Home मनोरंजन विशाखा सुभेदारचा मुलगा उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना
मनोरंजन

विशाखा सुभेदारचा मुलगा उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना

11
vishakha subhedar

आजच्या काळात परदेशात शिक्षण घेणे अतिशय सामान्य बनले आहे. सामान्य घरातील मुलं देखील उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जातात. परदेशात शिक्षण घेण्यामागे अनेक कारणं असतात, आणि प्रत्येकाची कारणं देखील वेगवेगळी असतात. कोणी शिष्यवृत्ती मिळवत परदेशात जातात, कोणी तिथे शिकून आपल्या देशात पुन्हा येण्यासाठी जातात, कोणी तिथे शिक्षणाचा दर्जा, वेळ आणि खर्च तसा कमी असल्याने जातात. कारणं कितीही आणि कोणतीही असली तरी आजच्या काळात परदेशात शिक्षण काही विशेष बाब नाही.

त्यातही मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या जवळपास सर्वच कलाकारांची मुलं परदेशातच शिक्षण घेताना दिसतात. मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील ही बाब सामान्य झाली आहे. अनेक मोठ्या आणि नामचीन कलाकारांची मुलं परदेशात शिकत आहे. किंवा शिक्षण संपवून जॉब करत आहे, किंवा शिक्षण घेऊन परत भारतात आली. यात प्रसाद ओक, अविनाश नारकर, अशोक सराफ आदी अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांचा समावेश आहे. आता यात अजून एक नाव जोडले जाणार आहे. ते नाव म्हणजे विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या मुलाचे.

हो नुकताच विशाखाचा मुलगा अभिनय नुकताच उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाला आहे. विशाखाने याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुलाला निरोप देतानाच अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. विशाखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले,

“आज आमचा अबू.. अबुली.. निघाला पुढल्या शिक्षणा साठी लंडन ला.. M. A. In film making (spl direction) करायला Plymouth शहरात..! अबू.. तू जी जी स्वप्न पाहिलीस ती ती पूर्ण होवो..! अतिशय मेहनती आणि झोकून देऊन काम पूर्ण करणार्यातला आहेस तू..!
आत्ता ही जायचं म्हटल्यावर त्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी तू सक्षम पणे पार पाडल्या.. आणि त्या साठी आम्हला मदत केली नवी मुंबई, वाशी मधल्या wisdome career education ह्या मंडळीने..! जातीने ते लक्ष घालतात..त्याचे ही खुप खुप आभार…

आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अबू.. तुला plymouth युनिव्हर्सिटी कडून मिळालेली स्कॉलरशिप 50% off… तुझ्या मार्कलिस्ट वर, work एक्सपेरियन्स मुळे आणि तुझ्या इच्छाशक्तीन केलीय कमाल आणि ह्यापुढेही तिच मनीषा बाळग… दुरदेशी तू माणसं जोडशीलच कारण अतिशय लाघवी गुणी स्वभावाचा आहेस तू.. जां अबुली जीं ले जिंदगी…आणि खुप छान शिकून ये… तयारीचा गडी होऊनच ये.
बाकी सगळं तुला तर माहितीय,सगळं काही तुझ्याचसाठी…माझ्या समजूतदार हुशार बाळा…love u अबुली.. आणि मी आणि बाबा तुला प्रचंड miss करणार.. पण आई बाबा तुझ्या स्वप्नांसाठी कायम तुझ्या पाठीशी उभी राहणार.”

======

हे देखील वाचा : हरितालिका पूजेची संपूर्ण माहिती आणि कथा

======

विशाखाने शेअर केलेल्या फोटो, व्हिडिओमध्ये दिसते की, अभिनयला परदेशात जाताना निरोप देण्यासाठी त्याच्या आई – वडिलांसोबतच जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार विमानतळावर पोहोचले दिसत आहे. यामध्ये अभिनेता यशोमन आपटे आणि पंढरीनाथ कांबळे यांची मुलगी देखील दिसत आहे. लेक दूर जाणार यामुळे विशाखाला अश्रू देखील अनावर होताना दिसत आहे.

दरम्यान विशाखाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय दिसत असून, ती बिग बॉस शोबद्दल सतत तिचे मत मांडताना दिसत आहे. शिवाय ती ‘शुभविवाह’ या मालिकेत खलनायिका देखील साकारत आहे. विशाखाला बहुतकरून तिच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाते. तिने अनेक विनोदी शोमध्ये काम केले आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...