Home आरोग्य वेळेआधीच पीरियड्स येण्यामागील ही आहेत कारणे
आरोग्य

वेळेआधीच पीरियड्स येण्यामागील ही आहेत कारणे

10
Exercise during periods
Exercise during periods

Health Care Tips : वेळेवर महिलांना पिरियड्स न येणे त्यांच्या आरोग्यासंबंधित काही संकेत देतात. याचा आरोग्यासह कधीकधी मानसिक परिणामही होतो. प्रत्येक महिलेमध्ये पीरियड्स वेगवेगळ्या कालांतराने यातात. अशातच तुम्हाला वेळेआधीच पिरियड्स येत असल्यास आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामागे काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊया…

हार्मोनल इम्बॅलेन्स
हार्मोनमध्ये गडबड झाल्यास त्याचा परिणाम पिरियड्सवर होतो. पिरियड्ससाठी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जबाबदार असतात. या हार्मोनमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास वेळेआधीच पिरियड्स येतात.

प्रीमेनोपॉज
लवकर पीरियड्स येण्यामागील आणखी एक कारणे म्हणजे प्रीमेनोपॉजही असू शकते. वयाच्या चाळीशीनंतर अशी स्थिती महिलांमध्ये उद्भवू शकते. या दरम्यान, महिलांच्या शरिरातील हार्मोनच्या स्तरामध्ये चढउतार होत असतो. यामुळे प्रत्येक महिन्याला ओव्यूलेशन होत नाही.

वजन कमी होणे किंवा वाढणे
काहीवेळेस वेगाने वजन वाढणे आणि कमी होण्याचा हार्मोनवर परिणाम होतो. अशातच पिरियड्सवरही प्रभाव पडतो. यामुळेच वेळेआधी पिरियड्स येत असल्याची बहुतांश महिला तक्रार करतात.

तणाव
तणावामुळे शरिराला काही प्रकारे नुकसान होऊ शकते. अत्याधिक तणावाच्या स्थितीमुळे हार्मोनवर प्रतिकूल प्रभाव पडला जातो. अधिक तणावामुळे हाइपोथॅलेमस जे मेंदूत असते ते प्रभावित होते. यामुळेच खरंतर, हार्मोन नियंत्रणात राहतात. यामध्ये गडबड झाल्यास अनियमित पिरियड्स येण्यास सुरुवात होऊ शकते.

गर्भनिरोधक गोळ्या
गर्भनिरोधक गोळ्यांचा शरिरातील हार्मोन, ओव्यूलेशन आणि पिरियड्सवर थेट परिणाम होतो. तुम्ही नियमित रुपात गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास तुमची पिरियड सायकल बिघडली जाऊ शकते. यामुळेच वेळेआधीही पिरियड्स येऊ शकतात. (Health Care Tips)

थायरॉइड
आजकाल बहुतांश महिला थायरॉइडच्या समस्येचा सामना करताना दिसतात. यामुळेही पिरियड्स अनियमित किंवा वेळेआधी येऊ शकतात.


आणखी वाचा :
तुपाची कॉफी सेवनाचे चमत्कारिक फायदे
डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात करा ‘हे’ पदार्थ सामील

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...