Home मनोरंजन किस्सा महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांच्या रशियन भाषेतील गाण्याचा!
मनोरंजनसामाजिक

किस्सा महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांच्या रशियन भाषेतील गाण्याचा!

9
महेंद्र कपूर Mahendra Kapoor

आज ९ जानेवारी! गायक महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) यांचा जन्म दिवस! त्याच्या आणि राजकपूरच्या मैत्रीचा किस्सा अगदी आवर्जून वाचण्यासारखा आहे. पन्नासच्या दशकात देशातील वातावरण पं. नेहरूंच्या विचाराने भारावलेले होते. रशिया सारखा एक सक्षम मित्र आपल्याला लाभला होता. त्यामुळे दोन देशातील सांस्कृतिक आदान – प्रदान मोठ्या प्रमाणावर होऊ लागली होती. 

आर के चा ‘आवारा’ जितका आपल्या देशात लोकप्रिय ठरला तितकाच तो रशियात देखील ठरला. त्यातील गाण्यांनी रशियात कहर लोकप्रियता मिळवली. आर के च्या नंतरच्या ’श्री चारसो बीस’ने ‘आवारा’ चीच पुनरावृत्ती केली. त्यामधील ‘मेरा जूता है जापानी’ या गाण्याने इकडे ‘बिनाका गीतमाला’च्या कार्यक्रमात पहिला क्रमांक मिळविला आणि तिकडे रशियात ‘सरपे लाल टोपी रूसी’ या ओळीने अक्षरश: धुमाकूळ घातला.

राजकपूर या निमित्ताने कायम रशियाला जात असे. तिथे भारतीय सिनेमातील गाणी गायल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमातून त्याची सुटका होत नसे. हा सिलसिला अनेक वर्षे चालू होता. १९६० साली तो अशाच एका सांस्कृतिक मैफिलीसाठी रशियात मोठ्या वाद्यवृंदासहीत गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत गायक महेंद्र कपूर देखील होता.

When Raj Kapoor burnt his hand for Mahendra Kapoor. राज कपूर ने महेंद्र कपूर  से गाना गंवाने के लिए .

महेंद्र कपूर (Mahendra Kapoor) त्या काळी नवोदितच होता. त्याचा ‘नवरंग’ नुकताच प्रदर्शित झाला होता. रशियात ‘मास्को’ आणि ‘लेनिनग्राड’मध्ये मोठ्या संख्येने लोक या मैफलीला आले होते. प्रेक्षकांनी आल्या आल्या राजच्या नावाचा जयघोष करीत त्याला व्यासपीठावर गायला बोलावले. त्यावेळी राज आपल्या हातातील माईक महेंद्र कपूरच्या हाती देत म्हणाला “आज मी माझ्यापेक्षा खूप चांगलं गाणार्‍या गायकाला आपल्या समोर आणतोय, तो नक्कीच तुमचे मनोरंजन करेल.” पुढचे दोन तास महेंद्र गात होता आणि लोक प्रचंड उत्साहाने ऐकत होते. ते त्याच्या सोबत गात होते, नाचत होते.

राज कपूरला मात्र हा काय प्रकार चालला आहे हे कळेचना. एक तर त्याला महेंद्रची भाषाच कळेना. त्यात गाण्याची चाल, संगीत नेहमीचेच पण गाण्याचे शब्द वेगळे. राजने रशियन वकिलातीतील आपल्या भारतीय राजदूताला (जे त्यांच्या शेजारीच बसले होते) विचारले, “हा नेमकं गातोय तरी काय?” त्यावर त्यांनी जे सांगितले, ते ऐकून राज थक्कच झाला.

महेंद्रकपूर सर्व गाणी रशियन भाषेत गात होता. श्रोत्यांना त्यांच्या मातृभाषेत ही मैफल ऐकता येत असल्याने ते थांबायचे नावच घेत नव्हते. एका मागोमाग एक अशा फर्माईश चालूच होत्या. रात्री उशिरा हॉटेलमध्ये गेल्यावर राजने महेंद्र कपूरला विचारले, “अरे बाबा, तू रशियन भाषा कधी शिकलास?” 

त्यावर महेंद्र म्हणाला, “राज साब, तुमची रशियातील लोकप्रियता मला माहित होती. या दौर्‍याचे जेव्हा ठरले, त्या दिवसापासून मी आपली सर्व गाणी रशियन भाषेत भाषांतरीत करून घेतली व सराव सुरू केला.”

राजने त्याला विचारले, “पण यातून तुला काय मिळणार होते?” 

हे ही वाचा: या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया'(Shark Tank India)

‘कल हो ना हो’ चित्रपटासंबंधित १३ अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील (Kal Ho Naa Ho)

त्यावर महेंद्रचे उत्तर होते, “रशियन जनता तुमच्यावर आणखी भरभरून प्रेम करेल आणि तुमच्या डोळ्यातला तो आनंद मला पाहायचा होता. जो आज मी स्वत: अनुभवला.”

राजच्या डोळ्यातून आसवं ओघळू लागली. तो म्हणाला, “यार महींदर तुने आज मुझे खरीद लिया. मेरी अगली पिक्चर मे तुम जरूर गाओगे.” 

महेंद्रला वाटलं, ही मोठी माणसं माझ्या सारख्याला काय लक्षात ठेवणार? पण राजने आपले वचन पाळले. त्याच्या पुढच्या ‘संगम’ सिनेमाची जेव्हा सुरूवात झाली तेव्हा त्याने महेंद्रला आवर्जून बोलावून गाणं दिलं. ते गाणं होतं –  “हर दिल जो प्यार करेगा वो गाना गायेगा…”

धनंजय कुलकर्णी

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Uttarakhand
सामाजिक

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची...