Home सामाजिक Mamta Kulkarni : महाकुंभच्या अशा प्रसिद्धीनं धर्मगुरु हैराण !
सामाजिक

Mamta Kulkarni : महाकुंभच्या अशा प्रसिद्धीनं धर्मगुरु हैराण !

13
Mamta Kulkarni

प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभबदद्ल रोज अनेक बातम्या येत आहेत. करोडो भाविक या तिर्थराजमध्ये येऊन पवित्र त्रिवेणी स्थानावर स्नान करत आहेत. महाकुंभच्या निमित्तानं प्रयागराजमध्ये लाखो साधू संत उपस्थित आहेत. यामध्ये नागा साधूंची संख्या अधिक आहे. या सर्व साधूंचा दिनक्रम जाणून घेण्यासाठी सध्या सोशल मिडियाच्या प्रतिनिधींची एकच गर्दी प्रयागराजमध्ये झाली आहे. मात्र या सर्वात नको त्या गोष्टींना अधिक प्रसिद्ध मिळत असल्यामुळे अनेक धर्मगुरुंनी नाराजी व्यक्त केली आहे. महाकुंभ हा सनातन धर्मातील सर्वात मोठा उत्सव आहे, रोज करोडो भाविक येथे भेट देतात. (Mamta Kulkarni )

या भाविकांना मोफत भोजन, निवासस्थान, आरोग्य अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. या महाकुंभमध्ये रोज कथावाचन सुरु आहे. येथे कल्पवास हे कठीण व्रत करण्यासाठी अनेक सनातनी दाखल झाले आहेत. मात्र यासंदर्भात माहिती न सांगता सोशल मिडियामध्ये अन्य बाबींवरच प्रकाश टाकण्यात येत असल्यामुळे अनेक आखाड्याचील साधूंनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा बातम्यांमुळे महाकुंभची प्रतिमा खराब होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आत्तापर्यंत महाकुंभमध्ये आयआयटीवाले बाबा, निळ्या डोळ्यांची मुलगी मोनालिसा भोसले, आणि सर्वांत सुंदर साध्वी म्हणून ओळखल्या गेलेल्या साध्वी हर्षा रिचारिया यांना चुकीची प्रसिद्धी मिळत असल्याचा आरोप अनेकांना केला होता. या तिघांनाही या प्रसिद्धीमुळे महाकुंभ सोडण्याची वेळ आली. आता त्यात अभिनेत्री ममता कुलकर्णीची भर पडली आहे. हिंदी चित्रपटातील अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं महाकुंभात हजेरी लावत दीक्षा घेतली आहे. त्यामुळे बातम्यांचे कॉलम ममता कुलकर्णीच्या माहितीनं भरुन गेले आहेत. (Social News)

मात्र ममता कुलकर्णीसोबत हजारो साधूंनी दीक्षा घेतली आहे, त्याची कोणीही दखल घेत नसल्याची नाराजी आहे. सोशल मिडियाचा हा अतिरेक रोखण्यासाठी आता महाकुंभमध्ये काही आखाड्यात व्हिडिओ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये होत असलेला महाकुंभ 144 वर्षांनी होत असल्याची मान्यता आहे. बारा वर्षांनी महाकुंभ होतो. प्रयागराजमध्ये होत असलेला महाकुंभ अशी बारा महाकुंभ झाल्यावर होत असल्यामुळे त्याला अधिक महत्त्व आले आहे. या महाकुंभसाठी उत्तरप्रदेश सरकार काही वर्ष तयारी करत आहेत. अभूतपूर्व महाकुंभ असे याचे वर्णन करण्यात येत आहे. या महाकुंभमध्ये प्रमुख आकर्षण हे यात येणारे नागा साधू असतात. या नागा साधूंना बघण्यासाठी आणि त्यांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी सध्या या परिसरात अनेक युट्यूबरचा वावर वाढला आहे. ही मंडळी नको ते प्रश्न विचारुन या साधूंना हैराण करत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. (Mamta Kulkarni )

महाकुंभमध्ये आणखी बरेच असे आहे, ज्यातून चांगले व्हिडिओ तयार होतील. मात्र मोजक्याच घटनांच्या मागे हा सोशल मिडिया लागल्याचे दिसत आहे, याबाबत येथील आखाड्यांमध्ये तक्रारी वाढल्या असून काहींनी अशा सोशल मिडिया चालकांना दूर रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. यातच अनेकांना अतिप्रसिद्धीनं महाकुंभ सोडण्याची वेळही आली आहे. सध्या सोशल मिडियामध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीची चर्चा चालू झाली आहे. ममता कुलकर्णीनं महाकुंभमध्ये हजेरी लावली आहे. तिनं स्वतःचे पिंडदान केले असून संन्यासी होण्यासाठी दीक्षा घेतली आहे. ममता कुलकर्णी सध्या प्रयागराजमधील किन्नर आखाड्यात रहात असून तिला आता यमाई ममता नंद गिरी म्हणून ओळखले जाणार आहे. जुना आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी तिला दीक्षा दिली आहे. महाकुंभमध्ये यापूर्वी आयआयटीयन बाबा अभय सिंग यांना प्रसिद्धि मिळाली आहे. हरियाणातील झज्जर येथील रहिवासी अभय सिंग यांनी अभियांत्रिकी दरम्यान मानवता आणि तत्वज्ञान या विषयांचा अभ्यास केला. (Social News)

================

हे देखील वाचा :  Trump And Musk : ट्रम्प आणि मस्क कट्टर विरोधक ते पक्के मित्र !

Saif Ali Khan : पतौडी कुटुंबाचा शेवटचा नवाब

================

काही काळ परदेशात घालवल्यावर कोरोना काळात ते भारतात परतले आणि त्यांनी चारही धामांची पायी यात्रा केली आणि संन्यासी म्हणून दीक्षा घेतली. या आयआयटी बाबांनाही महाकुंभमध्ये एवढी प्रसिद्धी मिळाली की काही दिवस त्यांना महाकुंभमधून दूर जावे लागले. अशीच प्रसिद्धी मिळाली ती मोनालिसा भोसले या तरुणीला. मध्यप्रदेशच्या महेश्वर येथून रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी ती आपल्या कुटुंबासह प्रयागराज महाकुंभमध्ये आली होती. मात्र तिच्या निळ्या डोळ्यांमुळे तिला सोशल मिडायवर प्रसिद्धी मिळाली. मग सर्वजण तिचा व्हिडिओ शूट कऱण्याचा प्रयत्न करु लागले. शेवटी या सर्वांना कंटाळून तिच्या कुटुंबानी तिला महाकुंभपासून दूर पाठवले. महाकुंभमध्ये सर्वात सुंदर साध्वी अशी हर्षा रिचारिया यांना प्रसिद्धी मिळाली. आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंदगिरी महाराजांची शिष्या असलेल्या हर्षा यांनाही मिळालेली प्रसिद्धी ही त्रासदायकच ठरली. यामुळे त्यांना महाकुंभ सोडण्याची वेळ आली. शांतीच्या शोधात आध्यात्माची ओढ लागल्याचे सांगणा-या हर्षा या सोशल मिडियातील प्रसिद्धीमुळे महाकुंभतून बाहेर पडल्याची माहिती आहे. त्यामुळेच आखाड्यात येणा-या सोशल मिडिया चालकांना ठराविक वेळ देण्याबाबत आता विचार सुरु आहे. (Mamta Kulkarni )

सई बने

Recent Posts

Related Articles

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Uttarakhand
सामाजिक

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची...

Varanasi
सामाजिक

Varanasi : देव दिवाळीचे महत्त्व !

दरवर्षी दिवाळीनंतर १५ दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. भगवान...

Mathura
सामाजिक

Mathura : तब्बल ५४ वर्षांनी मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील खजिना उघड

भारतातील मंदिरं कायम त्यांच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांसाठी, त्यांच्या अभूतपूर्व बांधकामासाठी, इतर अनेक कारणांसाठी...