Home मनोरंजन अनिल कपूर यांच्यासोबत असलेल्या वादावर बोनी कपूर यांनी सोडले मौन, म्हणाले…
मनोरंजन

अनिल कपूर यांच्यासोबत असलेल्या वादावर बोनी कपूर यांनी सोडले मौन, म्हणाले…

9
Bollywood
Bollywood

Bollywood : बोनी कपूर सध्या आपला आगामी सिनेमा ‘मैदान’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रमोशनदरम्यान, बोनी कपूर आपल्या खासगी आयुष्यासंबंधित काही गोष्टींबद्दल बोलले आहेत. आता बोनी कपूर यांनी अनिल कपूर यांच्यासोबत असलेल्या वादावर मौन सोडले आहे.

रिपोर्ट्सनुसार, नो एन्ट्री-2 सिनेमातील कास्टची नावे लीक झाल्यानंतर अनिल कपूर आपला मोठा भाऊ बोनी कपूर यांच्यासोबत बोलत नाहीय. बोनी कपूर यांनी याबद्दल बोलताना म्हटले की, त्यांची कमेंट चुकीच्या पद्धतीने घेतली गेली असून याला त्यांनी ह्यूमर असल्याचे म्हटले आहे.

बोनी कपूर यांनी म्हटले की, मलाच धक्का बसलाय की, एक सामान्य गोष्टीचा वाद झाला आहे. ज्यावेळी मी बोललो होतो की, अनिल माझ्यावर रागावला आहे. खरं असे आहे की, मी अनिल आणि सलमान या दोघांना सिनेमासाठी विचारत नव्हतो, कारण दोघांकडेही खूप काम असते. मी नो एट्रीचा सिक्वल तयार करण्यासाठी अनिल किंवा सलमानएवजी यंग जनरेशनला घेण्याचा विचार केला.

बोनी कपूर यांनी पुढे म्हटले की, मला वाटते त्या दोघांपैकी कोणीही माझ्यावर नाराज होऊ शकतो. कारण त्या दोघांपैकी एकाला घेऊन सिक्वल करत नाहीय. नो एन्ट्रीच्या सिक्वलमध्ये त्यांची गरज भासू शकते. पण त्यांना सिक्वलची गरज नाही. खरंतर, ही कमेंट केवळ ह्यूमरच्या रुपात केली होती. (Bollywood)

मला माहितेय की, पुढील दोन वर्षांपर्यंत अनिल कपूर यांच्याकडे कोणतीही डेट नाही आहे. तरीही मी जी काही कमेंट केली त्याचा उलट अर्थ घेतला गेला. यामुळे मी स्पष्ट करतोय की, माझ्या कमेंटचा चुकीचा अर्थ घेऊ नये. याबद्दल अनिल कपूर यांना वाईट वाटले असल्यास मी त्यांच्याशी त्या संदर्भात स्पष्ट करेन. आम्ही दोघे सिनेसृष्टीत एकत्रित वाढलो आहोत. प्रत्येक महत्त्वपूर्ण क्षणावेळी एकमेकांसाठी उभे राहिलो आहोत. हे कधीच बदलणार नाही. दरम्यान, नो एन्ट्री- 2 सिनेमात वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ महत्त्वपूर्ण भुमिका साकारणार आहे. याशिवाय कास्ट संदर्भात अधिक माहिती समोर आलेली नाही.


आणखी वाचा :
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या विशेष शोचे दिग्पाल लांजेकर यांच्याकडून आयोजन…
प्रेग्नेंसीमुळे या अभिनेत्रीला शो मधून केले होते बाहेर
अभिनेता शरद पोंक्षे आणि त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट…

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...