आहे. शिवाय अमेरिकेत खलिस्तान्यांविरोधात कारवाई सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही सिंह यांना दिली. याव्यतिरिक्तही तुलसी गबार्ड भारतासंदर्भात निर्णय घेणार आहेत. शिवाय यावेळी बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचारावरही चर्चा होणार आहे. या सर्वांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत अग्रभागी आला आहे. तसेच फाइव्ह आयजमध्ये भारताचा समावेश होणार असल्याचाही माहिती पुढे येत आहे. असे करुन हे पाच देश चीनच्या वाढत्या आक्रमणवादी भूमिकेला उत्तर देणार आहेत, शिवाय वाढत्या दहशतवादाविरोधात काम करायचे असले तर भारत आणि भारतीय गुप्तचर संघटना महत्त्वाच्या असल्याची खात्री फाइव्ह आयजला झाली आहे. (International News)

=============

हे देखील वाचा : Gujarat : या अनोख्या गिफ्ट सिटीची माहिती आहे का !

Devendra Fadanvis : भोंग्यांचं राजकारण पुन्हा महाराष्ट्रात होणार ?

=============

फाइव्ह आयजचा उद्देश गुप्तचर माहिती सामायिक करत दहशतवादाचा मुकाबला करणे हा आहे. फाइव्ह आयजची स्थापना 1946 मध्ये झाली तरी 1980 पर्यंत या संघटनेबद्दल कोणालाही माहिती नव्हती. 2010 पर्यंत या पाच देशांची सामाजिक गुप्तहेर संघटना आहे, याची माहिती जगाला झाली आणि त्याबद्दल सजगता वाढली. विशेषतः अरब देशांमध्ये आणि चीनमध्ये फाइव्ह आयजचा मोठा दरारा आहे. शक्तिशाली देशांचे हे गुप्तहेरांचे नेटवर्क आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत काही देशांच्या राजकारण्यांवर पाळत ठेवते, असा आरोपही झाला. पण या सर्वांचा फाइव्ह आयजवर काहीही परिणाम झाला नाही. आता या फाइव्ह आयजमध्ये भारतही सामिल होणार अशी खात्री अन्य देशांना आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. कारण भारतात फक्त फाइव्ह आयजमध्ये असलेल्या गुप्तचर संघटनांचे प्रमुख नाही तर, 20 देशांच्या गुप्तचर संस्थांचे प्रमुख एकत्र आले आहेत. त्यामुळे भारताची जागतिक राजकारणातील महत्त्वाची भूमिका पुन्हा एका अधोरेखित झाली आहे. (Five Eyes)

सई बने

Recent Posts

Related Articles

Thailand
आंतरराष्ट्रीय

Thailand : मिस युनिव्हर्सपूर्वीच मिस मेक्सिकोचा स्वतंत्र बाणा !

मिस युनिव्हर्स स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. २०२५ च्या मिस...

America
आंतरराष्ट्रीय

America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरा देणा-या घटना एकाच दिवशी घडल्या...

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Iran
आंतरराष्ट्रीय

Iran : या देशात काही दिवसांचाच पाणीसाठा !

इराण हा देश त्याची समृद्ध संस्कृती, हस्तकला, ​​ऐतिहासिक वास्तुकला, हाताने विणलेले पर्शियन...