Home मनोरंजन प्रसाद ओकला मुलाने गिफ्ट दिली आलिशान BMW कार
मनोरंजन

प्रसाद ओकला मुलाने गिफ्ट दिली आलिशान BMW कार

10
Prasad oak

आपले स्वतःचे हक्काचे लहान, मोठे घर असावे. आलिशान, महागडी एक गाडी असावी असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. सगळे यासाठी खूप मेहनत घेतात आणि प्रयत्न देखील करतात. प्रत्येक व्यक्तीचेच हे स्वप्न पूर्ण होते असे नाही. मात्र तरीही निराश न होता आपल्या मुलांनी आपले स्वप्न पूर्ण करावे अशी मनोमन अनेकांची अपेक्षा असते. पुन्हा यातही मुलं करतील की नाही ही पण एक शंका असतेच.

मात्र जर मुलांनी आई वडिलांचा विचार करून त्यांना त्यांच्या आयुष्यातील मोठे आणि अविस्मरणीय सरप्राइज दिले तर? विचार करूनच आनंद झाला ना. पण आजच्या काळातील मुलं आई वडिलांचा विचार न करता त्यांचा आनन्द त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना दिसतात. नक्कीच याला अशी अनेक अपवाद असलेली मुलं देखील आहे, ज्यांना आई वडिलांच्या इच्छा, अपेक्षा, त्याग आणि स्वप्नांची काळजी, जाणीव आहे. मुख्य म्हणजे अशी मुलं सिनेसृष्टीशी संबंधित आहे. या क्षेत्रातील लोकांना नेहमीच संस्कार नसलेली लोकं किंवा मुलं असा टॅग सामान्य माणसांनी दिला आहे.

पण असे अजिबातच याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक यांची मुलं. प्रसाद आणि मंजिरी यांना मयंक आणि सार्थक अशी दोन मुलं आहेत. यापैकी सार्थकने प्रसादला अतिशय मोठे आणि महागडे गिफ्ट दिले आहे. सार्थकने त्याच्या बाबांना BMW कार सरप्राइज दिली आहे. मंजिरीने याबाबत एक पोस्ट करत आपल्या दोन्ही मुलांचे कौतुक केले आहे. यासोबतच तिने सार्थकच २२ वर्ष जुना आणि आताच एक असे दोन फोटो देखील शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

मंजिरीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची… तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता ( अजूनही आहे ). तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला ( म्हणजे ३ सप्टेंबर २००२ ) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्यानी तुला ही सायकल सरप्राइज गिफ्ट म्हणून आणली होती पण त्याला काळजी की, तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर ? म्हणून कित्येक दिवस त्याने तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही . (अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना )
त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं. मात्र, तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्या नंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद ( लहान मुलासारखा ) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे.. त्याचं कारण म्हणजे, आज २२ वर्षांनी ( ३ सप्टेंबर २०२४ ) तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राइज गिफ्ट दिलीस… मी नको म्हणाले, तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. ( त्या ऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल ).

माझ्याकडे शब्द नाहीयेत सार्थक… फक्त एवढच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंकचा पण…!!!
खूप मोठ्ठा हो
स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
“B”est
“M”any
“W”ishes”

सध्या मंजिरीची ही पोस्ट कमालीची व्हायरल होत असून, या नवीन गाडी निमित्त प्रसादचे इंडस्ट्रीमधील लोकांसोबतच नेटकऱ्यांनी देखील अभिनंदन केले आहे. सोबतच त्यांच्या दोन्ही मुलांबद्दल आणि त्यांच्या या विचारांबद्दल देखील त्यांची पाठ थोपटली आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...