अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षाचे वर्चस्व फक्त अमेरिकेवर नसते तर सगळ्या जगावर त्याची सत्ता चालते. त्याच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारीला शपथ घेणार आहे. डोनाल्ड ट्रम्प दुस-यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. या चार वर्षाच्या कार्यकालात त्यांचे निवासस्थान व्हाईट हाऊस रहाणार आहे. आयरिश वंशाचे वास्तुविशारद जेम्स होबान यांनी निओक्लासिकल शैलीत या व्हाईट हाईसची रचना केली आहे. संपूर्ण अमेरिकेसाठी हे व्हाईट हाऊस प्रतिष्ठेचे असते. यात रहात असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची सुरक्षा कोणीही भंग करु शकत नाही, इतकी मजबूत असल्याचे सांगण्यात येते. कारण हे व्हाईट हाईस जेवढे समोरुन दिसते, तसेच त्याचा बराचसा भाग जमिनीखालीही असून या सर्व गुप्त भागामध्ये अद्ययावत सुविधा आहेत. येथे फक्त एक-दोन दिवस नाही तर काही वर्ष निवांत रहाता येईल, अशी व्यवस्था आहे. (White House)

अगदी अमेरिकेवर एखादा अणुहल्ला झाला तरी या बोगद्याखाली असलेल्या खोल्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे सुरक्षित राहू शकतात आणि तिथून कामकाज करु शकतात अशी व्यवस्था आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यावर या बोगद्यांची पुन्हा एकदा माहिती करुन देण्यात येणार आहे. अमेरिकेत नववर्षाच्या स्वागताला झालेल्या तीन मोठ्या हल्ल्यांनी ट्रम्प यांच्या सुरक्षतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यावरुनच व्हाईट हाऊसमधील हे रहस्यमयी बोगदे चर्चेत आले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर ट्रम्प विराजमान होण्यापूर्वी अमेरिकेत झालेल्या तीन हल्ल्यांनी खळबळ उडाली आहे. त्यातील एक घटना ही ट्रम्प यांच्या मालकीच्या हॉटेलबाहेर आणि टेल्साच्या गाडीमध्ये झाल्यामुळे हा ट्रम्प आणि एलॉन मस्क यांना इशारा असल्याचे मानण्यात येते. अशावेळी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर ट्रम्प यांची सुरक्षा किती कडक असेल याची चर्चा रंगाली आहे. त्यामध्येच व्हाईट हाऊसमधील गुप्त बोगद्यांची माहिती पुढे आली आहे.
वॉशिंग्टन, डीसी मधील 1600 पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू येथे असलेल्या राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान व्हाईट हाऊस म्हणून ओळखले जाते. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकेतील प्रत्येक नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष नेहमी या तारखेला पदाची शपथ घेऊन कार्यभार स्वीकारतो. त्याच दिवशी ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पोहोचतील आणि पुढील चार वर्षांसाठी ते त्यांचे घर असेल. व्हाईट हाऊस हे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे असलेल्या इमारतीचे नाव आहे. हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान आणि मुख्य कार्यस्थळ आहे. 1792 ते 1800 दरम्यान अक्विआ क्रीक सँडस्टोनचा पांढरा रंग वापरून ही भव्य वास्तू उभारली गेली. सुरुवातीपासूनच या वास्तूमध्ये काही गुप्त खोल्या आणि रस्ते तयार करण्यात आले. कालांतरानं त्याची गरज अधिक भासल्यानं या गुप्त खोल्या आधुनिक साधनांनी सुसज्यही करण्यात आल्या. (White House)

1941 मध्ये पर्ल हार्बर हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसखाली अधिक बोगदे, खोल्या तयार करण्यात आल्या. 1950 मध्ये राष्ट्राध्यक्ष असलेले हॅरी एस ट्रुमन यांच्या कार्यकाळात हे बोगद्यांचे खोल्यांमध्ये रुपांतर सुरू झाल्याची माहिती आहे. पण काही काळानंतर त्यामुळे व्हाईट हाऊसच्या भिंती कमकुवत झाल्या. मग संपूर्ण व्हाईट हाऊसची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यावेळी राष्ट्राध्यक्षांची सुरक्षितता हा प्रमुख मुद्दा मानून पूर्व विंग पश्चिम विंगला जोडणारा बोगदा प्रथम तयार झाला. त्यानंतर दुसरा गुप्त बोगदा 1987 मध्ये पूर्ण झाल्याची माहिती आहे. तेव्हा रेगन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना मिळणा-या धमक्या पाहून बोगदा तयार करण्यात आला. व्हाईट हाऊसचे हे सर्व जमिनी खाली असणारे विश्व त्यांच्या गुप्तचर यंत्रणांच्या कार्यालयांशी जोडले गेले आहे. जगातील कुठलिही महत्त्वाची बातमी राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहचवण्यासाठी या मार्गाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. हे सर्व बोगदे बांधतांना त्यावर कोणत्याही हवाई हल्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. (International News)
========
हे देखील वाचा : Crime Story : नरभक्षक राजा कोलंदर लोकांना मारून मेंदुच बनवायचा सूप
TAX : स्तनांपासून दाढीपर्यंत जगात लागू केलेले विचित्र TAX!
======
शिवाय कुठल्याही घातक वायूचा हल्ला झाला तरी या बोगद्यांमध्ये असलेल्या राष्ट्राध्यक्षाशिवाय अन्य कुठल्याही महत्त्वाच्या व्यक्तीला त्याचा त्रास होणार नाही, एवढी त्यातील यंत्रणा सज्ज आहे. या गुप्त बंकरच्या भिंती एवढ्या जाड काँक्रीटची बनवण्यात आल्या आहेत की त्यावर अणुबॉम्बचाही परिणाम होणार नाही. या बोगद्यातून जाणा-या मार्गातून राष्ट्राध्यक्षांचे विशेष विमानही गाठता येते, शिवाय राष्ट्राध्यक्षांची एक राखीव गाडीही याच बोगद्याच्या मार्गावर सदैव तैनात असल्याची माहिती आहे. आता डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांना या सर्व गुप्त खोल्यांची पुन्हा एकदा माहिती देण्यात येणार आहे. त्यांच्यावर प्रचारादरम्यान झालेले हल्ले आणि आता त्यांना अप्रत्यक्षरित्या देण्यात आलेला इशारा पाहता ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अधिक नियोजन येथील सुरक्षा यंत्रणा करत असणार. त्यात या गुप्त बोगद्यांचे मोठे महत्त्व असणार आहे. (White House)
सई बने
- America
- atom bomb
- BJP
- bunker
- china
- Concrete
- congress
- donald trump
- eknath shinde
- Harry S. Truman
- india
- information
- International news
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Pearl Harbor
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Reagan
- Social News
- Social Updates
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- washington dc
- राजकारण