Home लाईफ स्टाईल ‘या’ 5 गोष्टींमुळे बिघडले जाते मानसिक आरोग्य, असा करा बचाव
लाईफ स्टाईल

‘या’ 5 गोष्टींमुळे बिघडले जाते मानसिक आरोग्य, असा करा बचाव

12
Mental health care
Mental health care

Mental Health Care : प्रत्येक व्यक्तीचे मानसिक आरोग्य हेल्दी राहणे अत्यंत महत्वाचे असते. पण सध्याच्या बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यामागे काही कारणे असू शकतात. पण या सर्व गोष्टींवर मात करत तुम्ही मानसिक आरोग्य हेल्दी ठेवू शकता. जाणून घेऊया कोणत्या गोष्टींमुळे मानसिक आरोग्य बिघडले जाते आणि बचाव करण्याचे उपाय याबद्दल सविस्तर…

अधिक तणाव आणि चिंता
अधिक तणाव आणि चिंतेमुळे तुमचे मानसिक आरोग्य बिघडले जाऊ शकते. कामाचे प्रेशर, परिवारातील वाद, आर्थिक चणचण अशा गोष्टींमुळे तणाव वाढला जाऊ शकतो. यापासून दूर राहण्यासाठी दररोज थोडावेळ व्यायाम, मेडिटेशन अथवा आपल्या कामांना प्राथमिकता द्या. आपले छंद जोपासण्यासाठी वेळ काढा.

अपूर्ण झोप
अपूर्ण झोपेमुळे मानसिक आणि शारिरीक आरोग्य प्रभावित होते. यामुळे चिडचिडेपणा आणि थकवा शरिरात निर्माण होतो. यासाठी दररोज सात ते आठ तासांची झोप घेणे महत्वाचे असते. झोपण्यााधी मोबाईल आणि टीव्ही पासून एक तास तरी दूर रहा.

अनहेल्दी फूड्सचे सेवन
जंक फूड आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे मानसिक आरोग्य बिघडले जाते. फळ, भाज्या आणि नट्सचे सेवन करा. यामुळे तुमचे शरिर आणि मेंदू हेल्दी राहण्यास मदत होईल. पुरेशा प्रमाणात दिवसभरात पाणी प्या.

एकटेपणा
एकटेपणामुळे मानसिक आरोग्य बिघडले जाते. यापासून दूर राहण्यासाठी मित्रपरिवारासोबत वेळ घालवा. सामाजिक कार्यांमध्ये सहभागी व्हा. यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि तुम्ही आनंदी राहता.

नकारात्मक विचार
नकारात्मक विचारांचा आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे आत्मविश्वासही कमी होतो. तुम्हाला प्रत्येकवेळी उदास वाटते. यापासून दूर राहण्यासाठी सकारात्मक विचार करा. आपल्या कामातून आनंद व्यक्त करा. (Mental Health Care)

बचाव करण्याचे उपाय
-दररोज व्यायाम अथवा मेडिटेशन करा
-हेल्दी डाएट आणि लाइफस्टाइल फॉलो करा
-मित्रपरिवारासोबत वेळ घालवा
-सकारात्मक विचार करा


आणखी वाचा :
पावसाळ्यात हात-पाय काळवंडलेत? करा हे घरगुती उपाय
थंड पाण्याने अंघोळ केल्याने होती ‘हे’ फायदे

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....