Home मनोरंजन ‘सो कुल’ सोनालीचे आकर्षक फोटो
मनोरंजन

‘सो कुल’ सोनालीचे आकर्षक फोटो

10

Sonali Kulkarni

मराठी मनोरंजनविश्वातील प्रगल्भ आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. तिने केवळ मराठी नाही तर हिंदी, इंग्रजी, इटालियन, बंगाली, तामिळ, तेलगू आदी भाषांमधील तब्बल ८० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे.

Sonali Kulkarni

अभिनयासाठी ओळखली जाणारी सोनाली सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. ती अनेकदा तिचे विविध फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसते. नुकतेच तिने तिचे साडीतले अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो पोस्ट केले आहे.

Sonali Kulkarni

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिने गुलाबी रंगाची साधी कॉटनची काठापदराची साडी नेसली आहे. यावर तिने निळ्या रंगाचे साधे ब्लाऊज घातले आहे.

Sonali Kulkarni

तिच्या दागिन्यांबद्दल बोलायचे झाल्यास तिने खूपच मोजकी आणि आकर्षक ज्वेलरी घातली आहे. तिने रिंग झुमका कानातले, गळ्यात लांब मोठ्यांची माळ, हातात हिरव्या बांगड्यांसोबतच दोन मोत्याच्या बांगड्या घातल्या आहे. तिने अंबाडा घालून त्यावर गुलाबी रंगाचे गुलाबाचे फुल लावलेले दिसत आहे.

Sonali Kulkarni

सोनालीने आतापर्यंत ‘दिल चाहता है’, ‘मिशन कश्मीर’ ‘दोघी’, ‘मुक्ता’ या सारख्या चित्रपटांपासून गुलाबजाम, देऊळबंद, डॉक्टर बाबा आमटे आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sonali Kulkarni

सोनालीने अनेक उत्तम चित्रपट, नाटकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांवर उमटवला. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक चांगली लेखिका देखील आहे. तिने ‘सो कुल’ नावाने एक पुस्तक देखील लिहिले आहे.

Sonali Kulkarni

सोनाली नेहमीच तिच्या स्पष्ट, प्रगल्भ विचारांसाठी ओळखली जाते. तिचे प्रत्येक गोष्टींबाबतचे विचार अतिशय स्पष्ट असतात. ती ते बिनधास्त आणि बेधकपणे व्यक्त देखील करते.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...