Home आरोग्य जेवल्यानंतर लगेच पाणी प्यावे का? वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
आरोग्य

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यावे का? वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला

9

Health Care Tips : पाणी आयुष्यातील महत्वाच्या घटकांपैकी एक आहे. यासंबंधित काही तथ्ये आहेत. बहुतांशजण जेवल्यनंतर लगेच पाणी पितात. खरंतर, ही सवय चुकीची आहे. यामुळे जेवल्यानंतर लगेच पाणी प्यावे का असा प्रश्न आजही बहुतांशजणांना पडतो. याशिवाय उभे राहून पाणी पिऊ नये असेही सांगितले जाते. यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशातच जेवल्यानंतर पाणी प्यावे का याबद्दल आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात याबद्दल जाणून घेऊया…

काय म्हणतात आरोग्य तज्ज्ञ
आयुर्वेदानुसार, शरिराची काम करण्याची एक पद्धत असते. ज्यावेळी आपण एखादा पदार्थ खातो तेव्हा तो पचण्यास वेळ लागतो. अशातच खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास अन्नपदार्थ पाण्यात तरंगत राहतात आणि पचण्यास वेळ लागतो. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या पोट फुगणे, अॅसिडिटी अशा समस्या उद्भवू शकतात.

खाल्ल्यानंतर थंड पाणी पिऊ नये
जेवल्यानंतर खूप थंड पाणी पिऊ नये. यामुळे पचनक्रियेवर प्रभाव पडू शकतो. आरोग्य तज्ज्ञ असे म्हणतात की, पाण्यामुळे ढेकर आल्यास थोडेसे पाणी प्यावे. एकाचवेळी खूप पाणी पिऊ नये. खरंतर, जेवल्यानंतर अर्धा तासांनी पाणी प्यावे. याशिवाय जेवल्यानंतर लगेच झोपू नये. यामुळे पचनक्रिया मंदावली जाते. जेवल्यानंतर शतपावली करावी असा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. यामुळे पचनक्रिया तंदुरुस्त राहण्यास मदत होते आणि पचनासंबंधित समस्या वाढल्या जात नाहीत. (Health care tips)

जेवणाआधी पाणी पिऊ नका
आरोग्य तज्ज्ञ असे म्हणतात की, जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे. जेवणाआधी पाणी प्यायल्याने पोट फुगते आणि पोट भरलेले वाटते. यामुळेच जेवण कमी जाते. यामुळे जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या अर्धा तास नंतर पाणी प्यावे.


आणखी वाचा :
तेलकट ते कोरड्या त्वचेसाठी घरच्याघरीच असा तयार करा ग्रीन टी फेस मास्क
या’ टिप्स वापरा आणि टिकवा परफ्युमचा सुगंध जास्त काळ

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...