Home मनोरंजन ‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
मनोरंजन

‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

8
Aai Kuthe Kay Karte

टीव्ही चॅनेलवर नानाविध विषयावरील अनेक मालिका सुरु असतात. मात्र जेव्हा जेव्हा या मालिका सुरु होतात तेव्हा तेव्हा त्या संपणार हे सगळ्यांनाच माहित असते. काही महिन्यात, काही वर्षात या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात. आता मराठी मालिकाविश्वातील ५ वर्षांपासून सुरु असलेली आणि तुफान गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ ही प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ज्या मालिकेने स्टार प्रवाह चॅनेलला पुन्हा एकटा यशाच्या शिखरावर नेऊन बसवले ती मालिका आता संपणार आहे. मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांनीच एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी मिलिंद गवळी, स्टार प्रवाह परिवार आणि Director’s Kut Production कडून तुम्हा मायबाप प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही दीपावली सुखमय, शांतीपूर्ण, आरोग्यदायी यशस्वी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आमची ‘आई कुठे काय करते’ ही ‘स्टार प्रवाह’वरची मालिका आपला लवकरच निरोप घेणार आहे. डिसेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२४ हा या मालिकेचा प्रवास होता. या प्रवासामध्ये दोन कोविडचे लॉकडाऊन, आम्ही मात्र एक महिना आधीच शूटिंगला सुरुवात आणि लॉकडाऊनच्या काळात ‘स्टार प्रवाह’ने ‘आई कुठे काय करते’चे भाग पुन्हा प्रक्षेपित केल्यामुळे अनेक लोक जी घरात अडकून पडली होती त्यांनी पुन्हा मालिका पाहिली.

ती इतकी भावली की अक्षरश: या आमच्या मालिकेला तुम्हा सर्वांनी डोक्यावर घेतलं, आमच्यावर भरभरून प्रेम करत राहिले, आमचे निर्माते राजनजी शाही आणि ‘स्टार प्रवाह’चे मुख्य अधिकारी सतीशजी राजवाडे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला जोमानं काम करण्यासाठी सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं. ‘स्टार प्रवाह’ने आम्हाला त्यांच्या इतर कार्यक्रमांमध्ये आमंत्रण देऊन, मग ते ‘होऊ दे धिंगाणा’ किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आमचं कौतुक करून जाहिरात ही केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

DKPचे विवेक भाई, आरिफ भाई रणजीत जी यांनी आम्हाला कशाचीही कमतरता पडू दिली नाही. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ठाण्यामध्ये जो समृद्धी बंगला ज्यामध्ये आम्ही शूटिंग करत होतो. त्या वास्तूमध्ये आम्ही ४५ ते ५० वेगवेगळे सेट्स लावले, हॉस्पिटल्स, ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, कोटरूम, पोलीस स्टेशन, वेगवेगळ्या बेडरूम्स, वेगवेगळी घर, आश्रम, लग्नाचे हॉल, किती सांगू, आमचं आर्ट डिपार्टमेंट हे फारच म्हणजे फार भारी होतं. त्याचबरोबर ठाण्यामध्ये आउटडोर शूटिंगला इतर शहरांमध्ये होतो तसा काही त्रास नाहीये. असंख्य रस्त्यावरचे, दुकानातले, बस स्टॉप वरचे सीन्स आम्ही प्रत्यक्ष लोकेशनवर केले आणि पब्लिकचा कधीही त्रास झाला नाही.

नमिता वर्तक यांची कथा, पटकथा खूप भारी होती. या मालिकेचे संवाद छान असायचे. प्रेक्षक कान देऊन ऐकायचे. ड्रेस डिपार्टमेंट एक नंबर, मेकअप डिपार्टमेंट एक नंबर, सगळेच डिपार्टमेंट भारी होते. दिग्दर्शनाचं डिपार्टमेंट सुद्धा कमाल, भट्टी जमलीच होती आणि विशेष म्हणजे कलाकार, या मालिकेमध्ये एकापेक्षा एक कलाकार होते. आपापल्या पात्रात चपख्खल बसलेले, आप्पा, कांचनआई, अरुंधती, संजना, अभी, यश, इशा, अनघा, विमल, शेखर-विशाखा आरोही-गौरी, आशुतोष, नितीन, सुलेखा ताई, विद्याताई, अण्णा (जयंत सावरकर), जुनी संजना, अंकिता, अविनाश अजून खूप पाहुणे कलाकार होते. मी या सर्वांचा आभारी आहे.”

दरम्यान मिलिंद यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत ‘ही मालिका नका बंद करू’, आम्ही मालिका खूप मिस करू’, मालिकेचा टाइम बदल आणि चालू ठेवा’ अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान ही मालिका बंद होऊन त्याजागी ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ ही नवीन मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...