Home गाजावाजा बिग बॉस 17 नंतर डिप्रेशन आणि एंग्जायटीचा त्रास झाला होता, अंकिता लोखंडेने शेअर केले मनातील दु:ख
गाजावाजा

बिग बॉस 17 नंतर डिप्रेशन आणि एंग्जायटीचा त्रास झाला होता, अंकिता लोखंडेने शेअर केले मनातील दु:ख

11
Bollywood
Bollywood

Bollywood :टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैन सध्या आपला लेटेस्ट म्युझिक व्हिडीओ ‘ला पिला दे’ मुळे चर्चेत आहेत. दोघांचे हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून सर्वांच्या पसंतीस पडले आहे. पहिल्यांदा विक्की एखाद्या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसून आले आहेत. अशातच अंकिता लोखंडेने आपल्या लेटेस्ट प्रोजेक्ट आणि बिग बॉस 17 नंतर काय काय झाले याचा खुलासा केला आहे.

अंकिता लोखंडेने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की, बिग बॉसच्या शो नंतर ती डिप्रेशन आणि एंग्जायटीची शिकार झाली होती. याशिवाय अभिनेत्रीने आपल्या म्युझिक व्हिडीओबद्दलही सांगितले.

विक्की सोबतच्या कामाचा शेअर केला अनुभव
अभिनेत्रीने म्हटले की, मला वाटते की सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचा पार्टनर तुम्हाला पाठिंबा देतो. मी स्वत:ला लकी मानते कारण माझ्यासोबत विक्कीसारखा पार्टनर आहे. याशिवाय आम्ही पती-पत्नी असण्यासह को-स्टारही आहोत. खरंतर ही भावना एक वेगळीच आहे. मला वाटते की, ज्यावेळी एक पार्टनर प्रगती करतो त्यावेळी दुसरा पार्टनरही त्याप्रमाणे पुढे जातो, यामुळे एक वेगळे बळ मिळते.

बिग बॉस 17 नंतर डिप्रेशनमध्ये गेली होती- अंकिता लोखंडे
डिप्रेशन आणि एंग्जायटीबद्दल बोलायचे झाल्यास अंकिताने म्हटले की, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर काही गोष्टींचा खासगी आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडला. मी एंग्जायटी आणि डिप्रेशनचा सामना केला. रात्रभर झोप यायची नाही. फार काही गोष्टींबद्दल सतत विचार करायची. मला काही गोष्टींची भीती वाटायची. पण आता सर्वकाही ठिक आहे. यामागे माझ्या कुटुंबाचा फार मोठा वाटा आहे. (Bollywood)

अंकिताने पुढे म्हटले की, आपल्या येथे काही गोष्टी फार हलक्यात घेतल्या जातातय पण विक्की आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आज सर्वकाही व्यवस्थितीत आहे. मला कोणत्याही गोष्टीचे फरक पडत नाही. ट्रोलिंग केले तरीही मला काही वाटत नाही. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मानसिक स्थिती बिघडली गेली होती. पण या स्थितीतून मी स्वत:ला बाहेर काढले आणि आता मला त्याबद्दल विचार देखील करायचा नाहीये.


आणखी वाचा :
वर्ष 1977 मधील ‘या’ ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसच नव्हे तर परदेशातही केली होती जबरदस्त कमाई
4-5 वर्ष बेरोजगारी, गटरात झोपून घालवल्या रात्री पण नंतर असे बदलले आयुष्य!
अनिल कपूर यांच्यासोबत असलेल्या वादावर बोनी कपूर यांनी सोडले मौन, म्हणाले…

Recent Posts

Related Articles

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Pak Vs Afghan
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Pak Vs Afghan : ग्रेटर अफगाणिस्तानच्या नकाशामुळे पाकिस्तानमध्ये पळापळ !

अफगाणिस्तान आणि पाकिस्तामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता या तणावात आणखी भर...

Prince Andrew
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Prince Andrew : एक राजकुमार अखेर जमिनीवर आला !

ब्रिटीश राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांना अखेर जमिनीवर...

America
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

America : या माणसाने ४३ वर्ष अमेरिकेच्या तुरुंगात घालवली !

सुब्रमण्यम वेदम, या भारतीय वंशी व्यक्तिची शोकांतिका सध्या सोशल मिडियावर सर्वाधिक चर्चेत...