Home मनोरंजन आयफा अवॉर्ड्स 2024 वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
मनोरंजन

आयफा अवॉर्ड्स 2024 वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

14
IIFA 2024

मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या कलाकरांना, तंत्रज्ञान सर्वांनाच आपल्या कामाची पावती प्रेक्षकांकडून मिळतच असते. तसेही प्रेक्षकांकडून मिळणारी पावती जास्त महत्वाची असते. मात्र तरीही पुरस्कार रुपी भेट प्रत्येकालाच हवीहवीशी वाटत असते. या कलाविश्वात देखील अनेक पुरस्कार सोहळे संपन्न होतात. वर्षाच्या मध्ये पार पडणारा पुरस्कार सोहळा म्हणजे आयफा पुरस्कार.

आयफा पुरस्कार हे जगातील विविध ठिकाणी संपन्न होतात. यावर्षी इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी (IIFA) पुरस्कार सोहळा नुकताच अबू धाबीमधील ‘यास’ आयलँडवर संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा विविध कारणांमुळे खास ठरला आहे. यावेळी पाच विविध इंडस्ट्रीमधील कलाकार एकत्र आले होते. यात तेलगू, कन्नड, मल्याळम, तामिळ आणि हिंदी या पाच कलाविश्वात कलाकारांनी हजेरी लावली होती. 27 सप्टेंबर रोजी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठी ‘आयफा उत्सवम अवॉर्ड्स’ सोहळा पार पडला. तर 28 सप्टेंबर रोजी हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांसाठीचा पुरस्कार सोहळा पार पडला.

‘जवान’ या चित्रपटासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर राणी मुखर्जीला तिचा कमबॅक चित्रपट असलेल्या ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कामगिरी केली असली तरी चित्रपट समिक्षकांनी या चित्रपटाचे चांगलेच कौतुक केले.

आयफा अवॉर्ड्स 2024 विजेत्यांची संपूर्ण यादी…

सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहरुख खान (जवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी (मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : विधु विनोद चोप्रा (12वीं फेल)
सर्वोत्कृष्ट चित्रपट : अ‍ॅनिमल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : शबाना आजमी (रॉकी और राणी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट खलनायकाची भूमिका : बॉबी देओल (अ‍ॅनिमल)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : प्रीतम, विशाल मिश्रा, मानव भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बाल, अशीम केमसन, हर्षवर्धन रामेश्वर (अ‍ॅनिमल)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (पुरुष) : भूपिंदर बब्बाल- अर्जन वेल्ले (अ‍ॅनिमल)
सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (स्त्री) : शिल्पा राव (जवान)

स्पेशल अवॉर्ड्स
भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी : हेमा मालिनी
डेब्यूटंट ऑफ द इयर : अलिजेह अग्निहोत्री
सर्वोत्कृष्ट पटकथा : इशिता मोइत्रा, शशांक खेतान, सुमित रॉय (रॉकी और राणी की प्रेम कहानी)
सर्वोत्कृष्ट गाणं : सिद्धार्थ सिंग आणि गरिमा वहल – सतरंगा (अ‍ॅनिमल)
चित्रपटांमध्ये 25 वर्ष उत्कृष्ट कामगिरी : करण जोहर

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...