Home आरोग्य होळीवेळी अत्याधिक फूड्सच्या सेवनाने पोट बिघडल्यास करा हे उपाय
आरोग्य

होळीवेळी अत्याधिक फूड्सच्या सेवनाने पोट बिघडल्यास करा हे उपाय

9
Health Care Tips
Health Care Tips

Health Care During Holi : होळीच्या दिवशी घरी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. या सणाचा आनंद लुटण्यासाठी घरी पाहुण्यांना किंवा मित्रपरिवाराला बोलावले जाते. अशातच होळीच्या दिवशी अधिक तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर बहुतांशजणांना पोट बिघडल्याची समस्या निर्माण होते. अशातच तुम्ही पुढील काही घरगुती उपाय करू शकता.

पोट बिघडल्यास पुढील करा घरगुती उपाय
-अत्याधिक प्रमाणात पदार्थ खाल्ल्यानंतर पोट बिघडल्यास तुम्ही दह्याचे सेवन करा. दही आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये असलेले प्रीबायोटीक पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करत हेल्दी बॅक्टेरियाची वाढ करतात. यामध्ये फायबर असते जी तुमची पचनक्रिया हेल्दी राहण्यास मदत करते. दह्याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो.
-ओव्हरइटिंगच्या कारणास्तव पोट बिघडण्यासह सतत शौच होत असल्यास तुम्ही केळ्याचे सेवन करू शकता. केळ्यामध्ये पॅक्टिन आणि फायबर असते जे तुम्हाला या समस्येपासून दूर ठेवण्यास मदत करते.
-सफरचंदाचा सर्वजण डाएटमध्ये समावेश करतात. यामध्येही भरपूर प्रमाणात फायबर असतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
-पोट बिघडल्यास तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे शरिरात इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन राहतील. लूज मोशनच्या कारणास्तव शरीरातून अत्याधिक प्रमाणात पाणी निघून जाते. अशातच तुम्ही नारळ पाणी प्यायल्यास शरीर हाइड्रेट राहण्यास मदत होते. (Health Care During Holi)
-होळीच्या वेळी चटपटीत पदार्थ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. अशातच तुम्ही पपईचे सेवन करू शकता. पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत काम करण्यास मदत होते.

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘newsite.gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)


आणखी वाचा :
महिलांनी प्रत्येक तीन महिन्यांनी ‘या’ वैद्यकीय चाचण्या जरुर कराव्यात
पाठ दुखीच्या समस्येने त्रस्त आहात? करा हे घरगुती उपाय
कच्च्या हळदीच्या चहाचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

Recent Posts

Related Articles

Hair Care
आरोग्य

Hair Care : ‘हे’ उपाय करून घरच्या घरी पांढऱ्या केसांना करा काळे

आजच्या काळात चुकीच्या जीवन शैलीमुळे मनुष्याचे संपूर्ण दैनंदिन जीवनच बिघडून गेले आहे....

Health
आरोग्य

Health : ‘हे’ सोपे उपाय करा आणि हिवाळ्यात ओठांना कोरडे होण्यापासून वाचवा

हिवाळा म्हणजे सर्वांचाच आवडता ऋतू. छान गुलाबी थंडीमध्ये व्यायाम करायला, काम करायला...

Skin Care | Bollywood Life
आरोग्य

Skin Care : प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करायचा…? मग करा ‘हे’ सोपे उपाय

आपल्या सर्वांनाच आपल्या शरीराची, आपल्या दिसण्याची खूपच काळजी असते. कमी अधिक प्रमाणात...

Health
आरोग्य

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर...