Home मनोरंजन शाहरुख खानसाठी लिहिलेला सिनेमा हृतिक रोशनसाठी ठरला Lucky
मनोरंजन

शाहरुख खानसाठी लिहिलेला सिनेमा हृतिक रोशनसाठी ठरला Lucky

9
Bollywood News
Bollywood News

Bollywood Movies : बॉलिवूडमधील हँडसम हंक म्हणून ओखळल्या जाणाऱ्या हृतिक रोशनचा बॉलिवूडमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. हृतिकचा पहिला सिनेमा कहो ना प्या है असून तो वर्ष 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत ब्लॉकबस्टर ठरला होता. याच सिनेमाच्या माध्यमातून अमीषा पटेलनेही डेब्यू केला होता. दोन्ही कलाकारांना रातोरात फेम मिळाले होते. पण तुम्हाला माहितेय का, कहो ना प्या है सिनेमासाठी हृतिकला घेणार नव्हते.

कहो ना प्यार है सिनेमाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते. पण सिनेमाची कथा ज्यावेळी लिहिली जात होती तेव्हा राकेश रोशन सिनेमात शाहरुखला कास्ट करण्याचा विचार करत होते. या सर्व गोष्टींमध्ये हृतिकचाही समावेश होता. त्याचवेळी हृतिकने वडिलांना म्हटले की, तुम्ही शाहरुखसोबत अनेक सिनेमे केले आहेत. आता एखाद्या नव्या अभिनेत्याला घ्यावे. खरंतर, राकेश रोशन यांनी शाहरुख खानला घेऊन ‘करण-अर्जुन’, ‘कोयला’सारखे सिनेमे केले होते.

हृतिकला असा मिळाला सिनेमा
हृतिकने जेव्हा आपल्या वडिलांना सिनेमातील नव्या कलाकाराबद्दल विचारले असता त्यांनी यावर विचार केला. अशातच हृतिकला राकेश रोशन यांनी सिनेमातून लाँच करण्याचा निर्णय घेतला. या सिनेमासाठी हृतिकला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि बेस्ट डेब्यूचा पुरस्कारही मिळाला होता. वेगवेगळ्या मंचावर सिनेमाने 92 पेक्षा अधिक पुरस्कार जिंकले होते. याशिवाय वर्ष 2000 मध्ये कहो ना प्यार है सिनेमाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये देखील दाखल करण्यात आले.

सिनेमाने किती कमावले?
बॉक्स ऑफिस इंडियानुसार, कहो ना प्यार है सिनेमाने जगभरात 80 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. सिनेमा तयार करण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. सिनेमात हृतिक रोशन आणि अमीषा पटेलसह अनुपम खेर, मोहनिश बहल, दलीप ताहिल, आशीष विद्यार्थी सारखे कलाकार झळकले होते.


आणखी वाचा :
OTT प्लॅटफॉर्मवरील दीपिका पादुकोणचे 4 ब्लॉकबस्टर सिनेमे
शाहरुखसोबत शूटिंग करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी घरातील मंडळींशी बोलणे केले होते बंद, वाचा किस्सा

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...